जुलै १२ २००५

समस्यापूर्ती (५)

ह्यासोबत

आज इंद्रवज्रा हे वृत्त बघू.

उदा.-
दुःखी जगा देखुनिया द्रवे ते
सच्चित्त माते नवनीत वाटे
अन्याय कोठे दिसता परी ते
त्या इंद्रवज्रासहि लाजवीतेटीप- 
याची चाल थोडीफार भुजंगप्रयातच्या जवळची आहे...
जगी सर्वसुखी असा कोण आहे...


 ल ग क्रमः
गा गा ल । गा गा लल गा ल गा गा
२   २   १   २  २  १   १   २  १   २   २
   त      ।     त     ।     ज    । गा गा


यती- ५ व्या अक्षरावर.
गागालगागा, ललगालगागा


अन्याय कोठे, दिसता परी ते
२  २  १।२ २  १।१ २ १।२  २

आता कुणाला ळणार नाही
 २ २   १ २ २  १ १ २ १ २ २


------------------------
------------------------
------------------------
आता कुणाला कळणार नाही


शेवटची ओळ आहे- 
आता कुणाला कळणार नाही

करताय ना पूर्तता.....

-नीलहंस.

Post to Feed

कवी नीलहंस,वेगळे
माझी समस्यापूर्ती
धूर
वा मित्रवर्य
हीहीहीहीहीहीही
वृत्तनिष्ठा
वा वा!
हूहा नमामा चकिसू
हे नक्की काय आहे?
ः))
समस्यापूर्ती?
छानच
माझा प्रयत्न
चाल...
जर
माझाही प्रयत्न
छान प्रयत्न
रसरंगपूर्ती
मला..
रात्र
तो राम आणि...

Typing help hide