त्याचे असे झाले... भाग ६

हुश्श करून बसलो खरा, पण त्याच वेळेस दोन गोष्टी मला अचानक जाणवल्या. एक म्हणजे आतून काहीतरी आवाज येत आहेत. आणि दुसरे म्हणजे बसताना मला काहीसे अडचणीचे वाटत आहे.

त्यातील पहिल्या घटनेने मालूच परत आली आहे असे वाटून माझी हबेलंडी उडाली. बरखा भूतलावरच्या याच विभागात आहे या विचाराने हबकलेले माझे हृदय आत्ता कुठे मिनिटाला बाहत्तर (का तत्सम काहीतरी संख्या) ठोक्यांवर येऊ पाहत होते. त्यात मालूला अचानक सामोरे जाणे, म्हणजे मी सकाळपासून केलेल्या पापांची जंत्री आठवू लागलो. 'मला काम आहे' अशी थाप मारून मालूला घरी येण्याच्या (आणि मला पोहे करून खाऊ घालण्याच्या) विचारापासून परावृत्त करून मी बाहेर कुठे गायब झालो होतो हे एकच आठवड्याभराच्या मूकयुद्धाला (आणी नंतरच्या अतीखर्चिक तहाला) पुरेसे होते. परत त्यात "माझ्या हातचे पोहे नकोत, तर तसे सरळ सांग. मी मुळी स्वैपाकच करणे सोडून देणार आहे. नाहीतरी मला स्वैपाक करता येत नाहीच" असा तिसराच धुमारा फुटला असता तर...

त्याचे असे झाले... भाग ५

बरखा बजाज!

"बरखा", मी ओरडलो. माझ्या ओरडण्यात आश्चर्य आणि भीती समप्रमाणात होती. आश्चर्य याचे की हा देहावतार भारतात आहे हे मला माहीत नव्हते. आमचा समोरासमोर संपर्क होऊन आठ वर्षे झाली होती. त्यानंतर इ-पत्रे अधूनमधून चालू होती, पण माझ्या आठवणीप्रमाणे शेवटचे इ-पत्र पाठवून (किंवा मिळून) किमान पाचेक वर्षे तरी झाली असतील. भीती अशाची की आठ वर्षांपूर्वी आम्ही जेमतेम एक दिवस भेटलो होतो. पण त्या एका दिवसात माझी (त्यावेळची) नोकरी घालवण्याचे महान कर्म हिने चुटकीसरशी पार पाडले होते. एकंदरीतच चंडिका, दुर्गा, महाकाली, मरीआई, जाखाई, जोखाई आणि तत्सम सर्व उग्रप्रवृत्ती देव्यांना (देवीचे अनेकवचन हेच होते असे वाटते) जेव्हा असे जाणवले की आपण वेगवेगळे अवतार वा रूपे घेतल्याने आपली शक्ती तेवढीशी उठून दिसत नाही. तेव्हा त्यांनी एक सामायिक अवतार घेतला, त्याचे नाव बरखा बजाज.

तंत्रज्ञान आणि त्याचा वापर.

आज काल तंत्रज्ञानाचा वापर इतका सर्रास होतो की आपल्याला हव्या त्या ठिकाणी हवी ती माहिती उपलब्ध होते. आपल्याला हवी असलेली माहिती, गाणी, चित्र कुठेही घेऊन जाऊ शकतो. हव्या त्या माणसांशी केव्हा ही संपर्क साधता येतो.असे कितीतरी फायदे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला बघायला आणि उपभोगायला मिळतात.

उडत्या छबकड्या

अर्थातच हवाई सुंदरी!

