बुडापेष्टमध्ये श्रावणी

चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायानूं!
गेल्या वर्षी प्यारीसमध्ये आयफेल टावरसमोर आम्ही दणक्यात होळी साजरी केली त्याचा वृत्तांत आपणांपर्यंत पोचवला होताच. 'बंभोले' च्या गजराने आणि मनगटे ओली करुन केलेल्या शंखध्वनीने आम्ही टावरजवळचा परिसर दणाणून सोडला होता. 'शिवजीका प्रशाद' म्हणून ऐनवेळी भांग न मिळाल्याने छगन्याने हाताला लागतील ते सगळे द्रव पदार्थ एकत्र मिसळले होते. धागिनतिनकधिन धागिनतिनकधिन असे नाचत असतानाच फ्रेंच पोलीसांच्या गाडीचा जवळ येत असलेला आवाज एवढेच आम्हाला आज स्मरते. नंतर चांगल्या वागणुकीमुळे आम्हाला सहा महिने सूट मिळाली आणि श्रावणाच्या पहिल्या दिवशीच आम्ही आणि छगन्या बाहेर आलो. ज्या देशात आमच्या महान हिंदू संस्कृतीची जाण नाही तो देश त्यागणे इष्ट असे जाणून आम्ही बुडापेष्ट नगरीत डेरेदाखल झालो. "जगाला आपल्या संस्कृतीची ओळख करुन द्यायची असेल तर देशोदेशींच्या टकलांवर आपल्या संस्कृतीचे केशरोपण झाले पाहिजे" हे प. पू. आत्मारामबुवा शेंडे गुरुजींचे उद्गार आमच्या दोन्ही कानांत, विशेषत: उजव्या कानात सतत घुमत असतात (गजाकाका आणि आजोबा प्रकरणापासून आमच्या डाव्या कानाला अंमळ कमी ऐकू येते). आपण जिथे जाऊ तेथे आपले सण, आपल्या शेंड्या, जानवी, सोवळी, आपले कर्दळीचे खुंट, आपली पंचमुखी रुद्राक्षे, आपल्या आंब्याची तोरणे आणि कष्टमचा डोळा चुकवून जुन्या धोतरात बांधलेले गंगाजलाचे गडू घेऊन जाऊ असा आम्ही चंग बांधला आहे. जिथे जाऊ तेथे आपल्या बंधुभगिनींना एकत्र आणू, आपले त्या त्या देशातले सांस्कृतिक मंडळ स्थापू, त्याच्या चिटणीसाच्या पदासाठी मारामाऱ्या करु, "गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात किती डालर खाल्लेस रे पेंडशा, हरामखोरा" या सदाबहार वाक्यात  स्थळानुसार कधी युरो तर कधी दिरहाम, कधी गोडबोल्या तर कधी गोगट्या, कधी हलकटा तर कधी मायजयां एवढाच बदल करु, म्याकडोनाल्डच्या समोर उभे राहून लसणीच्या ठेच्याच्या आठवणी काढू, कोकचे टिन खाली ठेवताठेवता 'गावाकडचे काय ते ताजे ताक, ती आंबील, ते ताज्या कैरीचे पन्हे' असे गळे काढू असे आमचे - म्हणजे माझे आणि छगन्याचे - पक्के ठरले आहे.  आष्ट्रेलियामधले आमचे प्रतिनिधी चिदानंद सिद्धापुरमठ म्हणतात, "जागतिकीकरणाच्या रेट्यात आपली परमपूज्य संस्कृती इलाष्टिक तुटलेल्या अंडरप्यांटीसारखी ढिली पडली आहे. तिला- म्हणजे आपल्या संस्कृतीला-  पुन्हा ताठर करायचे असेल (चिदानंद एक अत्यंत लोकप्रिय पण जरासे नाजूक औषध तयार करणाऱ्या कंपनीत काम करतात), तर तर तिला गोमूत्रापासून सत्यनारायणाच्या तीर्थापर्यंत सर्व संस्कृतीअर्कांचे सलाईन लावले पाहिजे. आज इंफोसिसने बोनस शेअर जाहीर केला आहे, पण तरीही येशूदासला मंदिरात प्रवेश वर्ज्यच आहे. जागतिकीकरणात असली प्लाष्टरे घालून आपल्या संस्कृतीचे फ्रॅक्चर सांधले जाणार नाही". त्यांच्या शेवटच्या दोन वाक्यांचा आम्हाला अद्यापि नीटसा अर्थ लागला नाही.

