टिळक-आगरकर वादाचे आजच्या संदर्भात स्थान

लोकमान्य आणि आगरकर या दोन थोर विचारवंतांचे हे १५० व्या जयंतीचे वर्ष आहे. आगरकरांची १५० वी जयंती नुकतीच साजरी  झाली तर टिळकांची येत्या २३  जुलैला होईल. या दोन विचारवंतांमध्ये राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा आधी अशा आशयाचा वाद झाला होता. या वादालाही आता एका शतकापेक्षाही जास्त काळ उलटून गेला आहे. मनोगतवर यापूर्वीही टिळक आणि आगरकरांच्या वादाचे संदर्भ आले आहेत. परंतु या वादाचा विचार आजही करायला हवा की हा वाद आता कालबाह्य झाला आहे, तसेच जर हा वाद आजही विचारात घेण्यासारखा असेल तर आजच्या काळाच्या वा परिस्थितीच्या संदर्भात आगरकर आणि टिळक या दोघांपैकी काणाची बाजू अधिक बरोबर ठरेल असा विचार मनात येऊन गेला. मला आगरकरांच्या मतांचा पक्ष घ्यावा वाटतो. मनोगतींना काय वाटते?