हिंदुस्थानांतील राज्यकर्त्यांत बहुसंख्येने असलेले हिंदू राज्यकर्ते व प्रसारमाध्यमे यांना मुसलमानांविषयी एक प्रकारचा भयगंड आहे. जातीय दंगलींच्या बाबतींत हिंदुत्ववाद्यांवर तुटून पडणारी ही मंडळी मुसलमानांच्या बाबतींत मात्र नरमाईने वागतात, बोलतात व लिहितात. मुसलमानांच्या चुकीला चूक म्हणण्याचे धाडस कोणीही करीत नाही. मुसलमानांना शांतता राखण्यासाठी आर्जवे केली जातात व हिंदूंना संयमाचे धडे दिले जातात. हा गुळमुळीतपणा आपल्या इतका अंगवळणी पडला आहे की जरा एखाद्या राजकीय नेत्याने मुसलमानांना त्यांच्या चुकांबद्दल खडसावण्याचे धाडस केलेच तर अपराधी सोडून इतर सर्वांचीच भीतीने गाळण उडते व खडसावणाऱ्या नेत्यावर कट्टर, जहाल, जातीयवादी, असे शिक्के मारण्यास सर्वजण अहमहमिकेने पुढे येतात.