केशरी दूध (मसाले दूध)

  • दूध १ लिटर
  • काजू, बदाम, पिस्ता पावडर ५ तेबल स्पून
  • वेलची पावडर १ टेबल स्पून
  • चारोळी १ टेबल स्पून (ऐच्छिक)
  • साखर चवी नुसार. (साधारण ५ ते ६ टेबलस्पून)
  • केशर चिमुटभर.
३० मिनिटे
चौघांसाठी

काजू, बदाम आणि पिस्ते वजनात समप्रमाणात घेवून त्याची पावडर करावी. (दाण्याचा कूट करतो तशी).
साले काढून वेलची कुटून घ्यावी. (किंवा मिक्सर मध्ये पावडर करून घ्यावी).
चारोळी निवडून घ्यावी. (हल्ली कुजक्या चारोळ्या जास्त येतात)
तवा गरम करून (बोट टेकता येईल इतपत) गॅस बंद करावा. त्यावर केशराचे धागे पसरवून टाकावेत. चमच्याने हलवून, गरम झाले की वाटीत काढून ठेवावेत. थंड झाले की कुरकुरीत होतात. ते हाताने चुरडून त्याची पावडर करावी. वाटीभर गरम दूधात ही पावडर टाकून, झाकून बाजूला ठेवून द्यावी
दूध तापवावे. चांगले तापले की वेलची पूड टाकावी. पुढे दूध उकळले की त्यात काजू, बदाम, पिस्त्याची पावडर टाकावी. ढवळत राहावे. गुठळ्या होऊ देऊ नयेत. निवडलेल्या चारोळ्या टाकाव्यात. चारोळ्या शिजल्या की साखर टाकून ढवळावे. साखर विरघळली की केशराचे दूध टाकावे.

एक उकळी आली की गॅस बंद करावा.

शुभेच्छा....!

केशर उच्च प्रतिचे घ्यावे. Syren ब्रँड स्पॅनिश केशर चांगले आहे. ते मिळत नसल्यास नेहमीच्या अनुभवातले उत्तम केशर वापरावे.
केशर तापवताना तवा जास्त गरम नसावा. बोट टेकता आले पाहिजे. नाहितर केशर जळते.
चारोळ्या नीट निवडाव्यात. नाहीतर नाही वापरल्या तरी चालतात.
काजू, बदाम, पिस्ता, वेलची पावडर नसल्यास साधा दूध मसाला वापरला तरी चालेल.
बर्फाळ थंड किंवा गरम कसेही, आवडी प्रमाणे घ्यावे.