सर्वत्र तू होतास..

तुझ्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवते,
तरी शेवटी तुझ्याचकडे पाहते..
तास बुडवून उपहारगृहात बसले,
तिथे तू होतास..
ऊंच बुटांनी अडखळत चालले,
तिथेही तू होतास..
कॉलेजच्या दारात तुला पाहून दिवस माझा उगवला..
एकदा तू दिसलाच नाहीस तर सूर्य निस्तेज वाटला..
पावसात भिजताना तुझ्या गच्चीकडे लक्ष गेलं..
जिन्यावरुन पडले तेव्हाही तूच वरुन पाहिलं..
कालच तू भेटून ओळख करुन घेतली,
तेव्हा मात्र मी शिष्टपणे 'हाय' करुन मान फिरवली..
मी असं का करते, तुला कधीच नाही का रे उमगलं?
कारण तुझ्याबद्दलच्या भावनाना माझंच मन घाबरलं..

(परत मुक्तछंद!!)