कसली चर्चा करूया

जाम कंटाळा आलाय --


मनोगतावरच्या गेल्या दोन तीन दिवसांतल्या चर्चा वातड पोळी, अळूच पानचट फतफतं, आणि थंड वरण भाताचा गोळा असल्यागत झाल्या आहेत.


आमच्या तात्या सरांनीही अशी चर्चा सुरू केली की कुणी झणझणीत भुरकाही नाही मारू शकला. डोळ्यातून पाणी निघालं नाही तर काय मजा त्या जेवणाची?


असो.


तर मंडळी पुढील गरमा गरम चर्चा कुठल्या विषयांवर सुरू करावी या साठी (नि)विदा मागवत आहे. म्हणजे असे अळणी दिवस आले की टाकली एखादी झणझणीत चर्चा.


तर, चर्चा विषय कुणीही सुचवू शकतो. लहान- मोठा, जुना- नवा, आवडता - नावडता, स्त्री-पुरुष असा कुठलाही मनोगती. तरी चर्चेत भाग घेऊन सर्वांना उपकृत करावे.


नियम एवढाच की तिरके तिरके प्रतिसाद भांडणासाठी द्यायचे नाहीत. (तसे नियम हे मोडण्यासाठीच असतात.)


-- प्रियाली