पु. ल. एक साठवण

नुकतीच पु. ल. देशपांडेयांची पुण्यतिथी झाली.


इथे बऱ्याचा जणां नी पु. ल. नां आपल्या कवितेतून/लेखातून श्रधांजली वाहिली आहे.


पु. ल. यांची प्रत्येक कथा हि विचार करायला लावणारी/ लक्षात राहणाऱ्या सारखी आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला आवडलेली/लक्षात राहिलेली अशी पु. ल. च्या कथे मधली कोणती वाक्ये आहेत जी आपण इथे सांगू शकता. कुठे तरी पु. ल. प्रेमींच्या कंपू(ग्रुप) मुळे मला हि कल्पना सुचली.

फुटबॉल विश्वचषक ०६ - भाग २

                    पहिल्या फेरीतले हे सामने बधायचे सोडू नका..


१) १४ जून जर्मनी विरूध्द पोलंड

दोन शेजारच्या राष्ट्रांमधला हा सामना. शेजारचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे नेहमीच या सामन्याबद्दल एक प्रकारचे चुरसयुक्त वलय असते. भारत पाकिस्तान क्रिकेट  म्हणा हवं तर. शिवाय, जर्मनीचे दोन मुख्य खेळाडू क्लोज आणि पडोल्सकी हे जन्माने पोलंड मधले आहेत. आता बोला !  ग्रुप ए मध्ये पोलंड जर्मनी नंतरचे स्थान पटकावणार हा सर्वसाधारण कयास असला तरी पोलंडचा खेळ कमी लेखून चालणार नाही. एके काळी विश्वचषकात दोनदा तिसरे स्थान मिळवणारा हा पोलंड. उद्या जर्मनी विरूध्द स्थान राखण्यासाठी पोलंड अटीतटीचा लढा देईल. वर्स्ट केस मध्ये सामना  ड्रॉ करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील असे त्यांच्या कोच ने आधीच जाहीर केले आहे. जर्मनी त्यांना अजिंक्य आहे याची जाणीव आहे. पण खेळात काहीही होऊ शकते. पोलंड जिंकल्यास त्यांचा आनंद मात्र अवर्णनीय असेल...

२) २० जून स्वीडन विरूध्द इंग्लंड

जर्मनी आणि पोलंडचे तसेच काहीसे स्वीडन आणि इंग्लंडचे. फुटबॉल या खेळाचाच यजमान असलेला  इंग्लडचा संघ, अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकणारा.  आत्तापर्यंत ११ वेळा इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे सध्याचा त्यांचा कोच इरिक्सन हा मूळचा स्वीडीश आहे!. आत्ताच्या स्वीडन संघाबद्दल बोलायचे झाल्यास, क्वालिफाईंग टूर्नामेंटमध्ये स्वीडनने युरोपीय देशांमधील सामन्यांत १० पैकी ८ सामने जिंकले होते आणि बेस्ट रनर अप मध्ये दुसरे स्थान पटकावले होते.

फुटबॉल विश्वचषक ०६ - भाग २

                    पहिल्या फेरीतले हे सामने सोडू नका..


१) १४ जून जर्मनी विरूध्द पोलंड

दोन शेजारच्या राष्ट्रांमधला हा सामना. शेजारचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे नेहमीच या सामन्याबद्दल एक प्रकारचे चुरसयुक्त वलय असते. भारत पाकिस्तान क्रिकेट  म्हणा हवं तर. शिवाय, जर्मनीचे दोन मुख्य खेळाडू क्लोज आणि पडोल्सकी हे जन्माने पोलंड मधले आहेत. आता बोला !  ग्रुप ए मध्ये पोलंड जर्मनी नंतरचे स्थान पटकावणार हा सर्वसाधारण कयास असला तरी पोलंडचा खेळ कमी लेखून चालणार नाही. एके काळी विश्वचषकात दोनदा तिसरे स्थान मिळवणारा हा पोलंड. उद्या जर्मनी विरूध्द स्थान राखण्यासाठी पोलंड अटीतटीचा लढा देईल. वर्स्ट केस मध्ये सामना  ड्रॉ करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील असे त्यांच्या कोच ने आधीच जाहीर केले आहे. जर्मनी त्यांना अजिंक्य आहे याची जाणीव आहे. पण खेळात काहीही होऊ शकते. पोलंड जिंकल्यास त्यांचा आनंद मात्र अवर्णनीय असेल...