मराठी का डेंजर आहे?

मित्रांनो,

      मी अमेरिकेमधे येउन आता २ पेक्षा जास्त महिने झाले. एवढ्या दिवसांमधे मी खूप उंडारलो. इतरांची मदत घेउन इथली भाषा आणि वागण्याच्या तऱ्हा उचलल्या आणि त्या बोलताही यायला लागल्या आहेत. तर एक निरीक्षण.. कृपया तुम्हाला या विषयी काय वाटतं मला ऐकायला भयंकर आवडेल.... जरी मला इंग्रजी मधे धाडधाड बोलता येत असलं तरी जेव्हा काहीही जोषात बोलायचं असलं कि मराठी स्लँग ची प्रकर्षानं आठवण येते. इथे इंग्रजी मधे झालेल्या मराठी किंवा इतर कुठल्या भेसळीचं या लोकांना फार काही वाटत नाही. आपल्याला शुद्ध पणाची एवढी हौस का असते काय माहित? रापचिक, ठासणे, अशक्य मजा येणे, उंडाव टाकणे, बळं बळंच, नाकात जाणे अशा आणि अशा कित्येक गोष्टी आणि साहजिकच अजून खंडीभर सेन्सॉर्ड गोष्टी....... खाली दिलेल्या प्रसंगांसाठी स्लँग सुचवा. अणी मला सांगा की ह्या स्लँगच्या मूड मधे तुम्हाला खाजऊ ची चिन्हं दिसतात का? खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण......

व्हॅटिकनमध्ये महाराष्ट्रदिन

गेल्या वर्षी इस्रायलमध्ये महाराष्ट्रदिन साजरा झाल्याचे कळले होते, हे सर्वांना आठवतच असेल. आजच्या म.टा.त देशोदेशीसाजऱ्या झालेल्या महाराष्ट्रदिनासंबंधी ही लेखवजा बातमी वाचून बरे वाटले. सर्वांना समजावी आणि विचारांची देवाणघेवाण करणे सोयीचे व्हावे म्हणून ती येथे उतरवून ठेवत आहे.

इन्स्पेक्शन

मधली सुट्टी व्हायची वेळ जवळ येत होती आणि तिच्या पोटातले कावळे अजूनच ओरडायला लागले होते. मराठीची कसलीतरी कविता जोशीबाईंनी शिकवली होती. शेजारच्या 'ब' तुकडीतून भोसले बाईंचा आवाज इकडेही ऎकू येत होता. त्या भोसले बाईंपेक्षा आपल्या जोशीबाई बऱ्या म्हणायच्या. चौथी 'अ' चा हा वर्ग होता, दुपार होत आल्याने मुलांची चुळबूळ वाढलीच होती. मग कुणाला नं १ ला जायचे होते तर कुणाला तहान लागली होती. कुणी शेजाऱ्याला आपण डब्यात काय आणलंय हे सांगत होतं तर कोणी पेंगत होतं. अशातच शिपाई एक सूचना घेऊन वर्गात आला आणि सर्व एकदम शांत झाले. शिपाई आला की कधी कधी शाळा लवकरही सुटते हा अनुभव आल्यामुळे ही शांतता.

मनाचे श्लोक

नमस्कार

दैनिक सकाळमधे, प्रेरणा पुरवणीत, दर गुरुवारी. एक एक मनाचा श्लोक आणि त्याच्यावर विवरण येते. दिनांक ०३ मे, गुरुवार या दिवशी ३४ वा श्लोक आला आहे.

कोणाकडे त्या श्लोकांची कात्रणे असतील तर त्यानी मला कळविल्यास मी त्यांच्या झेराक्स काढून कात्रणे परत करीन

व्योमक्षेमं वहाम्यहम

आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस!

राव सांगता ....

सकाळचे जेमतेम नऊ वाजत होते. परंतु सूर्य ३१ मार्चला तडफेने देयके मंजूर करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या (अथवा महापालिका अथवा अन्य 'खाण्या'सारख्या खात्यातल्या) कारकुनासारखा झटून कामाला लागला होता. डांबराचा काळेपणा त्याकडे पाहताच थेट मस्तकाला भिडत होता.

