अनपेक्षित यशस्वी झालेला संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रातला प्रयोग असं लिनक्सचं वर्णन करण्यात येतं. त्या लिनक्स विषयी थोडेसे.गेली सुमारे वीस वर्षे मी लिनक्स आणि फ्री डॉस या संगणक प्रणाली वापरत आलो. सध्या मी उबंटू वापरतो. उबंटू हा लिनक्स या कार्यकारी प्रणालीचा एक स्वाद आहे. असे अनेक स्वाद (जूज, मँड्रिव्हा, रेड हॅट, फेडोरा, डेबियन, स्लॅकवेअर) लोकप्रिय आहेत. या लेखात लिनक्स (म्हणजे या सर्व स्वादांचा गाभा) आणि मुक्त प्रणालींविषयी जास्त माहिती देत आहे.