अर्पीन तुजसि मन्मन - उपकार मजवरी कर

भाग १

नायक :

मम जीवनात अपुल्या - प्रीतीचा रंग तू भ
अर्पीन तुजसि
मन्म - उपकार मजवरी क
।ध्रु।

कुणी चंद्र  तो
हवासा - माझ्या न जीवनाला
व्याकुळ तुझ्या प्रकाशा - आहे ग जीव
झाला
मजला प्रकाश देउ - उपकार मजवरी क
।१।

कुंतल तुझे, मिळे ज्यां - औद्धत्य की घनांचे
झालेत घनतळी त्यां - लोचन सतर्ष माझे
माझ्या तृषेस शमवु - उपकार मजवरी क ।२।

====

भाग २

नायिका :

मम जीवनात अपुल्या - प्रीतीचा रंग तू भ
अर्पीन तुजसि
मन्म - उपकार मजवरी क
।ध्रु।

नीरस हरेक भूषण - सुख सुख गमे मज थिटे
भाळावरी धरावा - मज चंद्रही न वाटे
मज  प्रीतिने  शृंगारू - उपकार मजवरी क
।३।

तव प्रीत लाभली तर  - मी उलटवीन
वारा
जाइन जिथे  बुडाया - होइल तिथे
किनारा
मजला समीप घेउ - उपकार मजवरी क ।४।

टीपा :

४. पर्याय : मम जीव तुजसि अर्पिन.. किंवा मन्मन तुलाच अर्पण.... असे काहीसे
५. शब्दशः भाषांतर - उपकार एवढा कर... असे होईल पण उपकार मजवरी कर हे गाण्यात ओळीने म्हणताना जास्त अर्थवाही वाटले म्हणून तसे केले
६. ध्रुवपदाचे भाषांतर जरी असे असले तरी गाण्याचे दोन्ही भाग ध्रुवपदाच्या
दुसऱ्या ओळीने चालू होतात म्हणून भाषांतराचे शीर्षक "अर्पीन तुजसि मन्मन -
उपकार मजवरी कर असे द्यावे.
१. शब्दशः भाषांतर 'दावुन' असे हवे; पण प्रकाश दाखवून पेक्षा प्रकाश देऊन असे कानाला जास्त बरे वाटले.
२.  येथे मूळ गाण्यात स्वरांचे यमक आहे. पण मी भाषांतरात यमक च छ ज झ ह्यांच्या दरम्यान ठेवून फार वाहवू दिलेले नाही.
३. या कडव्यात पहिल्या ओळीच्या दोन्ही तुकड्यांचा क्रम भाषांतरात बदललेला आहे. शिवाय ह्या कडव्याच्या भाषांतरात सुधारणांना मुबलक वाव आहे ह्याची जाणीव आहे. सर्व सुचवणींचे स्वागत आहे.

चालः   मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल ) बहुतेक सर्व गाणेभर गागाल गालगागा - गागाल गालगागा (आनंदकंद) आहे फक्त ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीत दुसऱ्या भागात गागागा गालगागा असा बदल आहे (गाण्यात आणि भाषांतरातही )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.   (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमके दोन प्रकारची आहेत. ठळक केलेल्या जागी असे यमक हवे. अधोरेखित केलेल्या जागी कोठलेही यमक चालेल (पण यमक हवे  )