सच्चा विज्ञानप्रसारक

कालच्याच ईसकाळात हा अग्रलेख वाचायला मिळाला. वैज्ञानिक विषयांवर मराठीतून लिहिण्याची आवड आणि क्षमता असणाऱ्यांसाठी बोधक ठरेल ह्या हेतूने तो येथे उतरवीत आहे.

ईसकाळचा अग्रलेख (क्र. २) : सच्चा विज्ञानप्रसारक 
दि. ४ मे २००७

मी सखाराम गटणे

"मी सखाराम गटणे. छप्पन सशांची व्याकुळता साठवणाऱ्या लहानशा भावशून्य डोळ्यांचा. अर्ध्या विजारीत पांढरा शर्ट खोचून प्राज्ञ मराठी बोलणारा. झकास अक्षर असूनही इतरांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणारा. आणि, अर्थातच तोंडात दातांच्या ऐवजी छापखान्याचे खिळे बसवलेला.

झोप

संध्याकाळचे साडेसहा सात वाजलेत. नुकताच अंधार होवू घातलाय. संधिप्रकाशाने आसमंत व्यापलाय. आजूबाजूची गर्द हिरवाई जाग्या होत असलेल्या अंधारामुळे अधिकच गर्द दिसू लागलेय. आम्ही अकरा जण रांगेत उभे आहोत. सगळ्यांच्या चेहेर्‍यावर "दमणूक" हीच चार अक्षरं दिसतायत.... आम्ही बसत का नाही? छे, शक्यच नाहीये ते..... एका बाजूला कडा आणि दुसर्‍या बाजूला दरी. मधे जेमतेम दोन पावलं मावतील एवढी जागा एकामागोमाग अकरा जागा व्यापून आम्ही उभे....काय गरज होती trek ला यायची? तोपण इतका अवघड. घरी आरामात तंगड्या वर करून बसलो असतो आणि TV पाहिला असता....

थोडावेळ आजूबाजूचं भानच जातं. कालपासूनचा घटनाक्रम डोळ्यासमोर येतो. काल अनंतचतुर्दशी, शुक्रवार. घर ते ठाणे, संध्याकाळी साडेसातची लोकल. ठाणे ते पुणे रात्रीची एस्टी......छे लाल डब्यात झोप काही ती मिळत नाही....मग दगडूशेटची मिरवणूक. दोन तीन तास पायपीट. सकाळी लेट झालेली एस्टी. तोरण्याचा पायथा. सापांपासून सावध राहायला सांगणारा तो पोलिस. तीन तासांत तोरणा सर. जेवण. समोर दिसणारा राजगड. तोरण्यावरचा बुधला आणि बुधल्याच्या डाव्या बाजूने खाली उतरणारी पायवाट. मग जीतोड चाल. फक्त चाल चाल आणि चालच.........जांभई येतेय का? इथे? आता? कधी झोपलो होतो शेवटी? परवा. बरोबर, जांभई.....

पुढे गेलेल्या दोघांच्या हाका उरलेल्या अकरांची गुंगी उडवतात. राजगड तर समोर आहे, अगदी समोर. कड्यांपर्यंत जाऊ शकतो, पण वर जायला वाट नाही. दहा जणांची गुंगी आणि अकराव्याची झोप उडते.......जेवढं अंतर आलो तेवढं परत चालायला लागणार. मघाशी वाटलं होतं वाट चुकलो म्हणून.........सव्वीस पावलं माघारी वळतात. समोर एक आदिवासी पाडा दिसतोय. सर्वानुमते थांबायचा निर्णय होतो......पण त्या पाड्यापर्यंत जायचं म्हणजे अजून एक तास तरी जाणार, मग गडावरच का जाऊ नये.....

तेवढ्यात एक मावळा समोरून येताना दिसतो. तो तेराही जणांना गडावर पोहोचवायचं आश्वासन देतो, अवघ्या शंभर रुपयात.....फक्त शंभर रुपये? गंडवत तर नाहीये ना? नसेल.......आता तेरामध्ये दोन तट पडतात. काही म्हणतात आज राजगड शक्य नाही. खाली राहूया. दुसरे म्हणतात. ही तर हार. राजगड सर करायचाच...... थांबावं की जावं?.....पाय म्हणतात थांबावं, मन म्हणतं जावं. मी पायांना थोपवतो आणि मनाला मानतो.

