मज घाल तू साद मज बोलवाया

नायिका :
मज घाल तू साद मज बोलवाया
मला प्रीतित नकोस इतके छळाया ।ध्रु।

असे आज मम जीवनी फार पीडा
नि मी मरून व्हावी न राखेस पीडा
मज नकोस लावू दिव्यासम जळाया ।१।
मला प्रीतित नकोस इतके छळाया

नायक :
मज घाल तू साद मज बोलवाया
मला प्रीतित नकोस इतके छळाया ।ध्रु।

लपे हर तुझ्या श्वासलहरीतुनी मी
वसे हर लकेरीत तव स्पंदनी मी
जरा दृष्टी हृदयाकडे दे लवाया ।२।
मला प्रीतित नकोस इतके छळाया

नायिका :
न मी राहिले तर रडत राहशिल तू
पदर तव मनाचा सदा भिजवशिल तू
मरे तुजवरी, तिज न लागो मराया ।३।
मला प्रीतित नकोस इतके छळाया

नायिका :
घालून तू साद मज बोलवावे
न प्रीतीत इतके मला तू छळावे ।ध्रु।

असे आज मम जीवनी फार पीडा
नि मी मरून व्हावी न राखेस पीडा
दिव्यासारखे ना मला पेटवावे ।१।
न प्रीतीत इतके मला तू छळावे

नायक :
घालून तू साद मज बोलवावे
न प्रीतीत इतके मला तू छळावे ।ध्रु।

लपे हर तुझ्या श्वासलहरीतुनी मी
वसे हर लकेरीत तव स्पंदनी मी
ग हृदयाकडे दृष्टिने तव लवावे ।२।
न प्रीतीत इतके मला तू छळावे

नायिका :
न मी राहिले तर रडत राहशिल तू
पदर तव मनाचा सदा भिजवशिल तू
मरे तुजवरी, तिज न लागो मरावे ।३।
न प्रीतीत इतके मला तू छळावे

पर्याय :
१. असे कर न, की दीपवत मी जळावे
२. न मी राहता आसवे ढाळशिल तू

टीपा :

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!  लगागा लगागा लगागा लगागा (भुजंगप्रयात) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. यावेळी भाषांतराचे दोन पर्याय सुचले म्हणून ते दिले आहेत. दुसऱ्या पर्यायात क्रियापदाचे रूप वेगळे आहे.

४. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...    आया (पर्याय १) किंवा आवे (पर्याय २)  असे जमवा बरका!   यमकाची जागा ठळक केलेली आहेच.