शंकर पाटील हे मराठी साहित्याला नव्या वाटांवर नेणाऱ्या लेखकांपैकी एक बिनीचे लेखक. दुर्दैवाने त्यांच्या लेखनाची म्हणावी तितकी गंभीर दखल घेतली गेली नाही असे म्हणावेसे वाटते.
त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या हे त्याचे एक कारण असू शकेल. निळू फुले या गुणी नटाला खलनायकाच्या साच्यात अडकवणारे असे हे बहुतेक चित्रपट होते. त्याच चित्रपटांनी शंकर पाटलांना "पाटील - तमाशा - बाई - बाटली - राजकारण" या प्रकारचे(च) लिहिणारे अशा साच्यात ढकलून टाकले. त्यामुळे 'कथा अकलेच्या कांद्याची' सारखे सरस लिखाणसुद्धा फारसे लक्षात राहिले नाही.
गेल्या कांही दिवसात वर्तमानपत्रांत ज्या बातम्या येत आहेत त्या अस्वस्थ करुन सोडणाऱ्या आहेत. तुमचे प्रश्न काहीही असले तरी ते सोडवण्याचा हा कुठला मार्ग ?
ऊस जाळणे, दूध रस्त्यावर ओतून देणे, धार्मिक भावना दुखावल्या गेल्या म्हणून रस्त्यावर नंग्या तलवारी हातात घेउन हैदोस घालणे हे विवेकी मनाला न पटणारी कृत्ये आहेत. आपल्या देशातल्या समाजाला झाले आहे तरी काय?
तरुणवर्गाला हे जे चालले आहे याची काही फिकीर आहे का ? त्यातल्या बहुतांशी तरुणांची अवस्था तर 'झूम बराबर झूम' अशी झाली आहे असे त्यांच्या वागण्यावरुन वाटते. जे तरुण यापासून दूर राहून आदिवासी भागात जाऊन खरी समाजसेवा करत आहेत त्यांना जास्त प्रसिद्धी मिळणे जरुर आहे. पण पत्रकारांना त्यांची (किंबहुना कोणाचीच) पर्वा नाही.
आजच्याच लोकसत्तेमधे " गोव्यातील मद्यालये बंद : पर्यटकांचे हाल " असे शीर्षक आहे. दारुवाचून कोणाचे हाल होऊ शकतात हे आज नवीनच कळले.
मनोगतवर याविषयी इतरांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ही सुरवात.
आमची मिनी म्हणजे एक वात्रट पोरगी आहे.पण तिचा वात्रटपणाही आम्हाला अशा कोड्यात टाकतो की तिच्यावर रागवावे की तिचे कौतुक करावे काही कळत नाही.एकदा तिला मंगळावर घेऊन जाण्याचा मूर्खपणा माझ्याकडून घडला होता तर तिथ ही पोरगी कुठे गायब झाली कुणास ठाऊक आणि सगळ्यांच्या तोंडच पाणीच पळाल कारण तिच्या स्पेससूटमध्ये दोन तास पुरेल एवढाच प्राणवायु होता .दीड तासाने ती कशी काय पण सापडली आणि मग सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.पण ती जेथे सापडली तेथेच मंगळावरील एक अगदी पुरातन संस्कृती नांदत होती तिचे अवशेष असल्याचा शोध लागला आणि तिला सगळ्यानी इतक डोक्यावर घेतल की तिला रागे भरणे शक्यच नव्हते.
दुसऱ्या वेळी कालयंत्राची चाचणी चालू असताना तेथे शिरण्याची दुर्बुद्धी मला झाली. ड़ो. श्रावस्तीने आम्हाला त्या कालयंत्रात किती काल मागे आणि पुढे जाता येते याची माहिती दिली आणि त्यावेळी कक्षात शिरून बटन दाबल्यास विसाव्या शतकात जाता येईल असे सांगितले.आणि चाचणीस कोण तयार आहे विचारले तर तेथील उपस्थित सगळे गप्प! तेवढ्यात ही मिनी कुठून आली कुणास ठाऊक आणि ," मी तयार आहे काका" म्हणून पुढे झाली.म्हणताच माझ्या तोंडचे पाणीच पळाले. " मिन्ये, मागे ये " मी लगेच ओरडलो. " तिला कसलाही धोका नाही प्रोफेसर मुळीच घाबरू नका " अस आश्वासन श्रावस्ती मला देत होता तर ही शहाणी पण म्हणतेय ' हो बाबा तुम्ही मुळीच घाबरू नका !" आणि मग सगळे मलाच हसू लागले.तोपर्यंत ही कालयंत्राच्या कक्षात शिरली , दरवाजा लावून घेतला आणि तिने बटन दाबलेसुद्धा ! डॉ. श्रावस्तीसुद्धा अवाक् होऊन बघतच राहिला. पण तरी सावरून तो म्हणाला ," काळजी करू नका प्रोफेसर ती तीन मिनिटात निश्चित परत येईल. ती तीन मिनिटे मला तीन युगासारखी वाटली सुदैवाने तीन मिनिटाने ती खरेच परत दिसू लागली आणि बाहेर आल्यावर आत आपण काय केले याचे इतके रसभरित वर्णन करू लागली की ती तीन मिनिटांच्या ऐवजी तीन दिवस तर कालयंत्रात नव्हती ना अशी शंका सगळ्यानाच यायला लागली पण त्यामुळे संपात अवकाशकेंद्राबर ती अगदी प्रसिद्ध झाली हे खरेच.
