मौन २

पूर्वसूत्र:
सकाळी गडबडीत मी दात काढायला जातो आहे हेही घरात कुणाला सांगितले नव्हते. गडबडीत असं आपलं म्हणायचं पण, दात तर काढायला जातो आहे त्यात काय सांगायचंय असा वयाला साजेसा अहंकारही त्यात होताच. पण आता निदान कांही काळ तरी हे असे, मौनव्रत धारण करावे लागणार आणि त्यातून काय काय प्रसंग उद्भवणार या शंकेने मनात काहूर माजले. पहिला सामना झाला तो नातवाबरोबर.

मौन १

 अगदी ‘कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो नसलो तरी, पोस्ट रिटायरमेंट उपक्रमांचे संकल्प सोडून आणि मोडूनही वयाची साठी उलटून गेली तसा मी त्या वयाला साजेसे कांही उपप्रकार (किंवा थेरं) करू लागलो. म्हणजे ज्येष्ठ नागरीक संघाचा सदस्य होणे, हास्यक्लबाचा सदस्य होणे, योगासनाच्या वर्गाला जाणे, गुरुवारी संध्याकाळी  दोन पेढे घेऊन दत्त मंदिरात आरतीला जाणे, सार्वजनिक वाचनालयात जाऊन वर्तमानपत्रे नामक चुरगाळलेली रद्दी वाचणे, इत्यादी इत्यादी. या सर्वांत सातत्य असलेच पाहिजे असा कांही दंडक नसल्याने नव्याचे नऊ दिवस हा माझा मूळ पिंड मी कसोशीने जपला.

चकली

वाढणी
आठ जणांकरीता

पाककृतीला लागणारा वेळ
90

जिन्नस

शाश्वत - २

भल्या पहाटेच तो जागा झाला आणि राहुटीबाहेर आला. भोईलोक त्याच्या चाहुलीने जागे झाले आणि गडबडीने कामाला लागले. सुर्योदय व्हायच्या सुमारास विष्णुदास जागा झाला आणि डुलत डुलत बाहेर आला, तोपर्यंत त्याने स्वत:ची ध्यानधारणा आटोपली होती. आज त्याला अतिशय हलकं आणि शरीरात अद्भुत शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटत होतं. विष्णुदासाबरोबर थोडासा फराळ करून तो पुढच्या प्रवासास सिद्ध झाला. विष्णुदासाचा मेण्यात बसण्याचा आग्रह निर्धारपूर्वक मोडून तो मेण्याच्या पुढे झपाझप चालू लागला. सकाळच्या थंड हवेत त्यांनी बरंच अंतर कापलं. पण हळूहळू सूर्य डोक्यावर येउन तळपायला लागला आणि पायाखालची चढणही आणखी तीव्र होऊ लागली.