सेट / नेटच्या परीक्षा असाव्यात का?

मागच्या महिन्यात १३ ऑगस्टला सेट  ची परीक्षा झाली. आता २६ डिसेंबरला नेट ची परीक्षा होणार आहे. या परीक्षा पास होणे ही गोष्ट पदवी व पदव्युत्तर शिक्षकपदासाठी आवश्यक पात्रता मानली जाते. आता या परीक्षांना एम. फील ची पदवी पर्याय म्हणून स्वीकारली गेली आहे. सेट वा नेटचे निकाल अक्षरशः एक टक्का, दोन टक्के असे लागतात. अनेकदा या परीक्षा असू नयेत असे मत मांडले जाते. या परीक्षांप्रमाणे अन्य देशांत अशा परीक्षा असतात का? असल्यास त्यांचे स्वरूप कसे असते ? याविषयी माहिती हवी आहे. तसेच अशा परीक्षा असाव्यात का? असल्यास त्यांचे स्वरूप, निकाल यांविषयी मनोगतीचे मत हवे आहे.