त्यादिवशी असेच झाले.मी ज्या संपात अंतराळसंशोधनसंस्थेत काम करतो तेथील काही काम पूर्ण करण्यास वेळ कमी पडल्यामुळे घरच्या संगणकावर करावे म्हणून एक डाटा सी ड़ी. मी घरी घेऊन आलो. नेहमीप्रमाणेच विद्या माझी पत्नी त्यावेळी घरी नव्हतीच.ती भारतीय भूगर्भ शास्त्र संस्थानमध्ये काम करते आणि तेथून घरी यायला कधीकधी तिला रात्रीचे नऊ वा दहा सहज वाजतात̱ घरात अर्थातच मिनी एकटीच होती.तिला शाळेत काही अभ्यासच नसतो की काय कुणास ठाऊक,तिचा बहुतेक अभ्यास चित्रवाणीसंचावरील शालेय कार्यक्रमातून आणि उरलेला संगणकावरच पार पडतो̱̱ गृहपाठही ती संगणकावर पूर्ण करून ई टपालने शाळेत पाठवते आणि तिच्या दुरुस्त्या आणि ग्रेडस तिला उलट ई टपाली मिळतात.त्यामुळे घरात बहुधा ती आणि तिचा यांत्रव खेळगडी चंद्रमोहन तथा चंदू असतो. त्यामुळे माझ्या कामाच्या सीड़ीज् ना हात न लावण्याची सक्त ताकीद मी मिनीला दिली आणि जरा चक्कर मारायला बाहेर पडलो.
आता चक्कर मारणे पूर्वीसारखे सोपे थोडेच राहिलेय ! त्यासाठी घराबाहेरील सरकमार्गावरून चांगले वीस पंचवीस किलोमीटर जावे लागते तेव्हा कोठे त्यासाठी राखून ठेवलेले मोकळे मैदान लागते.मी मैदानावर पोचलो तर आमचे बॉस डॉ.विजय पण तेथे आलेले दिसले.मला पाहून त्यांचा चेहरा उजळला आणि माझ्याकडे येऊन ते म्हणाले
"बर झाल आपली इथेच गाठ पडली ते नाहीतर विडिओफोनवर मी तुमच्याशी बोलणारच होतो.आज ज्या सीडीज् तुम्ही घरी नेल्या आहेत त्या तशाच उद्या कामावर येताना घेऊन या कारण तुम्ही घरी गेल्यावर आणखी काही संकेततक्ते उपलब्ध झाले आहेत, त्यांचा उपयोग करून आपल्या प्रश्नाची अधिक चांगल्या प्रकारे उकल होईल असे वाटते."
हे ऐकून मला बरे वाटले कारण त्यामुळे उद्या कामावर जाईपर्यंत तरी माझ्या डोक्याची एक कटकट कमी होणार होती आणि मी शांतपणे झोप काढू शकणार होतो.त्यामुळे मनातून आनंदाने पण वरवर नाराज झाल्यासारखे दाखवून मी म्हणालो,
"अरेरे,त्या कामाची तड कुठल्याही परिस्थितीत आज लावायचीच अस मी ठरवल होत." "काही काळजी नका करू,रिलॅक्स " असे म्हणून विजय आपल्या रिंगणाकडे वळले आणि मी माझ्या! मोकळ्या हवेत फिरता येण्यासाठी शहरात एवढीच मोकळी जागा शिल्लक होती व त्यावर रिंगणे आखून ठेवलेली होती.आपल्याला फिरण्यासाठी रिंगण हवे असल्यास त्यासाठी रिंगणाचे आरक्षण करून ठेवावे लागे,सुदैवाने आमच्या कंपनीने आपल्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी काही रिंगणे कायमची राखून ठेवली होती त्यामुळेच मी फिरण्याचा विचार करू शकलो. शहराची लोकसंख्याच एवढी वाढली होती की फिरण्याकरता मोकळी जागा सापडणे ही अशक्यप्रायच गोष्ट होती.
राखीव रिंगणात पुरेशा चकरा मारून मी घरी पोचेपर्यंत विद्याही घरी आली होती. मी घरात शिरतानाच तिन प्रश्न केला ,
" कायरे मी ऐकले ते खर आहे का?"
तिने काय ऐकले ते मला कळण्यापूर्वीच त्याच्या खऱ्याखोट्याची शहानिशा करणे मला शक्य नव्हते पण त्या प्रश्नाचा उत्तरार्ध ऐकून जणु माझ्यावर बाँबगोळाच पडला,कारण ती पुढे म्हणाली,
" अरे वैनतेय ग्रहावरून कोण येतेय आपल्याकडे ?"
एवढी गुप्त गोष्ट हिला कशी कळली याच मला आश्चर्य वाटल कारण ही गोष्ट अगदी गुप्त ठेवायची आहे असे आम्हाला बजावण्यात आले होते त्यामुळे मी तिला झटकून टाकत उद्गारलो,
"छे छे काही तरीच काय बोलतेस ?"