२) २० जून स्वीडन विरूध्द इंग्लंड

जर्मनी आणि पोलंडचे तसेच काहीसे स्वीडन आणि इंग्लंडचे. फुटबॉल या खेळाचाच यजमान असलेला  इंग्लडचा संघ, अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकणारा.  आत्तापर्यंत ११ वेळा इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे सध्याचा त्यांचा कोच इरिक्सन हा मूळचा स्वीडीश आहे!. आत्ताच्या स्वीडन संघाबद्दल बोलायचे झाल्यास, क्वालिफाईंग टूर्नामेंटमध्ये स्वीडनने युरोपीय देशांमधील सामन्यांत १० पैकी ८ सामने जिंकले होते आणि बेस्ट रनर अप मध्ये दुसरे स्थान पटकावले होते.

नविन मराठी शब्द

 


मराठीत संगणन विषयावर लेख लिहितांना एक मोठीच अडचण जाणवते. ती म्हणजे, संबंधित शब्दांच्या अपुरा पुरवठा. मध्यंतरी गुगलचा गुगली या विषयावर माझ्या अनुदिनीवर लेख लिहिण्यासाठी मी सुरूवात केली खरी. पण, शब्दांमुळे गाडं अडलं. त्यामुळे सामान्यतः आज्ञावलीच्या चव-या ढाळणारा मावळा सहसा जे करेल तीच वाट मी चोखाळली आणि माय-मराठीत शे-दिडशे नविन शब्दांची भर टाकली. ती यादी विदग्ध या अनुदिनीवर प्रकाशित केलीय. मनोगतावर इतर भाषांच्या शब्दांसाठी १०% मर्यादेचा नियम आहे. त्याचा मान ठेवुन मूळ लेखासाठी दुवा  देतोय.

पी डी एफ्

संगणकाविषयीचे माझे ज्ञान हे केवळ अनुभवातून आणि धडपडीतून शिकण्याइतपतच मर्यादित आहे. त्यामुळे जाणकारांना कदाचित बाळबोध वाटू शकणारे काही प्रश्न मला पडले आहेत -



  1. पी डी एफ् च्या रूपात असणारे काही लिखाण आंतरजालावर सर्वांसाठी उपलब्ध कसे करून देता येईल?

