मी कुणाहुन ना कमी ...

नायक :

जग असो वैरी - वैरी... करत ना दुःख
मी दुःख मी
कोणि येओ कुणी...
मी कुणाहुन
ना कमी ना कमी... जग असो वैरी - वैरी-... ।ध्रु।

आग हृदयाची किती ती
प्रीतिची ऐशीच नीती
होउ दे जे व्हायचे ते
शिर अता धरलेय हाती
गालगा गागा लगागा
"
"
"
मी पिसा - मी संतापलो
जुलुम सोसत मी वाढलो
गालगा गागा गालगा
"
रोखुनी डोऽऽळ्यांऽऽना
गं तुझ्या गाऽऽलांऽऽवर
चालतो रोऽऽजचऽऽ मी
भडकत्या ज्वाऽऽलांऽऽवर
गालगा गाऽऽगाऽऽगाऽऽ
"
"
"
धैर्य मजजैसे आज ना येऽ दिसुन - आहा
झेलले जेव्हा घाव, झालोऽ तरुण - आहा
दृष्टि मित्रांच्या बाण मारोऽत वा - आहा
जीभ वैऱ्याची ऊर जाओऽ चिरुन - आहा
गालगा गागा .. गालगागाऽ लगा
"
"
"
बसलो असे दारी तुझ्या जाईन काही मी करुन
जाईन घेउन तुज तरी; वा मी तरी जाइन मरुन
मुक्तछंद (मूळ गाण्यात)
गागालगा (४ वेळा) (भाषांतरात)
धैर्य मजजैसे आज ना येऽ दिसुन - आहा
झेलले जेव्हा घाव, झालोऽ तरुण - आहा
गालगा गागा .. गालगागा लगा
"
आज तर जग हे
-जग हे-
न राहो; वा न मी - वा न मी ।१।
कोणि येओ कुणी ....
मी कुणाहुन ना कमी ना कमी ...
(ध्रुवपदाप्रमाणे)

नायिका :

क्षणभरी चिंता विसर ही
टाक तू इकडे नजरही
मजकडे ना रूप नुसते
धैर्यही आहे, हृदयही
गालगा गागा लगागा
"
"
"
पावले ऐसी झटकली
निखळली जुलमी साखळी
गालगा गागा गालगा
"
आडपडदाऽऽ कुठऽऽला
करु शके मजऽऽ बंऽऽदी
गाठ मी जऽऽन्माऽऽची
प्रियकराशीऽऽ बांऽऽधी
गालगा गाऽऽगाऽऽगा
"
"
"
अस्त्र जगताने प्रीतिवर डाऽगले - आहा
भिउनही रूपाला पिसे लाऽगले - आहा
रंगली मेंदी धैर्यरुधिराऽसवे - आहा
हे कथानक तेव्हा कुठे रंऽगले - आहा
गालगा गागा .. गालगागाऽ लगा
"
"
"
मी वेश केला मजनुचा लैला असुन
मग रंगला माझा पदर मळला असुन
मुक्तछंद (मूळ गाण्यात)
गागालगा (३ वेळा) (भाषांतरात)
अस्त्र जगताने प्रीतिवर डाऽगले - आहा
भिउनही रूपाला पिसे लाऽगले - आहा
गालगा गागा .. गालगागा लगा
"
हे नको समजू
-समजू-
कि मज ना मर्दुमी मर्दुमी ।२।
कोणि येओ कुणी ....
मी कुणाहुन ना कमी ना कमी ...
(ध्रुवपदाप्रमाणे)

पर्यायः

३. न करतो दुःख मी ... असेही चालेल पण नायिकेसाठी न करते ... असे लिहावे लागेल.

१. शब्दशः
बांधले शववस्त्र माथी

२. हे भावार्थाने लिहिले आहे. अधिक सुधारणेस वाव आहेच.

३. शकतसे मज अडवू
     कोणती तटबंदी

४. टेकले मी माथे
     प्रियकराच्या स्कंधी

५. .... कि आहे - भ्याड मी भ्याड मी ...

६. अशा रंगातला भाग - नायकाच्या मागून अभिनायकांचा आणि नायिकेच्या मागून अभिनायिकांचा चमू गात आहे. त्यांचे शब्द म्हटल्याशिवाय गाणे चालीत नीट म्हणता येणार नाही. त्यामुळे ते असे दाखवलेले आहेत.

टीपा :

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )  प्रत्येक कडव्याची चाल वेगळी आहे आणि ती उजव्या स्तंभात दाखवलेली आहे.

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...मी   असे जमवा बरका!   यमकाची जागा ठळक केलेली आहेच.