" नाही हे मी बोलत नाही ती तुझी लाडकीच काहीतरी बडबडत होती,आम्ही काय भूगर्भात शोध घेणारी माणस आम्हाला अंतराळातल काय माहीत असणार ?'
मला टोमणा मारीत ती म्हणाली. पण काहीही असले तरी ही बातमी फुटणे हे फारच धोक्याचे होते.विशेषत: जर कुठल्या वार्तावाहिनीला नुसता सुगावा लागला असता तर त्यानी त्या बातमीचा एवढा पिच्छा पुरवला असता की वैनतेयवासीयानी आपला बेत लगेच रद्द केला असता.त्यामुळे याचा बभ्रा होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करणे मला आवश्यक होते त्यामुळे मी गडबडीने म्हणालो,
"ती पोरगी म्हणजे मिनीच ना? ती बडबडली असेल एकादी संगणकरचित कविता आणि तुला वाटले असेल--- असं कशाला तिलाच बोलवून विचारू या की" म्हणून मिनीलाच हाक मारून मी विचारले,"काय ग मिन्ये, काय म्हणतेय आई तुझी ---"
" हे काय हो बाबा,मला कशाला बोलावल आत,मी चांगली चंदूबरोबर स्पेसशटल गेम खेळत होते कंप्यूटरवर आणि आता त्याला मी गाठणार होते आणि तेवढ्यात तुम्ही मला बोलावून गेम पार बिघडवून टाकला. बर आता काय ते लवकर विचारा" मिनी फणकारली.
" बर बर खेळशील पुन्हा खेळ, पण तू आईला काय सांगत होतीस वैनतेयाबद्दल?"
" कुठ काय बाबा,तेच तुम्हालाही सांगतेय ना त्या ग्रहावरच मी चंदूला गाठणार होते ,माझ्या ग्रहाचे ते नाव आहे आणि चंदूच्या ग्रहाचे आहे खद्योत , आता या दुसऱ्या सूर्यमालेत ---"
" बस बस "तिला मधेच थांबवत मी म्हणालो आणि सुटकेचा निश्वास टाकत विद्याला म्हणालो "बघ, ऐकलेस ना झाल समाधान?"
" कार्टीच लक्षण काही खर नाही "टेबलावर ताटं घेत विद्या पुटपुटली.आणि माझा जीव भांड्यात पडला.कारण माझ्याकडे जे सध्या मह्त्वाचे काम होते ते वैनतेयवासीयानी पृथ्वीवर केव्हा आणि कोठे उतरतात याविषयीचे संदेश मिळवण्याचे होते आणि ते अगदी 'टॉप सीक्रेट' ठेवायच्या ऑर्डर्स मला होत्या त्यानुळे ही बातमी जरा जरी लीक झाली तर वैनतेयांनी पृथ्वीवर येण्यापूर्वी मलाच कुठल्यातरी परग्रहाचा आसरा घ्यावा लागला असता माझे आणि डॉ. विजय यांचे मैदानावरील संभाषण त्याच संदर्भात होते.देशोदेशीचे वार्ताहर त्या बातमीवर टपून बसले होते.ते माझा आणि विजय यांचा सारखा पिच्छा पुरवत होते,पण या प्रकारच्या आंतर्विश्वीय बातमीस अफवेचे स्वरूप येणे आणि नंतर आमच्या संस्थेचे हसे होणे हे कुणालाच आवडणार नव्हते त्यामुळे त्याविषयी जास्तीतजास्त गुप्तता बाळगण्यात येत होती.
सध्यापुरता माझा जीव भांड्यात पडला तरीही माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. शिवाय घरात चंद्रमोहन असताना विद्याने ताटे घेण्याचे काम करावे याचेही मला आश्चर्य वाटले व आज्ञाधारक नवऱ्याप्रमाणे तिला मदत करण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो "हे काय घरात चंद्रमोहन असताना ताटे घेण्याचे काम तुझ्याचकडे ?"
"अरे चंदू तरी काय काय करेल एक तर त्या पोरीला खेळवेल नाहीतर मला मदत करेल आणि तुला काय माहीत ती कार्टी माझा जीव किती खातेय.त्यामुळे तो तिला खेळवतोय ना तेच बर आहे.आता खेळली तर रात्री लवकर झोपेल आणि मला काहीतरी काम करायला मिळेल.पुढच्या आठवड्यात भरणाऱ्या कॉंफरन्ससाठी वाचायच्या पेपरसाठी थोड काम करायचेय.तुझा कंप्युटर मला आज वापरता येईल का ?"
" का तुझ्या कंप्युटरला काय झालेय?"
" त्या पोरीन त्याची वाट लावलीय,तिच्या कंप्युटरला मात्र मी हात लावला की येते अंगावर धावून आता आहे की नाही जुलुम ?"
"बघ मग माझ्या कंप्युटरवर काही जमतेय का. भाग्यच माझ डॉ. विजयनी आज घरी काम करू नका म्हणून सांगितलेय "
आणि पुढ मी तिला म्हणालो
. "मला वाटतेय आता आपण लॅपटॉप आणले पाहिजेत."
"त्यापेक्षा मलाच एक लॅपटॉप का आणून देत नाही बाबा म्हणजे तुमचाही कंप्युटर बिघडायला नको" मध्येच मिनीने तोंड वाजवले .तिच बर लक्ष असत आम्ही काय बोलतो त्याकड.
