संस्थळांवर व्यनि किती सुरक्षित?

एका संस्थळावर मला माझ्याच व्यनीची यादी थेट संपादकांच्या खरडवहीत दिसू लागली. एरवी मी प्रशासनाकडे तक्रार केली असती मात्र या घटनेआधी काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामुळे सर्वांना सावध करणे मी माझे कर्तव्य समजतो. 

 याचा अर्थ किमान माझे खाते 'कोणीतरी' हॅक केले होते व माझ्या व्यनीची यादी मिळवली होती. जे माझ्यासाठी धक्कादायक आहे

प्रश्न स्क्रिप्ट (व्य. नि. ची यादी मिळवण्यासाठी) कोणी बनविली हा नसून अशी स्क्रिप्ट बनणे शक्य आहे हा आहे. जर अशी स्क्रिप्ट बनविणे एखाद्याला काही दिवसांत जमू शकते तर मराठी संस्थळाचे व्यनी कितपत सुरक्षित आहेत / राहतील असा प्रश्न मला पडला आहे.
यानिमित्ताने चर्चेसाठी पुढील प्रश्न ठेवत आहे
१. असे करणे सगळ्या मराठी संस्थळांवर शक्य आहे?
२. ही ड्रुपलमधील त्रुटी आहे का?
३. ड्रुपलवर हे शक्य असल्यास त्यावर काय उपाय करता येतील? 
४. सर्व संस्थळांनी एकत्र येऊन या प्रश्नावर उपार शोधला पाहिजे असे वाटते का?
मी याविषयातला तंत्रज्ञ नाही. माझी भिती किती खरी होऊ शकते मी जाणत नाही. मात्र सदर प्रसंगानंतर गप्प बसून रहाणे मला धोक्याचे वाटतले. त्यामुळे माझ्यावर होऊ शकणार्‍या संभाव्य आरोपांना/व्यक्तीगत टिपण्यांना लक्षात घेऊनही मी इतरांना सावध करणे माझे कर्तव्य समजतो.
टीपः <b>सदर धाग्याचा हेतू कोणतेही संस्थळ अथवा आयडीची बदनामी/आरोप करण्याचा नसून एकूणच ड्रुपल आधारीत मराठी संस्थळांवरच्या सदस्यांनी योग्य तो बोध घेऊन सावध राहावे म्हणून हा धागा काढला आहे. रिंगिंग द बेल इतका आणि इतकाच  हेतू यामागे आहे. उपक्रमावर पाहिलेल्या या घटनेमुळे जास्तीत जास्त मंडळी सावध व्हावीत म्हणून हा धागा अनेक ड्रुपल आधारीत मराठी संस्थळांवर टाकत आहे.
तरीही प्रशासनास अयोग्य वाटत असेल तर हा धागा उडवू शकतात

(संपादित : प्रशासक. अधिक माहितीसाठी वाचा : सुसंबद्ध आणि सार्वजनिक स्वरूपाचे लेखन )