मराठी शब्दास इंग्रजी प्रतिशब्द

नमस्कार. या संकेतस्थळावर (अरे वा, मलाही जमायला लागलं असले शब्द वापरायला !! ) ही माझी पहिलीच वेळ. तेव्हा चूकभूल क्षमस्व. 

येथे मराठी प्रतिशब्द हवेत अशा प्रकारच्या काही चर्चा बघितल्या. पण माझा प्रश्न उलटा आहे. मला मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द हवा आहे. येथील जाणकार वाचक मला मदत करतील अशी आशा आहे. 
तर, बरेच दिवस मी 'तावातावाने' या मराठी शब्दाला चपखल असा इंग्रजी  शब्द शोधतो आहे, पण अजून सापडलेला नाही.
उदा. - *अमुक* पक्षाचे नेते नेहमीच तावातावाने का बोलत असतात असा मला नेहमीच एक प्रश्न पडतो. वरील वाक्य मला खरं तर इंग्रजीमध्ये सोशल  मिडिया साइटस वर लिहायचं आहे. पण याच सार्थ आणि भावपूर्ण भाषांतर कस करायचं तेच कळत नाही, त्या मुळे माझा हा प्रयत्न बराच काळ पेंडिंग किंवा विलंबित / प्रलंबित / स्थगित इत्यादी आहे. तरी सभासदांच्या मदतीची अपेक्षा आहे. ( कृपया  गूगल ट्रान्सलेटकडे लगेच धाव घेऊ नये, तो प्रयत्न मी धीच केलेला आहे.)
उत्तराची वाट पाहत आहे. आणि अशाच बऱ्याच चर्चा आणखी पुढे करता येतील, या कल्पनेने मी आता फारच उत्तेजित (एक्सायटेड) झालेलो आहे. 
(तळटीप : वरील वाक्यातील अमुक पक्ष म्हणजे कोणता पक्ष हे बहुधा सुजाण वाचकांच्या लक्षात आलेलं असेलच.)