मनोगतवर मतचाचणी

मित्रहो,


माझी प्रशासनास अशी सूचना आहे की मनोगतवर मतचाचणीची सोय करावी.


एखादा मनोगतविषयी किंवा एखादा ज्वलंत प्रश्न घेऊन तो मतचाचणीसाठी साधारणतहा एका सप्ताहासाठी ठेवावा. पर्यायांमध्ये 'होय/नाही/काही मत नाही' किंवा 'सहमत/असहमत/काही मत नाही' असे पर्याय ठेवावे आणि आठवड्याशेवटी निकाल लावावा.


माझ्यामते मतचाचणी हा चर्चेला चांगला पर्याय आहे आणि ज्यांना मनोगतावर लिहायला वेळ मिळत नाही त्यांनाही सहभागी होता येईल. त्यामुळे मनोगतास आणखीन प्रतिसाद लाभेल अशी आशा आहे.


- मोरू


(कृपया या चर्चेचे विषयांतर टाळावे ! - खास करून रिकामटेकडांनी .. ह̱. घ्या. ;)