बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी

चाळकऱ्यांनी एकजुटीने 'बाजीराव मस्तानी' पाहायला जाण्याच्या घटनेची तुलना फक्त मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्याच्या बातमीशीच होऊ शकते. भन्साळी यांनी चित्रपट बनवायला एका तपाहून अधिक वेळ घेतला; पण तो एकत्रितपणे बघण्यासाठी चाळकऱ्यांना जी  तपश्चर्या करायला लागली तीही काही कमी नव्हती. अनेकांचा अनेक दिवस हे खरं होईल यावरच विश्वास बसत नव्हता. झालंच तरी सर्व संकटांमधून पार होऊन ती वेळ येईपर्यंत हा चित्रपट डब्यात गेला असेल आणि त्यांना भन्साळी यांनी काढलेला दुसऱ्या बाजीरावाच्या प्रेमकहाणीचा 'सिक्वल' बघायला लागेल अशी शंका  ते व्यक्त करत होते.

शरद जोशींचे निधन

शरद जोशींचे ऐंशीव्या वर्षी निधन झाले. म्हणजे अकालीही नव्हे आणि अति उशीराही नव्हे. तशीही गेले काही महिने त्यांची तब्येत त्रास देत असल्याच्याच बातम्या होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनाने धक्का बसला असे म्हणता येणार नाही.
धक्के जोशीबुवांनी जिवंतपणीच भरपूर दिले!

असे कसे झाले ?

       मी नेहमी माझ्या प्रवासात काही तरी घडत असलेले अनुभव अनिलला लिहून पाठवतो व त्याला ते आवडते (असे तो म्हणतो) यावेळी योगायोगाने आम्ही अमेरिकेत होतो त्यावेळी तोही होता.आणि तो आमच्या थोडा अगोदर भारतात परत गेला (की आला ?) होता.   
  " आम्ही कालच पोचलो.प्रवास अगदी सरळ आणि विशेष सांगण्यासारखे न घडता म्हणजे त्याला अन्इव्हेन्टफुल म्हणावे असा झाला."  असा त्याचा मेलही आला होता. 
"अरे आपणच काहीतरी घडवावे लागते प्रवास इव्हेन्टफुल होण्यासाठी " मी गमतीने उत्तर दिले.

शोध राजीव हत्येचा

                      मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे मोहनचे डोके ठणकत होते, अंगातून घाम सतत पाझरत होता. मनाने तर संपच पुकारला होता, कशातच मन लागत नव्हते. २ महिन्यांखालीच त्याची पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे अतिरिक्त भार खांद्यावर पडला होता. तेव्हापासून एकही रजा त्याच्या वाट्याला आली नव्हती. शरीर आता आराम मागत होते. तेवढ्यात हॉलमधला फोन वाजला. मोहनने उठायचे कष्ट नकोत म्हणून बायकोलाच कॉल उचलण्यास सांगितले.