" म्हणजे तू माझा पण कंप्युटर वापरतेस की काय ? तरी तो मी लॉक केलेला असतो, त्याचा कोडवर्ड तुला माहीत नाही ना?"
" तिला कशाला हवाय कोडवर्ड ? तुझा कंप्युटर उघडणे हा तिच्या हातचा मळ आहे ,तुला काय माहीत ती बड्याबड्या हॅकर्सचे बारस जेवली आहे."
"काय सांगतीस काय ? माझा तर विश्वास नाही बसत यावर."
" बघ आई उगीच काहीतरी बाबांच्या डोक्यात भरवू नकोस"बाहेर पळ काढत मिनी म्हणाली
दुसऱ्या दिवशी संस्थेत प्रवेश करताच विजयचा भेटण्याविषयी निरोप आलाच.त्यानी त्यांच्याकडील नव्या माहितीच्या सीड़ीज् घेऊन मी कालच्याच कामाला पुढे सुरवात केली̱. गुप्ततेच्या कारणामुळे हार्ड ड्राइव्हवर कोणतीही माहिती ठेवायची नसल्यामुळे हा उपद्व्याप करावा लागत होता.मी घरी नेलेल्या सीड़ीज् अगोदर मी संगणकावर नक्कल करून घेताना तक्त्यांमध्ये काहीतरी गडबड आहे असे वाटू लागले.पण त्याचे कारण मात्र कळेना डॉ.विजयनी दिलेल्या सीड़ीज् आणि माझ्या या दोन्हींचा मेळही जमेना. हा घोटाळा कसा काय झाला याचा विचार करताना एकदम घरात विद्याशी झालेला संवाद आठवून माझ्या पोटात गोळा उठला.खात्रीने हे मिनीचेच काम. तरीच ती कार्टी काहीतरी वैनतेयविषयी बडबडत होती अर्थात आता हा सगळा गोंधळ निस्तरणे भाग होते आणि त्यासाठी डॉ. विद्याधरांच्या परवानगीने महासंगणकाची मदत घेणे भाग होते.
गेले कित्येक दिवस आमच्या महासंगणकावर सांकेतिक भाषेत काही अनाहूत संदेश येत होते.प्रथम काही दिवस आम्ही तिकडे दुर्लक्ष केले पण संस्थेचे संचालक डॉ. सुदर्शन यांच्या कानावर ही गोष्ट जाताच त्यानी त्याकडे दुर्लक्ष न लरता मुद्दाम स्वतंत्र कक्षच स्थापन करून सर्व संदेशांची छाननी करून योग्य ते निष्कर्ष काढण्याचे काम डॉ. विद्याधरांवर पर्यायाने माझ्यावर सोपवले. त्यातून वैनतेयवासी पृथ्वीवर येऊ इच्छित आहेत आणि तेही आमच्याच शहरात असा निष्कर्ष मी काढला होता अर्थात ही बातमी विश्ववार्ताहरांना किंवा आपल्या कुटुंबियानाही मुळीच द्यायची नाही अशी सक्त ताकीद आम्हा सर्वाना देण्यात आली होती कारण हे वैनतेयवासी येथे कशासाठी येत आहेत याची कल्पना कोणीच करू शकत नव्हते. सध्या पृथ्वीवर शांतता होती आणि ग्रहयुद्धाचा धोकाही दिसत नव्हता तरीही उगीच संशयास जागा ठेवायची नाही असा सुदर्शन याचा आग्रह होता.पंतप्रधानानाही अत्यंत गुप्त बैठकीत ही बातमी सांगण्यात आली होती.आणि त्यानी या बाबतीत लवकरच काय करायचे याचा निर्णय देण्याचे आश्वासन दिले होते.
आताच पंतप्रधानांचा संदेश आला होता,त्यानुसार वैनतेयवासियाना आमच्या शहरात प्रवेश करायला हरकत नाही असे कळवण्यात आले होते,अर्थात याविषयी विश्वप्रमुखांशी त्यानी चर्चा केलेली अस्णार हे उघडच होते. जागतिक अंतराळसंशोधन प्रयोगशाळेतील माहितीनुसार वैनतेय हा एक अतिशय छोटा ग्रह होता,(खरे तर त्यांच्या संदेशानुसार ते वैय्युपथानक्षारतेकिय अशा अगडबंब नावाच्या ग्रहावरून येत होते त्यातील काही अक्षरे घेऊन आम्ही त्याचे सुटसुटीत नामकरण केले होते)पण याहून अधिक माहिती मात्र उपलब्ध नव्हती,पण ज्याअर्थी ते पृथ्वीवर येण्याची परवानगी मागत होते त्याअर्थी त्यांच्याक्डून प्रूथ्वीवासियांना काही धोका संभवत नव्हता.पण हे प्राणी दिसतात कसे ,वागतात कसे याविषयी मात्र काहीही माहिती उपलब्ध नव्हती.त्यांच्याकडून मधून मधून येणाऱ्या संदेशांवरून त्याचा अंदाज घ्यायचा आम्ही प्रयत्न करत होतो पण ते संदेश इतके त्रोटक आणि तुटक असत की त्यांचा अर्थ लावणे अवघड काम होते आणि तो काढलेला अर्थ कितपत बरोबर असेल याविषयीही आंही साशंक होतो.
