उन्मुक्ता - उन्मुक्ता - मज नाव उन्मुक्ता

उन्मुक्ता - उन्मुक्ता - मज नाव उन्मुक्ता
लावण्यात माऽझ्या पल्लवते मादकता
मी जणु परिराणी (कुक् कूऽ)
मी तर नवतरूणी (कुक् कूऽ)
मी परिराणी - मी नवतरुणी...
बघतो तो वेडा होतो ना चुकताऽऽऽ ।ध्रु।
(उन्मुक्ता...
)

टाकता पदे मी.... हरिणही विरमते
घेता वळसे मी.... वीजही शरमते
कलिका मी अवख (कुक् कूऽ)
चानी मी चंच (कुक् कूऽ)
कलिका अवख - चानी चंच...
जो तो हृदयावर मज देतो मक्ताऽऽऽ ।१।
(उन्मुक्ता... )
गागागा - गागागा - लल गाऽल गागागा

मज समजुन भोळी.... मागे येउ नये
ना ऱ्हातिल तुमची.... हो तुमची हृदये
मी आज इथे ही (कुक् कूऽ)
पण उद्या कुठेही (कुक् कूऽ)
मी आज इथे - पण उद्या कुठे...
निश्चित कुठले असते स्थान विमुक्तांऽऽऽ ।२।
(उन्मुक्ता... )
गागागा - गागागा - लल गाऽल गागागा

पर्याय :

१. मूळ गाण्यात फुलपाखरू अशा अर्थाचा शब्द आहे. भाषांतरात 'मी पतंग चंचल.... ' असे काहीतरी करता आले असते, पण ह्या ओळी दोन पद्धतींनी म्हटलेल्या आहेत त्यातल्या दुसऱ्या पद्धतीच्या ठेक्यात ते बसेना शिवाय स्त्रीलिंगी म्हणून चानी (खार) असा बदल केला. सुचवणींचे स्वागत आहेच.

०, २, ३ क्ता किंवा कता असे यमक जुळवायचे अशा निश्चयाने यमके जुळवून ह्या ओळींची भाषांतरे केलेली आहेत. 'ता' एवढेच यमक घेतले तर मूळ गाण्यातल्या अर्थाला जास्त जुळणारे खालील पर्याय आहेत.
०. जो तो वेडा होतो मजला बघता
२. देतो भेट हृदय जो तो मजकरता.... किंवा.... करतो अर्पण जो तो मन मजकरता... असे काहीसे
३. भटक्यांचा कुठला हो नक्की पत्ता....

टीपा :

१. नायिकेबरोबर अभिनायक आणि अभिनायिकांचे चमूही गात आहेत. त्यांचे शब्द म्हटल्यावाचून गाणे चालीत म्हणता येणे अशक्य आहे. ते शब्द ह्या रंगात आणि कंसात लिहिलेले आहेत. शिवाय कडव्यात येणारे हे शब्द ध्रुवपदातही असल्याने ते दोन्हीकडे छन्न ठेवलेले आहेत. ते ध्रुवपदाबरोबर उघडू

२. अंतर्यमके अधोरेखित आणि तिरकी  केलेली आहेत.

३. हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चालः   मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.   (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक निदान ...     क्ता किंवा कता असे (किंवा निदान ता असे तरी! ) जमवा बरका!   यमकाची जागा ठळक केलेली आहेच.

४. आणि हो.... एक महत्त्वाचे राहिलेच की राव!! नायिकेला एखादे मस्तपैकी नाव सुचवा बरे. क्ता (किंवा कता किंवा निदान ता) असा नावाचा शेवट झाला पाहिजे (कारण ते यमकात आहे. )