भाव भक्तीने भारलेली , अभंग, ओव्या, भारूडे, कीर्तने, भजने यांच्या रसाळ आणि सुरेल कथनाने आणि श्रवणाने तृप्त झालेली, -- अशी संत परंपरा या मराठी मातीस लाभली आहे. शतकानुशतके महान धर्मग्रंथामध्ये बंदिस्त असलेले ज्ञान या संत सज्जनांनी जनसामान्यांसाठी खुले केले. सामान्यांच्या भाषेत, त्यांना समजेल , भावेल अशा पद्धतीने त्यांनी धर्माचे ,तत्त्वज्ञानाचे मर्म उलगडून सांगितले . मराठी जनांच्या आयुष्याला त्यांनी सात्त्विक आणि तात्त्विक चौकट प्रदान केली.