आता आम्ही चौदा. पुढे मावळा, मागे तेरा.......हा कुठे चालला झाडीत? ह्याला तरी माहिती असेल ना राजगडाचा रस्ता? बहुतेक असेल......झाडीत शिरल्यावर अंधार. विजेर्‍या बाहेर येतात. चौदा जणांकडे मिळून तीन. पहिली मावळ्याच्या हातात. दुसरी तेराव्याकडे आणि तिसरी मध्ये कुठेतरी.......कुठे चाललोय? चढतोय खरे म्हणजे वरंच जात असणार....

एक छोटंसं पठार. दोघंतिघं विश्रांती मागतात. दिली जाते. पाणी. पाणी संपतंय. रेशन करायला हवंय. सातव्याच्या पायांत गोळा आलाय. सातवा सगळं पाणी पितो. उरलेल्यात मीठ घालून त्याच्या हातात दिलं जातं..... नक्की पायांत गोळा आलाय का पाण्यासाठी? छे, सातवा असं करणं शक्य नाही......

पुन्हा मावळा पुढे आणि तेरा मागे. सातवा मधून मधून रडतोच आहे. पुन्हा चौदा उतरायला लागतात.....उतरणं नको. जेवढं उतरू तेवढंच पुन्हा चढायला लागणार.......पाय नाराज. मावळा समोरचा डोंगर दाखवतो. ही टेकडी पार केली की चिकटलोच गडाला. पायांची नाराजी थोडीशी कमी.....ह्याला नक्की रस्ता माहितेय का?...

टेकडी पार होते. छोटंसं पठार.....दिवे? हा दिवा कसला? रायगडावर दिवे होते माहीत होतं राजगडावर कधी?.......झुडुपांतून बाहेर पडल्यामुळे वाढलेल्या प्रकाशाला डोळे सरावतात. पांढर्‍या दिव्याच्या जागी पौर्णिमेचा चंद्र दिसायला लागतो..... अप्रतिम. पांढरा शुभ्र दुधासारखा. डागही किती स्पष्ट दिसतायत. अरे कुठे गेला? झाडाआड?.... चौदा पुढे चालत राहतात. आता शेवटचा वाटावा असा खडा चढ. पाय पुन्हा रडतात. सातवाही रडतो. दोघांना वर असलेल्या थंड पाण्याच्या टाक्यांची गाजरं.

...पोचलो....संजीवनी माची. पाण्याच्या टाक्या....चांगलं असेल का पाणी? कसंही का असेना....ग्लूकोजचे पुडे आणि त्यावर हवं तेवढं पाणी. पाय शांत, पोट शांत, मन शांत. विडीकाडीवाले विड्या शिलगावतात. मावळा पण एक विडी घेतो. पांढर्‍या विडीचं त्याला नवल. तो सगळं पाकीट ठेवून घेतो. दुसर्‍याला खरं तर त्याचं पाकीट परत हवं असतं. पण गडावर पोहोचल्याच्या खुशीत तो दिलदार होतो.

मावळा परततो. आता पहिला परत पहिला होतो. त्याच्या पाठून बारा बालेकिल्ल्याच्या दिशेने निघतात. बालेकिल्ला बाजूला ठेवून तेरा पद्मावतीच्या दिशेने चालतात. थोडा वेळ चालल्यावर पद्मावती माची येते.....देवळात राहायचं होतं पद्मावतीच्या. आहे का जागा? आत लोकं झोपलेयत. आता काय ह्या थंडीत उघड्यावर झोपावं लागणार की काय? दारूखाना बघूया. दारूखान्यात एक दोनच आहेत.....

सगळे तेरा दारूखान्यात शिरतात. मी माझी सॅक खाली ठेवतो. उघडून आतलं हंतरूण, पांघरूण काढतो. पांघरूण जमिनीवर पसरतो. हंतरूण पांघरायला घेतो......चला पोचलो एकदाचे. आहाहा. पाठ टेकल्यावर जमिनीला काय बरं वाटतंय........................................पुढे? सकाळ......