लहानपणी प्रत्येकाला विमानाविषयी प्रचंड कुतुहल असते. किती मौज दिसे ही पाहा तरी, हे विमान उडते अधांतरी' असे म्हणताना प्रत्येकाला त्या विमानात बसायची उत्सुकता असते. पुढे मोठेपणी जेव्हा सर्रास विमानप्रवास घडू लागतो तेव्हा 'दूरून डोंगर साजरे' याचा प्रत्यय येतो. साध्या अंतर्गत उडडाणापूर्वी एक तास तरी अगोदर विमानतळ गाठावा लागतो. त्यासाठी त्या वेळेच्या दीड तास आधी (मुंबईची वाहतूक हो!)घरुन निघावे लागते. विमानतळावरची गर्दी. कोलाहल, ते गचाळ व्यवस्थापन, उडाणपत्रासाठीच्या लांबलचक रांगा, पुन्हा तपासणी व मग आपल्या उड्डाणाच्या उद्घोषणेची वाट पाहत ते ताटकळणे मग उतरल्यावर आपले सामान ताब्यात घेण्यासाठी ढकलगाडीची शर्यत व शेवटी सरकपट्ट्यावरची पकडापकडी .....एकूण नको तो विमान प्रवास असे वाटते.

हा काय प्रकार असावा?

नमस्कार मनोगतींनो!

सध्ध्या मी मनोगतावर वाचनमात्र उरलो आहे. महिना दिड महिन्यापूर्वी काही दोषास्तव खिडक्या काढून नव्याने चढविल्या. म्ग अनेकदिवस कार्यग्रस्त असल्याने वाचनाचा-लेखानाचा योग आला नाही. आला तेव्हा लक्षात आले की मला प्रतिसाद/ व्यनि वा कसलेही लेखनकरता येत नाही. मी शिर्षकापर्यंत्च पोचू शकतो, पुढे लेखनपटलापर्यंत नाही. आय इ ६.० ला समस्या नाही असे ऐकून आहे पण ते असूनहीअडचण कायम आहे. मोझिला द्वारे शिरकाव केला तर लेखन येते आहे पण भाषेचा पार बट्ट्याबोळ होत आहे.

महाराष्ट्राची ४७ वर्षातील प्रगती

गेल्या ४७ वर्षात महाराष्ट्रात बदल झाले आहेत, कित्येक बाबतीत प्रगति झली आहे, तरी पण महाराष्ट्राची चाल अडखळत आहे. शिक्षण कोणते ब कसे द्यावे या बाबत अजुनही संभ्रम आहे. मध्यम मराठी की इंग्रजी हेच अजून ठरत नाही. माहिती क्षेत्रातील संधी पाहून इंग्रजी शिवाय तरणोपाय नाही असा भ्रम झाला आहे. पिण्याचे पाणीही आपण सर्व जनसंख्येला देऊ शकत नाही, वीजवापर वाढला पण पुरेशी वीज निर्माण होत नाही. निर्मित वीजेचा ४०% भाग गळतीमुळे वाया जातो. शेती फायद्यात नाही. शेतकरी आत्महत्या करतात. शहरात रोजगाराची स्थिती बरी आहे परंतु खेड्यात काम असुनही रोजगार नाही. औद्योगिकरण चांगले झाले परंतु, फक्त मोजक्या शहरांत व त्यांचे अवति भवति. विशेष आर्थिक क्षेत्रेही याच शहरांच्या जवळ. यामुळे शहराकडे लोकसंख्येचे स्थलांतर होत आहे. खेडी उजाड तर शहरे झोपडपट्टीग्रस्त. आरोग्य व सेवांचा बोजवारा. इतर प्रांतातूनही स्थलांतर मोठ्या प्रमाणात. वीजेबद्दल न बोललेले बरे. दुष्काळी भागाकडे कोणाचेच लक्ष नाही. करण्यासारखे खूप आहे.

त्याचे असे झाले... भाग ४

ढाराढोरी घुर्घुरायते....

