(फकीर!)

नुकतीच वैभव जोशी यांची  गझल वाचून वांद्र्यात फिरत होते. ठिकठिकाणच्या नगरपालिकांचे 'निकाल' लागत असतानाच हे कुठूनसे कानी आले.


मतांत होता निकाल लागावयास थोडा उशीर झाला
जसा जसा लागला तसा प्रांत प्रांत माझा फकीर झाला

जरी नेसली कषाय वस्त्रे उणा कुठे मोहपाश आहे
मुलास गादी हवी म्हणोनी कधीच राजा अधीर झाला

असे कसे जाणले न शक्ती सुखासुखीही गळून जाते
कशा तुझे नाव घेतले वाघ वाघ हा बेफिकीर झाला

पदोपदी भास होत आहे , अजून माझाच राज आहे
असे तया त्यागले म्हणोनिच कार्यकारी बधीर झाला

मला न पर्याय राहिला ! सैनिकास केले मुला हवाली
तया न पर्याय राहिला ! राष्ट्रवादी वा मानसेन झाला


                                                                साती


मानसेन- म. न. से. वाला