घरी गेल्यावर मिनीची चांगलीच खरड काढायची असे ठरवूनच गेलो पण आश्चर्य म्हणजे मी घरी पोचलो तेव्हा विद्याही घरातच होती.आणि माझे पाऊल घरात पडताच तिचा पहिलाच प्रश्न होता,
" काय आले की वैनतेयवासी ?" आणि आम्ही एवढी गुप्त ठेवायचा प्रयत्न करत असलेली बातमी याना कशी काय कळली याचे आश्चर्य करायची पाळी माझ्यावर आली.
" काय लावलेय काय तुम्ही कालपासून?"माझ्याकडून तरी गुप्ततेचा भंग न होण्याची दक्षता घेत मी म्हणालो.
" हे पहा कोंबड झाकून ठेवल म्हणून उजाडायच थोडच रहाणार आहे,आता सांगून टाक ना सगळ,आणि तू नाही सांगितले तरी जिकडेतिकडे बातम्या पसरत आहेत.ती मिनी तर त्यासाठी मघापासून बाहेरच गेली नाही.ती तर म्हणतेय ते आपल्याच घरी येणार आहेत."
" त्या कार्टीचच हे सगळ काम ! कुठाय ती?"
"हे काय बाबा तुमच्याबरोबर कुणीच कस नाही? मला वाटल तुम्ही त्यांना घेऊनच येणार म्हणून मी माझ्या मैत्रिणीनाही बोलावले आहे त्यांच्या स्वागताला."
"तुला कुणी सांगितले हे सगळ?"
" सांगायला कशाला पाहिजे ? टी.व्ही. लावून पहा"
"सगळ्या वाहिन्या मघापासून दुसर काहीच दाखवत नाहीत." विद्या पण म्हणाली.
मी झटकन टी. व्ही. सुरू केला आणि खरेच जी बातमी आम्ही गुप्त ठेवायचा आटोकाट प्रयत्न करीत होतो ती अगदी दारोदार पोचली होती.ड़ॉ. सुदर्शन यांची वार्ताहरपरिषद दूरदर्शनच्या पडद्यावर दिसत होती.म्हाताऱ्यान आम्हा सगळ्याना चांगलच बनवल होत. सगळ्या कामाच श्रेय एकट्यानच उपटण्याची त्याला जन्मजात खोडच होती.
"डॉ. सुदर्शन,"एक वार्ताहर विचारत होता,"हे वैनतेयवासी न्यूयॉर्क, लंडन ,मुंबई अशी शहरे सोडून या आडरानात का उतरत आहेत?"
"हा त्यांच्या किंवा आपल्या ठरवण्याचा प्रश्न नाही." डॉ. सुदर्शन यांनी त्यांच्या नेहमीच्या लंबेचवडे उत्तर देण्याच्या शैलीत नोलण्यास सुरवात केली.
"पहिली गोष्ट म्हणजे ते वैनतेयवासी आहेत त्याना लंडन,मॉस्को,न्युयॉर्क, दिल्ली,यापैकी काहीही माहीत नाही.आता मी तुम्हालाच विचारले की वैनतेय ग्रहावर तुम्ही जाणार असाल तर कोणत्या शहरात जाल तर याला तुम्ही काय उत्तर द्याल?" असा प्रश्न विचारून त्या वार्ताहराचीच त्यानी फिरकी घेतली आणि मग तो गप्प बसल्यावर पुढे म्हणाले," असे करा हा प्रश्न ते येतील तेव्हा त्यानाच विचारा.माझा अंदाज--- कृपया अंदाज असे मी म्हणतो हे लक्षात घ्या नाहीतर डॉ. सुदर्शन वैनतेयवासियांच्या सदैव संपर्कात असून त्यांची कार्यक्रमपत्रिका त्याना मिळाली आहे असे तुम्ही लगेच प्रसिद्ध कराल किंवा एकाद्या वैनतेयवासिनीच डॉ. सुदर्शन यांच्यावर प्रेम बसल्यामुळे तिच्या आग्रहावरून ते येथे येत आहेत असेही छापायला तुम्ही कमी करणार नाही."
वार्ताहराला आपण पुरेस छळल आहे अशी खात्री झाल्यावर हसतहसत पुढे ते म्हणाले, " अहो तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायच असेल तर तुम्ही जवळचा मार्ग कोणता याचा विचार करता तसाच त्या बिचाऱ्यानी केला असेल आणि त्यांच्या ग्रहाच्या ज्या बिंदूपासून ते निघाले त्यापासून सुदैवाने आम्ही सगळ्यात जास्त जवळ असण्याची शक्यता असल्यामुळे ते इथे येत आहेत.बस एवढ साध आणि सोप उत्तर आहे त्या प्रश्नाच"
" वैनतेयवासींच्या आकृतिरेखा आणि आकारमान याविषयी आपण काय सांगू शकाल काय व त्यांच्या येथे येण्याचा हेतु काय असावा?" लगेच दुसऱ्या वार्ताहराला कंठ फुटला.
