मुखडा - अंतरा

हा खेळ असा आहे की गाण्याच्या अंतऱ्यावरून त्या गाण्याचा मुखडा ओळखणे.  जो कोणी गाण्याचा मुखडा ओळखेल त्याने/तिने दुसऱ्या गाण्याचा अंतरा
द्यायचा. गाणे ओळखता आले नाही तर अर्थातच क्ल्यू द्यायचा. अंतऱ्याच्या दोनच ओळी अपेक्षित आहेत. पहिलाच अंतरा द्यायला पाहिजे असे नाही. गाणी अर्थातच मराठी ! खरे तर हिंदी गाण्यात खूप जास्त मजा येते आणि खेळ खूप रंगतो.

तुझ्या जीवनी नितीची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग आली

:)) खूप सोप्पे गाणे आहे हे सुरवातीचे.

आता या गाण्याचा मुखडा ओळखा. आणि नंतर लगेच दुसऱ्या गाण्याचा अंतरा द्या.