कोटीच्या-कोटी - भाग-३


                             कोटीच्या-कोटी-भाग-३


 जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधील सगळे जण 'जे जे' करतात ते सुंदरच असते, नाही?
                       *******************
 आमच्या शेजाऱ्यांची सून सारखी मालाडला तिच्या माहेरी जात असते, म्हणुन आम्ही तिला, "तिथे तुझी 'मा' तुझे खुप 'लाड' करते, म्हणून तु नेहमी मालाडला जातेस" असे म्हणतो.
                       ********************
 आमच्या ऑफिसमधील एक स्टेनो त्याच्या अनेक मैत्रीणींशी सतत मोबाईलवरुन बोलत असतो; त्याचे नाव सध्या '(मो)बाईलवेडा' असे पडले आहे.
                       *********************
 सध्याची महागाई बघता परमेश्वराला 'भवसागर' पार करण्यापेक्षा 'भावसागर' पार करण्यासाठीच साकडे घालावे असे वाटतेय.
                        ********************
 काही वर्षांपूर्वी एका खाणावळीत जेवायला जात असू; 'अन्नपुर्णा खाणावळ'. तिथे जायला रात्रीच्या वेळेस जरा जरी उशीर झाला तरी सगळे अन्न संपलेले असायचे, त्यामुळे आमचा एक मित्र वैतागून,"ही कसली रे अन्नपुर्णा, ही तर 'अन्न-पुरेना' खाणावळ आहे",असे म्हणायचा.
                        ********************
   काही वैद्यकीय कोट्या-
  * एका डोळ्याच्या डॉक्टरने भविष्यासाठी बचत केली नव्हती, कारण त्यांना 'दूरदृष्टी' नव्हती म्हणे!
  *ऑर्थोपेडीक सर्जनच्या मुलीचे लग्न ठरल्यामुळे ते 'कंबर कसून' लग्नाच्या तयारीला लागले.
  * प्रत्येक अस्थिरोग तज्ञ हा 'हाडाचा वैद्य' असतोच, नाही?
  * केशरोपण तज्ञ टक्कल पडलेल्या व्यक्तीचे 'केस-टेकींग' कसे करत असेल?
  * एका दंत-विकार तज्ञाचे 'खायचे दात' आणि 'दाखवायचे दात' वेगळे आहे म्हणतात!
  * एका डॉक्टरचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे एका पोट-विकार तज्ञाला 'पोटदुखीचा' विकार जडला.
  * काही त्वचा रोग तज्ञ हल्ली 'गेंड्याच्या कातडीचे' झाले आहेत असे कळते.
                                           -मानस६