" त्यांच्या संदेशावरून केवळ मैत्रीपूर्ण भावनेतून ते येथे येत आहेत यात शंका नाही.त्यांच्या आकारमान आणि बाह्यरूपाविषयी काही सांगणे अवघड आहे कारण त्यांच्याकडून येणारे संदेश सांकेतिक भाषेत येत आहेत आणि मध्ये अनेक अडथळे असल्याने ते अतिशय अस्पष्ट आहेत त्यामुळे याविषयी कृपया मला माफ करा."
वार्ताहर परिषदेनंतर पंतप्रधानांचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राला संदेश दाखवण्यात आला.त्यानी वैनतेयवासियांच्या स्वागतास सर्वानी तयार रहावयास सांगितले आणि हा आपल्या खुल्या आर्थिक धोरणाचा विजय असल्याचे जाहीर केले ,वैनतेयवासियांना भारताच्या आर्थिक धोरणात येवढा रस उत्पन्न झाल्याचे पाहून माझा ऊर आनंदाने भरून आला.
एवढे सगळे झाल्यावर मला गुप्ततेची शपथ पाळण्याचे काहीच कारण नव्हते,मी त्या दोघींना सांगून टाकले."ते उद्याच येत आहेत" आणि मला एकदम मोकळे झाल्यासारखे वाटले,त्या मिडास राजाच्या न्हाव्याला जसे राजाला गाढवाचे कान आहेत हे सांगितल्यावर वाटले अगदी तसे !
दुसरा दिवस अगदी जल्लोषात आणि वातावरण बेभान करतच उजाडला. शहरात जिकडेतिकडे जल्लोष चालू होता. सगळे शहर वैनतेयवासियंच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.मी बाहेर नजर टाकली तर मोठमोठे बलून्स हवेत तरंगत होते व त्यावर "वैनतेयवासियांचे स्वागत असो!"असे निरनिराळ्या भाषांतून लिहिले होतें. निरनिराळ्या संस्थांनी स्वागताच्या गाण्याच्या ध्वनोफिती इतक्या जोरजोरात लावल्या होत्या.की त्या आवाजाने कान किटून वैनतेयवासी पुन्हा परत निघून जातील अशी भीती मला वाटू लागली.
सर्व रस्ते गर्दीन ओसंडत असल्यामुळे कामाच्या जागी पोचायला नेहमीपेक्षा मला बराच उशीर झाला.मी पोचण्यापूर्वीच डो. सुदर्शन आपल्या जागेवर आलेले होते ," या आणि घ्या ताबा तुमच्या संदेशवाहकाचा,आताच त्यांचा संदेश आलाय तो मी घेऊन ठेवलाय, संदेश होता," आम्ही पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत आहोत." मी माझ्या संगणकावर काही संदेश येत आहेत का याची नोंद घेऊ लागलो. माझ्या संगणकावर सांकेतिक भाषेत एक संदेश दिसत होता,"आम्ही आमच्या उतरण्याच्या जागेपासून पाच अक्षांश आणि तीन रेखांश अंतरावर आहोत." पाच मिनिटातच पुढचा संदेश उमटला आम्ही उतरत आहोत .या जागेचे अक्षांश ३७ आणि रेखांश ५५ आहेत"
"म्हणजे ते शहरात आले आहेत" मी जवळ जवळ ओरडलोच कारण आमच्या शहराचेच ते अक्षांश रेखांश होते. डो. सुदर्शन अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागले.पण पुढे काहीच घडेना. संदेश येणे थांबले होते. एकदम विडिओफोनवर संदेश ऐकू येऊ लागला "आम्ही उतरलो ते स्थान एक जंगल आहे आणि एक टेकडी पण येथे दिसत आहे" मी लगेच डॉ. विजय आणि डॉ. सुदर्शन याना ही बातमी दिली.आमची संस्था शहरापासून दूर एका जंगलाच्या कडेसच होती आणि ते जंगल एका टेकडीच्या पायथ्याशी होते थोडक्यात वैनतेयवासी आमच्या संस्थेच्या मागील बाजूस कोठेतरी उतरले असणार. र्ड़ॉ. सुदर्शन यानी लगेचाच आमचा सगळा फौजफाटा डॉ. विद्याधरांच्या मदतीस देऊन आम्हा सगळ्यांना तिकडे पिटाळले. वार्ताहर तर केव्हाच तिकडे पळायला लागले होते.खरे तर या वार्ताहरांना जमले असते तर त्यानी वैनतेयावर जाऊनच त्यांना आणले असते. वार्ताहर पुढे गेल्यामुळे त्यांच्यापैकी काहीजणानाच वैनतेयवासी समजून आमच्या मागे असलेले वार्ताहर त्यांची मुलाखत घेतील असेही मला वाटून गेले.आमच्यापाठोपाठ स्वागतोत्सुक नागरिक, शाळाशाळांतून आलेले मुलांचे थवे,असे सर्वजण त्या जंगलात शिरले.या वैनतेयवासियानी आमच्या सुरक्षाव्यवस्थेची अगदी वाट लावून टाकली होती.
आम्ही सर्व जंगल पालथे घातले पण व्यर्थ ! वैनतेयवासी खरच आमच्या स्वागताच्या कल्लोळाने घाबरून परत गेले की काय,मी मनात म्हणालो.आणखी एका गोष्टीचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते ते म्हणजे या सगळ्या गोंधळात मिनीचा कुठेच पत्ता नव्हता.
