खमंग साबुदाणा थालिपीठ

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
10

जिन्नस

  • साबुदाणा १ वाटी
  • दाण्याचे कुट १ वाटी
  • १ इंच आले
  • १ चमचा तिखट
  • चिरलेली कोथिंबीर
  • १ मोठा बटाटा किसून
  • तूप

मार्गदर्शन
साबुदाणा प्रथम भिजवून घ्यावा. त्यासाठी एखाद्या भांड्यात साबुदाणा घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. सर्व पाण्याचा निचरा करून,  भाड्यावर झाकण ठेवून एखादा तास ठेवावे. शक्यतो साबुदाणा मोकळा भिजवावा.

रुबिकचा घन

         वयाच्या आठव्या वर्षी शाळेत प्रवेश केल्यावर शिष्याची भूमिका बरेच दिवस पार पाडली त्यानंतर बरेच दिवस शैक्षणिक क्षेत्रात घालवली.त्यावेळी मी शिकवत होतो व समोर विद्यार्थी (मनात असो वा नसो) मुकाट्याने ऐकत असत. आता तिसऱ्या पर्वात माझी भूमिका पुन्हा एकदा बदलली आहे व आता पुन्हा शिष्याची भूमिका पार पाडावी लागत आहे व गुॠ आहेत आमची तिसरी पिढी.सध्या मोठ्या नातवाकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत, त्यात सध्याचा विषय आहे रुबिक क्यूब.

नकार

फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वर्षभरात प्रदर्शित होणाऱ्या
सर्व हिंदी चित्रपटांपैकी केवळ एक अथवा फार फार तर दोन चित्रपट पाहणं शक्य
होतं, कारण नवे चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागत आणि आर्थिक
दृष्ट्या ते परवडणं शक्य नव्हतं; त्या काळात वर्षभर दूरदर्शन (ज्याला काही
लोक कुत्सितपणे दुर्दशा दर्शन असेही म्हणत) नामक राष्ट्रीय प्रक्षेपण
वाहिनीवर आठवड्यातून एक या हिशेबाने साधारण पन्नासएक जुने हिंदी चित्रपट
पाहिले जात. त्या काळी चित्रपट प्रसारित होण्यापूर्वी निवेदिका थोडक्यात
तसे निवेदन करीत असे.

वना-मनात

मूळ जापानी लेखक : र्‌यूनोसुके आकुतागावा
इंग्रजी अनुवाद ("इन अ ग्रोव्ह") : ताकाशी कोजिमा
मराठी अनुवाद इंग्रजीवरून

[अकिरा कुरोसावा ह्यांनी आपला जगप्रसिद्ध चित्रपट राशोमॉन  आकुतागावा ह्यांची ही कथा व त्यांचीच 'राशोमॉन' ही कथा ह्यांना जोडून १९५० साली काढला होता. यूट्यूबवर इथे पहा.]

लाकूडतोड्याने वरिष्ठ पोलीस आयुक्तांना दिलेली जबानी