मटा वार्षिक अंकातील आगपाखड?

वादळी चर्चे करिता हा थोडा मटा वार्षिक अंकातील एक जरा वेगळा विषय.'महाराष्ट्र मेला आहे' या शीर्षकाचा हा लेख  (आगपाखड?) प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी पूर्ण वाचावा. चर्चा सुरू करण्या करिता त्या लेखातील काही मुद्दे नमूद करत आहे.



  • हा महाराष्ट्र माझा आहे नि मी मराठी आहे याचा कुणालाही अभिमान नाही. मराठी भाषिक केवळ मुंबईतच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातही अल्पसंख्य होत आहेत; त्याची कुणालाच खंत नाही. मुलांना इंग्रजी शाळेत पाठवावे आणि आपण घराबाहेर रिक्षावाल्याशीही हिंदीत बोलावे याचा आपल्याला अभिमान वाटू लागला आहे.

  • आपले मुख्यमंत्री, इतर मंत्री मराठीत मुलाखत देण्यासही लाजतात.


  • युरोपातील सर्व ज्यू अमेरिकेत गेले आणि त्यांनी अमेरिकेला समृद्ध केले. त्याप्रमाणे सगळे ब्राह्माण अमेरिकेत जातील. कॅलिफोनिर्याचे कोकण करतील. त्यांची चिंता नको; पण ब्राह्माणांच्या जागा मराठा समाजाने पटकावल्या नाहीत, ही पोकळी सुब्रह्माण्यम, यादव, सिंग यांनी भरून काढली याचे मला वाईट वाटते.


  • सॉ मिल्स आणि फनिर्चर व्यवसायावर तर पटेलांचा एकाधिकारच आहे आणि त्यांचेच भाऊबंद असलेल्या खानदेशातील लेवा पाटलांना साधा केळीचा व्यापारही आपल्या हातात ठेवता आलेला नाही.


  • ब्राह्माणांना बाजूला करून मराठ्यांनी सूत्रे हाती घेतली. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्व मराठे पसरले; पण त्यांची मानसिकता .....सर्व मराठी मुलुख एका रेल्वे व्यवस्थेखाली आणावा यावर कुणीही बोलत नाही. खरे तर सिंचन, शेती, उद्योगधंदे, रेल्वे अशा प्रत्येक विषावरील तज्ज्ञ लोकसभेत पाठवावयास हवा; पण मराठ्यांशिवाय कुणाला तिकीट द्यायचेच नाही, दिले तर निवडून येऊ द्यायचे नाही.... २५ वर्षांपूर्वी अशोक जैन यांनी महाराष्ट्र टाइम्समधील सदरात मौनी खासदारांचा उल्लेख केला होता. पण आडात नाही, तर पोहऱ्यात येणार कुठून? ज्याचा कोणत्याही विषयाचा अभ्यास नाही, ज्यांना इंग्रजीच काय पण हिंदीही बोलता येत नाही, ते तिथे 'मौनीबाबाच' ठरणार!


  • ब्राह्माणांना मागे सारून मराठे पुढे आले हा चचेर्चा विषय नाही. ब्राह्माणांना दूर सारल्यावर त्यांची जागा मराठा समाजाने न घेतल्याने तिथे परप्रांतीय घुसले याची खंत आहे. याचा दोष नेतृत्वाला का देऊ नये? जाट, लेवा पाटीदार, यादव, मिना, वन्नीयार जमातीचे लोक उद्योगधंद्यात शिरले, बुद्धिवादी नोकऱ्यांत शिरले. त्यांनी राज्याला पुढे आणले; परंतु मराठा नेतृत्वाने आपल्या समाजाला त्यासाठी का प्रवृत्त केले नाही? सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका (त्याही धड चालविता आल्या नाहीत) त्यापलीकडे उद्योगक्षेत्र आहे हे त्यांना माहीतच नाही. जे राज्याच्या राजकारणात अडचणीचे ठरतील, अशा रेम्याडोक्यांना लोकसभेत पाठवून आपली खुर्ची निष्कंटक करण्यातच त्यांनी धन्यता मानली. कोणता मराठी खासदार परराष्ट्र धोरणावर बोलला? आंतरराष्ट्रीय व्यापारावर कुणाचाही अभ्यास आहे? जलवाटपात महाराष्ट्राचा वाटा किती आहे हे कुणाला ठाऊक आहे? अशा खुज्या वृत्तीच्या, अदूरदर्शी नेत्यांनी महाराष्ट्राला हीन स्थितीला आणले आहे. हा लेख कुणाला डिवचण्यासाठी लिहिला नाही; पण चेतवण्यासाठी मात्र लिहिला आहे. मराठा नेतृत्वाने त्याचा विचार करावा. नाही तरी आज महाराष्ट्र कोलमडला आहेच. उद्या तो पूर्णपणे मरेल हेच विधिलिखित आहे. आपल्यावाचून आता देशाचे काही अडणार नाही!


  • खरा मराठा आत्मसंतुष्ट वाचा

    महाराष्ट्र भूभार या भारताचा।।


  • इति-सुधाकर डोईफोडे