जे हिला नको ते करतो आहे

जे हिला नको ते करतो आहे


जे हिला नको ते करतो आहे
मी तिच्यावरीही मरतो आहे


ये भेट मला तू रात्रीपुरती
मग कोण सकाळी स्मरतो आहे?


ही सजली नटली येथे सुंदर
शेजारी का मोहरतो आहे?


घे घोट घोट तू दमादमाने
(छातीत धूर गुदमरतो आहे)


मी म्हातारा नाही हे नक्की
आरशास का घाबरतो आहे?


तू मला उपाशी ठेवतेस पण
मी किलोकिलोने भरतो आहे


दाखवू कसे वेडा नाही मी?
माझ्यात कवी वावरतो आहे


माफी



चित्त ह्यांच्या जे तुला हवे ते करतो आहे वर आधारित