रात्र झाली गोकुळी

'कारट्या, किती भूक भूक करशील...' घरोघरी ऐकू येणारा संवाद. वाढत्या वयाच्या मुलांची भूक असतेच अशी न संपणारी. पण या लटक्या तक्रारीमागे खरे तर असते कौतुकच. आपल्या मुलांनी भरपूर खावे आणि भरभर मोठे व्हावे अशी सगळ्या आईवडीलांची मनीषा असते. त्यांना तसे करताना बघणे यातून आईवडीलांना खूप खूप समाधान मिळत असते.
पण हे झाले सर्वसामान्य, खाऊनपिऊन सुखी घरातले चित्र. जिथे या भुकेमागे भयाण दारिद्र्याचा काळाकुट्ट भेसूर पडदा असतो तिथे ही नैसर्गिक भूक अगदी भयानक, विदारक रूप धारण करते. शाळकरी वयातला कृष्णा हा असाच वाढत्या वयाचा मुलगा. त्याचे पोरपण अजून संपलेले नाही. दारिद्र्य, गरीबी याची त्याला जाणिवही नाही. भूक लागली की खायला हवे इतक्या निरागस त्याच्या भावना. तो शाळेतून घरी येतो तोच भुकेने कलकलून. त्याचे घर म्हणजे तरी काय,एका बाजूला तट्टे आणि दुसऱ्या बाजूला रॉकेलच्या डब्यांचे गंजलेले पत्रे लावून कसाबसा केलेला आडोसा. त्यातच सतत धूर ओकणारी ओलसर चूल. खोकल्याच्या उबळीने प्राण कंठाशी आलेली त्याची आई, खंगत चाललेली त्याची बहीण दुर्गी, जिच्या दवाखान्यातल्या नोकरीच्या तीस रुपये महिना पगारावर कसाबसा संसार चालतो ती कामाने दमून चिंब झालेली दुसरी बहीण शकी आणि अठराविश्वे दारिद्र्याबरोबर झट्या घेणारा, छातीत डाव्या बाजूला तापलेली सुई खुपसावी तसे होत असताना हेडक्लार्कच्या घरी दोन गाड्या लाकडे माळ्यावर रचून लोळागोळा झालेला त्यांचा बाप दाजी....
कृष्णाला घरी खायला काही नसते. त्याचा चहाही गरम झालेली नसतो.कोमट काळसर गुळाच्या चहाचा कप त्याच्यासमोर आई आदळते. "अगदी दुष्काळात जन्मलंय कारटं.." ती करवादते. "नुसता चहाच प्यायचा? ते कालचे चिरमुरे संपले?" कृष्णा चिडून विचारतो. तेलहळद लावलेले ते मूठभर चिरमुरे कधीच संपलेले असतात. कृष्णा परसात जाऊन उभा रहातो. समोरच्या घरातली मुले पोह्याच्या ताटल्या घेऊन बाहेर आलेली असतात. भूक असह्य होऊन आपल्या घराकडे भीतभीत पहात कृष्णा एकापुढे हात करतो. तो मुलगा आपला रिकामा हात फटदिशी कृष्णाच्या हातावर मारतो....
शेजारच्या वकीलांच्या परसात दोडके, दुधी भोपळे फोफावलेले असतात. ते चोरून भटाच्या भाजीच्या दुकानात विकले की भट दोन आण्याचे बटर, बिस्कीटे देत असतो. या वेळी कृष्णा ते चोरत असताना भोपळ्याचा मांडवच कोसळतो आणि वकीलांचा गडी कृष्णाला बेदम मारतच घरी घेऊन येतो. "मी कशाला घेऊ यांची भाजी?" हुंदके देत कृष्णा खोटे बोलतो...
कृष्णाची आई कण्हत कसाबसा स्वयंपाक करत असते. स्वयंपाक म्हणजे काय..घरात भातापुरते तांदूळही नसतात. दुपारच्याच अपुऱ्या भाकरी, तुरट, बियाळ वांग्याच्या फोडी आणि मूठभर डाळ  घातलेली लालसर बेचव आमटी आणि गाठी झालेल्या एवढ्याशा डांगराच्या पिठात घातलेले थेंबभर काळसर ताक.... हेच त्यांचे जेवण.तेही अपुरे. दुर्गीला अन्नाची वासनाच नसते. तिचा भाकरीचा चूर खाऊनही कृष्णाची भूक तशीच रहाते. वाढत्या वयातील मुलाच्या पोटातील न संपणारी भूक...
सगळेच अंधारात आडवे होतात. कृष्णाला काही झोप येत नाही. अंधारातच तो खुडबुड करू लागतो.चुरमुऱ्याच्या डब्यातले खालचे उरलेले तिखट, आईने ठेवलेले उपासाचे दाणे..त्याला काही काही सापडत नाही. घटघटा पाणी पिऊन तो परत आडवा होतो. शेजारची आचरट  पोरे कृष्णाच्या घराच्या पत्र्यावर दगड फेकण्याचा खेळ सुरु करतात. गल्लीतली कुत्री वचावचा ओरडू लागतात..
"खीर खीर म्हणून बाळाने हट्ट धरला, म्हणून केली कपभर, पण त्याने बोटसुद्धा लावलं नाही. शिवाय ही बटाट्याची भाजीदेखील उरली" शेजारच्या घरातून आवाज येतो "काय करायचं आता?"
"आता असं कर.. सकाळी ते सगळं देऊन टाक शेजारी.."
कृष्णा एकदम खुलतो. 'सकाळी देण्याऐवजी आत्ताच का देत नाहीत? मी स्वतः जाऊन आणतो हवे तर..'पण शेजारचे घर बंद होते..
घरात घुशींची खरखर सुरु होते. आईला बरगड्या बाहेत पडतील की काय अशी खोकल्याची ढास लागते. न संपणारी लांबलचक काळी रात्र सुरु होते..
कशाने तरी कृष्णाची झोप चाळवते. "उजाडलं आई?" तो आशेने विचारतो. अजून रात्रच आहे हे पाहून तो हिरमुसतो आणि काही तरी बडबडत पुन्हा झोपतो..त्याच्या झोपेत येते ती खीर. शेवयांची, केशरी रंगाची, मधून-मधून बेदाणे असलेली चांगली पातेलेभर दाट खीर..

दगाबाज मैत्रिण

रायगडमधल्या आमच्या छोट्याशा गावात जिकडेतिकडे एकच चर्चा होती.. आस्थाच्या नवऱ्याच्या खुनाची. मला चीड येत होती ती याबद्दलच्या लोकांच्या आपापसातल्या कुजबुजण्याची. तिची मैत्रिण म्हणून मला समजलं असतं ना ते काय बरळतायत तर मग मी त्यांना सरळ केलं असतं.

आस्था तर पुरतीच मोडली होती.

मंटोच्या तीन लघुकथा

करिष्मा



लुटलेला माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरुवात केली.
लोक भेदरून लुटलेला माल रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घराबाहेर फेकू लागले.
संधी साधून आपला मालदेखील स्वतःपासून वेगळा करणारेही काही जण होते. कायद्याच्या तावडीत सापडू नये म्हणून हा सारा खटाटोप.