माणसाने बेडकाच्या मेजवानीची स्वप्ने बघितली तर ताटात झुरळसुद्धा येत नाही. त्यामुळे कलिंगडाच्या वाळलेल्या बियांचेच स्वप्न पाहावे, म्हणजे जे ताटात येईल ते गोड भासते अशी एक चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल. तत्प्रमाणे मी 'दीड तासाची झोप' अशा कलिंगडाच्या वाळलेल्या मूठभर बियांचे स्वप्न पाहिले. त्यातल्या बऱ्याचशा बिया मिळाल्या. काही हुकल्या. पण त्या खवट निघाल्या असत्या असे स्वतःचे समाधान करून घेतले.

अमेतिकेतले पर्यावरणरक्षण

"रोज रोज काय मजेशीर! बस झाले आता विनोदी लेखन. इथे एवढे गंभीर प्रश्न पडलेत दुनियेपुढे आणि तुम्ही काय लिहिताय तर विनोदी..." मी आरशातल्या मला समजावले. आणि शेजारचा दिवा विझवला. मागच्या महिन्यातल्या पृथ्वी-दिवशी मी ऊर्जा-बचतीचा संकल्प केला होता तो अजूनही मी उत्साहाने राबवत होतो. शेवटी स्वरूप पाहिल्याशिवाय विश्वरूप कसे दिसणार - दहावीत असताना  विनोबा असे काहीसे म्हणाले होते. असो, तर सांगायचा मुद्दा हा की या वैश्विक प्रश्नामागे मी हात धुऊन लागलो आहे.
त्याच सुमारास असे वाचले की २०२१ पर्यंत उष्मा एवढा वाढेल की पूर आणि दुष्काळामुळे बांगलादेश आणि भारत आदि देशांवर गंभीर संकट ओढवणार आहे. त्याचे मुख्य कारण असणारे अमेरिकेत होणारे अमर्याद प्रदूषण. बापरे! मी जरा घरातच इथे तिथे पाहिले. दोन संगणक चालू, तीन चार बल्ब, दोन ट्यूबा, शीतकपाट आणि चार्जरला एक मोबाईल. डोळेच बाहेर आले माझे. विजेचे बिल सपाट म्हणजे भाड्यातच सामावलेले असल्याने पैशाची काही चिंता नव्हती आणि म्हणूनच ही उधळपट्टी चालू होती. मग ठरवले की आजपासून सुधारायचे.
जळणारे दिवे पाहून सहजच गझल आठवली - ’मालवून टाक दीप - चुप’ पुढच्या ओळीने चित्त विचलित व्हायच्या आधीच गुणगुणणे थांबवले आणि घरातले सगळे उगीच जळणारे दीप मालवून टाकले. जरा अंधार वाटायला लागला पण त्या अंधारात मला उद्याच्या उषःकालाची बीजे दिसत होती. बल्ब बघितले तर सगळे १०० वॅटचे. कुणीतरी घर सोडून जाताना दिले होते आणि फुकट म्हणून बिनदिक्कत जळत होते. "अमरू संस्कृतीची कृपा" असे म्हणून मी मनातल्या मनात दोन चार शिव्या देऊन घेतल्या. इथे घरात ट्यूबा नसतात, असली तर फक्त स्वयंपाकघरात. पांढरा प्रकाश काम करताना आणि पिवळा प्रकाश आराम करताना असा काहीतरी अजब फंडा. त्यामुळे नवीन नवीन असताना घरात नाही तर बार मधे बसल्यासारखे वाटायचे.
तसे अमरू लोक घरांमधे पीतवर्ण प्रकाशात पीत बसण्याशिवाय फारसे काही वेगळे कुठे करतात.
बल्ब पण भिंतीवर न लावता उंच उंच खांबांवर लावतात. या बल्बांची बटणे देखील चमत्कारिक असतात. समजा उजवीकडे बटण फिरवल्यावर दिवा लागत असेल तर कुठचाही डोके न फिरलेला माणूस दिवा बंद करायला बटण डावीकडे फिरवेल की नाही, पण ते उजवीकडेच फिरवावे लागते. पंख्याचे तर त्याहून अजब. एक साखळी असते जी एकदा खेचली की पंखा ३ वर, दुसर्‍यांदा खेचली की २ वर, आणि असेच चौथ्यांदा खेचली की बंद. पंख्याचा वेग हा हळू, अतिहळू आणि महाहळू असा अनुक्रमे ३, २ आणि १ साठी असतो. अहो पण म्हणून बिघडतं कुठे, वातानुकूलन असतेच की. पण इथेच तर खरी गोम आहे. आमची इमारत थोडी जुनी आहे त्यामुळे वातानुकूलकातून सहा महिने गरम आणि सहा महिने थंड हवा येते. तापमान नियंत्रण नाही. त्यामुळे थंडी किंवा गरमी या दोन्हीने मरायचे नसेल तर वा.