युद्धस्य कथा रम्यः अशी एक सर्वमान्य समजूत असल्याने असेल, लष्करी आयुष्याबद्दल आतापर्यंत बरेच काही लिहिले गेले आहे.
खुद्द लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलेली आत्मचरित्रे हा एक मुख्य प्रकार. अर्थात मराठीत आतापर्यंत असले लिखाण कमीच. १९६२ च्या चीन युद्धात बंदी होण्याचे भोग भोगलेल्या एका कर्नलचे आत्मचरित्र हा एक अपवाद (दुर्दैवाने पुस्तकाचे वा लेखकाचे नाव आत्ता आठवत नाही; क्षमस्व). जनरल एस एस पी थोरात यांचे आत्मचरित्र वाचल्याचे पुसटसे आठवते, पण खात्री देता येत नाही.
परवाच माझ्या आवडत्या कवयित्री श्रीमती शांता शेळके यांची ही कविता इ-पत्राने आली आणि इथे सर्व मनोगतींसाठी द्यावी असे वाटले.
rep
हा लेख म्हणजे खूप दिवसांनी मला आवडलेला शिरीष कणेकरांचा एक खुसखुशीत लेख! आजकाल तथाकथित तज्ज्ञ जगाच्या कानाकोपऱ्यात मिळतात. (जाणकारांची क्षमा मागून)
त्या क्षेत्रात कर्तृत्वशून्य व्यक्तीला का बरे महत्त्वाची जागा मिळते? कारण साध सोप आहे.लोकांना निखळ करमणूक हवी असते. सर्व प्रकारचे माध्यमे ही करमणूकीला प्राधान्य देतात; शिक्षणाला नाही. आणखी काही कारणे आहेतच. तुमचे काय मत आहे?
युरोपात पोचल्यामुळे माझ्या मनातला हर्ष गगनांत मावेनासा झाला होता. पण युरोपच्या त्या भूमीवरून नजर वर करून समोर पाहताच पायाखालची जमीन सरकते की काय असा भास झाला, कारण खांद्याला स्वयंचलित बंदुका अडकवलेल्या व कमांडोजसारखा वेष धारण केलेल्या सैनिकांचा एक छोटा जथा समोर उभा होता. त्यातल्या चार पांच जणांनी सर्व प्रवाशांना एका रांगेतून चालवत प्रवासकक्षात (ट्रान्जिट लाउंजमध्ये) नेले. उरलेले सैनिक बहुधा रिकाम्या झालेल्या विमानात तपासणी करायला गेले असावेत. हे सगळे कशासाठी चालले होते याचा सुगावासुद्धा कोणीही प्रवाशांना लागू दिला नाही. फार फार तर "नॉर्मल सिक्यूरिटी प्रिकॉशन्स" एवढे संक्षिप्त उत्तर मिळाले.
इंटरनेट वर मी वर्ल्ड व्हिजन नावच्या एका संस्थेची वेबसाइट बघतोय. ही संस्था गरीब देशातील मुलांसाठी पैसे गोळा करते. "स्पॉन्सर अ चाइल्ड" ही त्यांची योजना मला खूपच आवडते. म्हणजे अमुक एक मुलासाठी आपण काही रक्कम देणगी म्हणून द्यायची. पण ते पैसे त्या मुलाला थेट न मिळता, त्याच्या मुहल्ल्या च्या भल्यासाठी वापरले जातात. माझ्या मनात एकाएकी परोपकाराची भावना जागृत होते. आणि जोषातच मी कुणातरी बालकाला "स्पॉन्सर" करण्याचा निर्णय घेतो.
थोडावेळ ती वेबसाइट सर्फ केल्यावर मला असं कळतं की आपण आपल्याला हव्या त्या प्रदेशातील बालक निवडू शकतो देणगी देण्यासाठी. ह्यावर अचानक माझा देशाभिमान जागृत होतो. पैसे द्यायचेच तर निदान भारतातल्या मुलासाठी तरी द्यावेत, असा विचार करून मी अधिक गरजवंत दिसणाऱ्या आफ्रिकन मुलांच्या फोटोंना बाजूला सारतो आणि भारतीय मुलांकडे वळतो.
भारतातील मुलांचे फोटो बघताना, माझ्या असं लक्षात येतं की दक्षिण भारतीय मुलांची संख्या अधिक आहे. मग अचानक माझा भाषाभिमान आणि महाराष्ट्राभिमान जागृत होतो. त्या सुनामीग्रस्त दक्षिण भारतीय मुलांना मी बाजूला सारतो आणि मराठी मुलांचा शोध घ्यायला लागतो. मुलांची भाषा तिथे लिहिलेली नसते, पण शहर मात्र लिहिलेलं असतं. त्यामुळे महाराष्ट्रातलं शहर आणि त्यातल्या त्यात मराठी वाटेल असं नाव असलेल्या बालकासाठी देणगी द्यायचं मी निश्चित करतो.
