" कंगोरे " कथासंग्रह.

                        मनोगतावरील माझ्या सर्व कथांचा संग्रह "कंगोरे "   या नावाने १३/०४/२०१४ रोजी प्रकाशित झाला आहे. सदर कथासंग्रह 

व्यास क्रिएशन तर्फे ठाण्यातील सहयोग मंदिर हॉल मध्ये श्रीम. विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रकशित करण्यात आला आहे. सदर पुस्तकास श्री मिलिंद बल्लाळ ( ठाणे वैभवचे संपादक) यांनी प्रस्तावना लिहिली आहे. हे पुस्तक  दुकानांमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच ते जालावरही लवकरच उपलबद्ध होईल. पुस्तकाची किंमत रु. २००/ आहे.

रोजनिशी पान क्रमांक ...२ ...

११ सप्टेंबर २०११

आजची संध्याकाळ खूपच सुंदर होती. घरातून निघतानाच सूर्य छान दिसत होता.
सूर्यास्ताला अजूनही अवकाश होता. सूर्याभोवती पांढरेशुभ्र छोटे ढग जमा झाले
होते. संध्याकाळी ७ वाजताही सूर्य प्रखर होता. डोळ्यावर येत होता. तेव्हाच
म्हणाले कॅमेरा घ्यायचा राहिला. मी तसे बरेच घेतले आहेत सूर्यास्त
त्यामुळे म्हणाले जाऊ दे. नदीवर पोहचलो तर तोपर्यंत सूर्य लालबुंद झाला
होता आणि त्याचा लालबुंद प्रकाश पाण्यावर छान तरंगत होता. इतके सुंदर दिसत
होता तो सीन!

रोजनिशी पान क्रमांक ...१...

१२ एप्रिल २०१३

आज सकाळी उठून चहा प्यायला आणि बाहेर गॅलरीत जाऊन पाहिले तर आहाहा! इतके
छान सगळीकडे दिसत होते. हिरवेगार! आणि पाऊस पडून गेला होता खूपच आणि शिवाय
आभाळही ढगांनी भरलेलेच होते. असे वाटले की लगेच बाहेर जावे आणि फेरफटका
मारून यावे. काल रात्रीच खूप पाऊस पडला होता. तळे तुडुंव भरून वाहत होते ते
दिसत होते. हिरव्या रंगाच्या कितीतरी छटा आज दिसत होत्या. वसंत ऋतू चालू
झाल्याने झाडांना हिरवीगार पाने आली होती आणि त्यामुळेच तर सगळीकडे
हिरवेगार झाले होते.