कु. चालू करायचा, पंखा चालू ठेवायचा, खिडकी किंचित उघडायची आणि खिडकीपासून ठराविक अंतरावर झोपायचे, बस! आहे की नाही सोपे. एकूण काय तर विजेचा चुराडा.
पण आता मात्र मी ठरवले की हे सगळे थांबवायचे. तडक कपडे बदलले आणि ट्युबा आणायला निघालो. ऊर्जा वाचणार आणि घराचे बारपण जाऊन घरपण येणार म्हणजे एका दगडात दोन पक्षी! मी स्वतःवरच खूश झालो. खाली गेल्यावर जाणवले की थंडी बरीच जास्त आहे. म्हणून सायकलचा विचार सोडला व बस पकडली. नैसर्गिक वायूचे का होईना थोडेसे प्रदूषण झालेच. दुकानात पोहोचल्यावर लक्षात आले की ट्यूबा लावायला आधी भिंतीवर खिळे ठोका आणि थोड्या तारेवरच्या कसरती (वायरींग) करणे गरजेचे आहे ज्यासाठी इमारत व्यवस्थापनाची परवानगी लागते. च्या***, मी भाषिक स्वातंत्र्याचा उपभोग घेत मोकळेपणाने राग काढला. आता मी मोर्चा ऊर्जा वाचवक बल्बांकडे वळवला. ५ डॉलरला १ !!! म्हणजे ६ बल्बांचे ३० आणि बेसिनच्या वरचे बल्ब धरून ५० डॉलर!!! माझ्या निर्धाराची धारच गेली. आता एकच घेऊ आणि बघू चालतोय का व्यवस्थित अशी काहीशी फुटकळ सबब बनवून एक घरी आणला. आणल्या आणल्या त्याच्या शुभ्र चांदण्याने घर न्हाऊ घालण्याचा मोह काही आवरला नाही आणि तडक सगळे दिवे मालवून एक दिवा काढून ठेवला व नवीन लावला. खटॅक - बटण दाबताच सर्पिलाकार बल्ब मधे जीव आला आणि त्याकडे बघण्याचा गाढवपणा करणार्‍या माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले. मिटलेल्या डोळ्यांसमोर बराच वेळ त्या सर्पिलाकार उजेडाची निगेटिव दिसत होती. हळू हळू मी डोळे उघडले. काऽऽऽऽऽऽय? पिवळा प्रकाश? खोक्यावर तर लिहिलेय सॉफ्ट व्हाइट म्हणून. तो दिवा डिफेक्टिव असावा म्हणून परत केला आणि तो तसाच पीतप्रकाशी असतो कळल्यावर त्याचा नाद सोडला.
इथे ही दिवेलागणी होत असताना घरात जमलेल्या हजार प्लास्टिकच्या पिशव्यापण खुणावत होत्या. इतका कचरा फक्त आपल्या घरातून जमतो आणि अशी करोडो घरे असतील. आता हा कचरा कमी केलाच पाहिजे. उद्यापासून प्लास्टीक च्या पिशव्या दुकानातून सामान घेताना नाकारायच्या. पहिल्या मोहिमेत चांगलाच फटका बसल्यावर जरा सोपेच ध्येय घेतले होते. पण कळपाच्या विरुद्ध जाणे कठीणच असावे. कारण इथेही लगेचच दैवाचे फासे फिरले. दुकानात नेहमीप्रमाणे ८-१० पिशव्या मिळाल्या. मी अगदी उत्साहाने त्यातले सगळे सामान ३ पिशव्यांमधे बसवले. एक मोठी पिशवी घरून आणलीच होती. उत्साहात पैसे वगैरे देऊन घरी आलो आणि दुसर्‍या दिवशी लक्षात आले की पिशव्या वाचवायच्या गडबडीत एक सॉसची बाटली वाचवलेल्या पिशवीतच गचकली होती.

