वेळ जात नव्हता म्हणून खायला काही मिळतंय का ते बघण्यासाठी फ्रीज उघडला. समोर एक पिशवी दिसली, त्यात ५-६ लाडू अगदी दाटीवाटीने ठासून ठेवले होते. त्यामुळे त्या लाडवांचा गोलाकार नाहीसा झाला होता.
जास्ती विचार न करता पिशवी उघडली आणि एका लाडूचा तुकडा पाडून तोंडात टाकला. तो मुगाचा लाडू इतका कोरडा होता, की चावून गिळणं मुश्कील झालं. त्यात बहुतेक तूप कमी होतं किंवा जवळजवळ नव्हतंच.