आम्ही नासिकच्या बंगल्यात ९६ साली राहायला आलो. बागकामाची आवड घरच्या सर्वांना. अल्पावधीतच वेगवेगळ्या फुलांनी आणि फळांनी बाग बहरून गेली. ७-८ प्रकारचे देशी-विदेशी गुलाब, मोगऱ्याचे २-३ प्रकार, जास्वंद, तेरडा, झिनिया सारखे विविधरंगी फुले. . जाणाराऱ्येणारा हमखास थांबून बागेचे कौतुक करत असे.
नोकरी निमित्त घराबाहेर राहायला जावे लागल्यामुळे माझं बागेत काम करणं जवळपास बंदच झालं, पण बागेवरचं प्रेम मात्र तसंच होतं. जमेल तेव्हा झाडांना पाणी देणे, खतं घालणे अशी कामे मी करायचो.