उत्तरप्रदेशातील निर्वाचननिर्णयाचा अन्वयार्थ

उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निकालाची बातमी आणि त्याचे विश्लेषण करणारे लेख आज निरनिराळ्या वृत्तपत्रात वाचायलामिळाले. ह्या विषयावर विचारांची देवाणघेवाण करणे सोपे जावे म्हणून मी म.टा. चा अग्रलेख येथे उतरवून ठेवीत आहे.मला विचार करण्यासारख्या वाटलेल्या मुद्द्यांना मी अधोरेखित केलेले आहे. मला आपली ही मते वाचायला आवडेल.

अधिक खाण्याविषयी थोडंसं - पु.ल. देशपांडे

अधिक खाण्याविषयी थोडंसं
- पु.ल. देशपांडे

आजवर अधिक खाण्याविषयी लोकांकडून पुष्कळसं बोलून घेतल्यावर, अधिक खाण्याविषयी मला थोडंसं बोलायला हरकत नाही. 'नकटं व्हाव, पण धाकटं होऊ नये' म्हणतात. त्याच चालीवर 'मठ्ठ व्हावं, पण लठ्ठ होऊ नये'. अशी एखादी म्हण मायबोलीच्या चरणी अर्पण करायला हरकत नाही. जो तो आमचं अन्न काढतो. बहुतेकांची समजूत लठ्ठ्पणाचा अधिक खाण्याविषयी संबंध आहे अशी कां व्हावी मला कळत नाही. कमी खाणारा हा विनोदाचा विषय होत नाही. आता हडकुळ्या माणसाला 'पाप्याचं पितर' वगैरे म्हणतात, नाही असं नाही; पण नाटकां सिनेमांत पापी माणसं मात्र चांगली धटिंगण दाखवतात. पापी माणसांचे पितर हडकुळे असतील हा शोध कोणी लावला देव जाणे. मात्र रावण कंस हिरण्यकश्यप वगैरे ख्यातनाम पापी माणसांचे पितर हडकुळे असतील याच्यावर माझा नाही विश्र्वास बसत. सदैव थट्टेचा विषय आहे तो लठ्ठपणा. खंर म्हणजे त्याच्या निषेधार्थ लठ्ठ माणसांची एक भारतीय पातळीवरून संघटना काढली पाहिजे. बाकी लठ्ठ लोकांची कुठल्याही पातळीवरून संघटना काढली पाहिजे. बाकी लठ्ठ लोकांची कुठल्याही पातळीवरून संघटना काढण्या- ऎवजी जाडीवरूनच काढावी लागेल. हीही एक अडचण आहे. शिवाय भारतीय संघटना म्हणजे आंतरभारतीसारखं 'लठ्ठंभारती' वगैरे नाव यायचं, म्हणजे पुन्हा विनोदच.

अधिक खाण्याविषयी मुख्य राग म्हणजे त्यातून माणसाचा लठ्ठपणा वाढीला लागतो. ही एक चूक आहे. मी शेकडो बारीक माणसं सपाटून खाताना पाहीली आहेत; पण त्यांच्याविरुद्ध अधिक खाण्याचा सकृद्दर्शनी पुरावा नसतो. कितीही खा, ही माणसं अगं धरतच नाही. आणि आमच्यासारखी काही. माणसं एवढंसं खाल्ल तरी त्याची पावती अंगावर मोकळेपणी वागवतात.