शोध घेता घेता, एक इटुकल्या पिटुकल्या मुलीचा फोटो माझ्यासमोर येतो. "भाग्यश्री" नाव असतं तिचं. पुण्याची मुलगी आणि नावावरून मराठी वाटतेय आणि काही महिन्यांचीच आहे, एवढ्या भांडवलावर, मी तिला "स्पॉन्सर" करण्याचा निर्णय घेतो. तेवढ्यात वेबसाइट च्या तळाला "वर्ल्ड व्हिजन ही ख्रिश्चन संस्था आहे" अशी टीप दिसते. अचानक माझा हिंदू धर्माभिमान जागृत होतो. पैसे सरळ वनवासी कल्याण आश्रमाला द्यावेत का असा एक विचार मनात येतो. मनाची चलबिचल होते. पण पुन्हा तो भाग्यश्रीचा हसरा फोटो मला लाइन वर आणतो.
तरीही पैसे भरण्याच्या आधी मी भरलेल्या पैशांवर आयकरातील ८०जी सवलत मिळेल की नाही ह्याची खात्री करून घेतो. आता तर माझा निर्णय अधिकच पक्का होतो. देशाभिमान, भाषाभिमान यांची गोंजारणी, आयकरात सवलत आणि कुणा गरजूला मदत केल्याचं पुण्य, ह्यापेक्षा आणखी काय हवं? मी भराभर माझं नाव, पत्ता, देणगीची रक्कम, भरतो आणि "स्पॉन्सर भाग्यश्री" वर क्लिक करतो. आपण एक अतिशय परोपकारी काम केल्याच्या जाणीवेनं माझा ऊर भरून येतो.
पुढच्याच स्क्रीन वर पैशाच्या भराण्याबाबत माहिती भरायची असते. ते करता करता माझ्या असं लक्षात येतं की माझं क्रेडिट कार्ड वापरून पैसे भरायची सोय ह्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. थोड्या दिवसांनी प्रयत्न करा, अशी सूचनासुद्धा स्क्रीन वर येते. तेवढ्यात बायको भजी आणि चहा घेऊन येते. देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती आणि भाग्यश्री, सगळेच चहाच्या कपात विरघळून जातात......
........माझ्या नावाचं जाडजूड पाकीट पत्रपेटी मध्ये पाहून मला आश्चर्यच वाटतं. कुतूहलाने मी ते पाकीट उघडतो. त्यात वर्ल्ड व्हिजन ने मला पाठवलेलं आभारप्रदर्शनाचं पत्र असतं, मी भाग्यश्री ला "स्पॉन्सर" केल्याबद्दल. सोबत तिचा एक छानसा हसरा फोटो. मी चक्रावूनच जातो. पैसे न भरता हे पत्र कसं काय आलं असावं? पुन्हा देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती डोकं वर काढायला लगतात. भाग्यश्रीचा हसरा फोटो मनाला टोचणी लावतो. तातडीने मी वर्ल्ड व्हिजन ची वेबसाइट उघडतो. पण आता तिथे स्पॉन्सर करण्यासाठी तिचा फोटो नसतो.
पत्रातून त्यांचा फोन नंबर समजतो. मी फोन लावतो पण त्यांचं कार्यालय आता बंद झालेलं असतं. आता काय करावं? असा विचार करता करताच मी ती कागदपत्र आणि तिचा फोटो पाकिटात टाकतो. टी. व्ही. वर क्रिकेटचा सामना सुरू होतो. ते पाकीट मी कपाटाच्या एका कोपऱ्यात सरकवतो आणि सचिनची फटकेबाजी बघायला टी. व्ही. समोर बसतो. दुसऱ्याच चेंडूवर सचिन बाद. सचिनला, त्याच्या जाहिरातींना आणि भारतीय संघाला दिलेल्या शिव्यांमध्ये पुन्हा एकदा देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती आणि भाग्यश्री विरून जातात......
...........मी माझा इ-मेल उघडतो. वर्ल्ड व्हिजन कडून मला एक इ-मेल आलेला असतो. विषय - "Your ID 1047587" मजकूर,
"Its very unfortunate that your sponsor child, Bhagyashree had high fever and fell sick. Failing to recover from her sickness, the girl passed away last week"
महाराष्ट्र टाईम्स मधला हॉट दिसण्याची स्पर्धा हा लेख वाचला. हि स्पर्धा काहीच उपयोगाची नसली तरी ती अस्तित्वात आहे हे नाकारता येणार नाही.हा लेख वाचण्यासाठी इथे टिचकी मारा. कपड्या पासून सर्वच गोष्टींसाठी चुकीची गरज दाखवून काही जाहिरात कंपनी विशेषता मुलींना आपल्या जाहिरातीच लक्ष बनवतात. १९९४मध्ये ऐश्वर्या रॉयला विश्व सुंदरी बनवण्यामागे भारतीय बाजारपेठ लक्षात घेतली असावी का ? ती सुंदर आहे यात काही प्रश्नच नाही पण त्या स्पर्धेत घडलेल्या त्रुटींमुळे अस वाटत.
त्याच त्या बातम्या वाचुन कंटाळल्याने वैभव बाहेर आला. सकाळी गॅलरीतुन समोरच्या बसस्टॉपचं निरिक्षण करणे हा त्याचा आवडता टाईमपास होता. आज रविवार असल्यामुळे तशी गर्दी कमी होती त्यामुळे तिथे असणार्या निवडक लोकांवरुन त्याची नजर फिरु लागली, आणि अचानक..