मंडळी,
आपल्या हिंदु धर्मात देवतांवर अतीव श्रद्धा आहे. ती इतर धर्मीयांत पण आहे. पण हिंदूंमध्ये जास्त प्रमाणात आहे असे वाटते. (ती असण्याला माझा विरोध नाही.) आपल्या धर्मात व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, दानधर्म इ. विविध पद्धतीने केले जातात व वेगवेगळ्या देवतांच्या नावाने केले जातात. वर्षातील किमान ४०% (रोजचे पूजेचे तसेच सणांवरचे, लग्न, मुंज इ. समारंभाचे तास मोजले तर ढोबळमानाने) दिवस हे पुजा, नैवेद्य, दान ह्यामध्ये जातात. ह्यात काही वावगे नाही. पण काही गोष्टींचा व्यवस्थित विचार केल्यास खालील गोष्टी आढळतात.
१. पूजेचे साहित्य चंदन, अत्तर, फुले, गंध, हळद, कुंकू, कापूर
२. पूजेसाठी वापरलेले धान्यः गहू, तांदूळ, उडीद
३. इतर खाद्य वस्तूः साखर, रवा, गूळ, तेल, तूप इ.
४. ह्या अनुशंगाने येणाऱ्या इतर वस्तू गॅस, लाकूड
५. जेवणावळी.
६. इतरही अनेक गोष्टी.