नाव काय (आणि का?) आहे ?

आमचे 'पुणे' तसे अनेक बाबतींसाठी प्रसिद्ध आहे. जसे पेशवाई, पुणेकर विशेषतः पेठांतील पुणेकर, पुण्यातील वाडे, पेठा, पुणेरी पगडी, पुणेरी चप्पल, पुण्यातील शिक्षण. त्याचप्रमाणे पुणे प्रसिद्ध आहे ते येथील देवतांच्या चित्रविचित्र नावांमुळे. जसे, उपाशी विठोबा, डुल्या मारुती, खुन्या मुरलीधर, चिमण्या गणपती इ. पण अशी चित्रविचित्र नावे फक्त पुण्यातच आहेत का हो ? कोल्हापूरमधे 'उभा' की तसाच कोणीतरी मारुती, नाशकात काळा राम-गोरा राम इ. आहेतच. तेव्हा पुणेकरांसह सर्वांनी आपापल्या गावातील देवतांची चित्रविचित्र नावे इथे लिहावीत तसेच असे नाव पडण्यामागे काही कहाणी असल्यास जरूर लिहावी. जसे खुन्या मुरलीधरासमोर इंग्रजांना फितूर झालेल्या द्रविडांचा खून झाला होता. म्हणून मुरलीधराला 'खुन्या' मुरलीधर असे संबोधू लागले.