अधिक खाण्याविषयी जाऊ दे. पण एकूण खाण्याविषयी बोलण्या वरच एकूण शिष्ट मंडळींचा राग असतो. गवय्ये जसे मैफिलीविषयी कुणाचीही पर्वा न करता बोलत असतात, किंबहूना तबलजी तर अमक्या-तमक्या गवय्याला आपण कसा खाल्ला हेही सांगतात, तसे काय खवय्येही बोलू शकणार नाहीत?पण त्यांना मात्र बोलण्याची चोरी, हे खूप आहे!

अधिक खाण्यामुळं प्रकृती बिघडते, असा एक डॉक्टर, वैद्द वगैरे मंडळीनी आज अनेक वर्ष अपप्रचार चालवला आहे. त्यामागला त्यांचा धूर्त हेतू पुष्कळांच्या लक्षात आलेला दिसत नाही. लोकांनी पोळ्या अधिक खाऊन डॉक्टर, वैद्द वगैरे लोकांना काय फायदा होणार? पोळ्यांऎवजी त्यांच्या औषधाच्या अधिक गोळ्या खाव्या हा त्यांचा सरळ हेतू आहे. त्यात त्यांची चूक काहीच नाही. प्रत्येक जण आपापला माल खपवण्याची धडपड करणारच. पण औषधाच्या गोळ्यांना आपण किती बळी पडावं हे आपण लक्षात घेतलं पाहीजे.

माणसांच थोडंसं मोटारीसारखं आहे. प्रत्येक गाडीला जसं कमी-जास्त पेट्रोल लागतं, तसचं माणसांचं आहे. माझ्या एका स्नेहाचे आजोबा होते. सकाळी उठल्याबरोबर न्याहरीलाच मुळी त्यांना दोन वाट्या श्रीखंड आणि तीनचार लाडू लागत. एवढा ऎवज सकाळी एकदा पोटात गेला, की त्याच्यावर चांगलं शेरभर धारोष्ण दूध घेत. आणि म्हणत, "चला, आता जेवायला मोकळा झालो." बार-साडेबार झाले की भुकेनं व्याकूळ व्हायचे. भोजनाचा तपशील न्याहरीच्या तपशिलाच्या अंदाजानं कुणालाही जेवणाला आधार म्हणून चारच्या सुमाराला चार पदार्थ तोंडात टाकून रात्रीचं जेवण सुर्यास्तापूर्वी घेतआणि शतपावली वगैरे करून चार इकडल्यातिकडल्या गोष्टी झाल्या, की कुठं उकडलेल्या शेंगाबिंगा खाऊन झोपत. झोपण्यापूर्वी लोटीभर दूध घेण्याचं व्रत त्यांनी आजन्म पाळलं वयाच्या ब्यायण्णावाव्या वर्षी ते निजधामाला गेले. आयूष्यात नित्याच्या आहाराप्रमाणे त्यांनी अनेक आघात पचवले. शेवटी शेवटी गेल्या महायुद्धाचा मात्र त्यांच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला. म्हणजे युद्धात होणा-या हानीबिनीचा नव्हे. रेशनिंगचा माणसांचं खाणं मोजूनमापून मिळणार, ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. तर सांगायचं तात्पर्य, अधिक खाणं यातला 'अधिक' हा शब्दच अधिक आहे. त्या अधिकाला काही अर्थच नाही. मोटरला पेट्रोल अधिक लागतं म्हणण्यापैकी आहे हे. कशापेक्षा अधिक हा प्रश्न महत्वाचा. मोटरला स्कूटरपेक्षा पेट्रोल अधिक लागतं. लागणारच त्यांच्या घडणीतच फरक आहे. जे मोटरचं तेच माणसांचं.

