"झाला का स्वयंपाक? सदानकदा आळस. एक काम करेल तर शपथ. सहा वाजले. आता आठ वाजतील आणि बाईसाहेब purse अडकवून कामाला निघून जातील. घरी म्हातारे सासू-सासरे घरी बसून त्यांच्या येण्याची वाट बघतील" रेवतीबाईंचा सकाळचा तोंडाचा पट्टा सुरू झाला आणि कीर्तीचे हात.
"सकाळी सकाळी चहा घेत नाही. काही नाही. ५ वाजतापासून बसते त्या देवासमोर. आम्ही सहाला उठतो तेव्हाच उठते दैवासमोरून. आम्ही उठण्याअगोदर चहा करून ठेवायचा, तर ते नाही. सदानकदा आळस. " कीर्तीने शांतपणाने cooker लावून कणीक मळायला घेतली.