काही गोष्टी तर अधिक खाल्ल्याच जात नाहीत. उदाहरणार्थ, उकडलेल्या शेंगा. प्रथम ज्या वेळी आपल्यासमोर ती रास आणून एखादी सुगृहिणी-ह्यादेखील माउल्या आता फारशा राहिल्या नाहीत. जाऊ द्या-तर एखादी सुगृहिणी ज्या वेळी उकडलेल्या शेंगाची रास टाकते त्या वेळी " अहो, एवढ्या कोण खाणार आहे?" असाच आवाज उठतो. आणि काही वेळानं "थोड्या उरकल्यात कां ग?" अशी पृच्छा होते. हे कां? खूप खाण्यानं आरोग्य बिघडतं असा एक लोकभ्रम आहे. माझ्या मित्राच्या न्याहरीला श्रीखंड खाण्या-या आजोबांसारखे मी अनेक जिवंत पुरावे सादर करू शकलो असतो: पण पूर्वीच्या खूप खाऊन ऎंशी वर्ष जगणा-या म्हाता-यांसारखे हल्लीचे ऎंशी वर्षाचे म्हातारे राहिले नाहीत. हल्लीच्या म्हाता-यांत काहीच दम नाही. तरूण असल्यासारखे आपली फिगर बिघडेल म्हणून मोजकं खातात. खरं तर खाण्यानं फिगर किंवा आरोग्य काही बिघडत नाही. ज्याला खूप खाता येत नाही त्याला आरोग्य म्हणजे काय ते कळलंच नाही.तळलेले, भाजलेले, पोळलेले, उकडलेले, शिजवलेले, कच्चे असलेही पदार्थ खाऊन जो टूणटुणीत राहतो तो निरोगी माणूस, बशीत असलेला पदार्थ हा खाण्यासाठी असतो,अशी माझ्या एका खवय्या मित्राची व्याख्या आहे. बशीतून येणारी एकच गोष्ट उचलण्याच्या लायकीची नसते असं त्याचं मत आहे. प्याशनेबल हाटेलात बशीतून येणारं बिल त्याला तेवढा तो हात लावत नाही.

गाण्याप्रमाणं खाण्याचंसुद्धा शास्त्र आए. रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा! तर श्रीखंड पावाला लावून खा," म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे! जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही. खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. राग्याप्रमाणंच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा. बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी दिन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. अधिकचं हे असं आहे. लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहा भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे. खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई. सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे;नव्हे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षिणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचंभरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक. कोजागिरी पौर्णिमेतन आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जाग्रण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर... सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे. हेच गळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी अहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम. पंगती उठवण्याऎवजी कर्कशकर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणा-याचं डोकं उठवायचं.

पण हा काळ जाऊन पुन्हा एकदा अधिक खाण्याविषयीचा अनादर दूर होईल याची मला खात्री आहे. समृद्ध राष्ट्र याची माझी व्याख्याच मुळी भरपूर खाऊन भरपूर पचवणारं राष्ट्र ही आहे. माणसं एकदा खाण्यात गुंतली की काही नाही तरी निदान वावदूक बडबडतरी कमी होईल. बोलेल तो खाईल काय? आणि केव्हा?

"उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" म्हटलंय ते काय उगीच? जठराग्नीला भरपूर आहूती पडल्या पाहिजेत. सध्या जरा ही अन्न-परिस्थितीची लहानशी अडचण आहे म्हणून. नाही तर 'अधिक धान्य पिकवा'सारखी 'अधिक पंक्ती उठवा' ची चळवळ सुरू करायला हरकत नाही. तोपर्यंत खायला मिळतं तेच अधिक म्हणण्या खेरीज गत्यंतर नाही. आजकालचे शेतकरी देखील पूर्वीसारखं लोक भक्कम खात नाहीत म्हणून अधिक धान्य पिकवत नसावेत. तज्ज्ञांनी या मुद्याचा अवश्य विचार करावा ही विनंती.