कालाय तस्मै नम :|----- ५

मि. टॉमकिन्स सुट्टी घेतात ==== ३          
            थोडक्यात बहिर्वक्र पृष्ठभागांतर्गत अवकाशाचे घनफळ दिलेल्या अंतरात कमी तर अंतर्वक्र पृष्ठभागात ते अधिक असते बरोबर ना?"आश्चर्याने मि.टॉमकिन्स उद्गारले. 
"अगदी तसेच" हसून प्राध्यापक म्हणाले "आता तुला मी काय म्हणतो ते बरोबर कळायला लागलेले दिसते. थोडक्यात आपण रहात असलेल्या अवकाशाची वक्रता समजून घेण्यासाठी दूरवरच्या वस्तूंची संख्या मोजायला हवी. उदा.आकाशगंगा (नेब्युला) ज्याविषयी तू कदाचित ऐकले असशील अवकाशात समप्रमाणात विखुरलेले असतात.आणि लक्षावधी प्रकाशवर्षाच्या अंतरापर्यंत त्यांचा वेध घेता येतो.त्यामुळे अवकाशाच्या वक्रतामापनासाठी सोयिस्कर वस्तू म्हणून त्यांचा वापर करता येतो."
" त्यामुळे आपले विश्व मर्यादित व बंदिस्त आहे असे म्हणता येईल का?" 
 " ऊsss या प्रश्नाचे उत्तर अजून तरी देता येणार नाही.अवकाशविज्ञानावरील आपल्या सुरवातीच्या शोधनिबंधात आइन्स्टाईन यांनी ते तसे असून अपरिवर्तनीय आहे असे म्हटले आहे.पण त्यानंतर रशियन गणिती ए.ए.फ़्रीडमान यांच्या मते आइन्स्टाइनच्याच मूळ समीकरणानुसार विश्व जसा काळ जात राहील तसे प्रसरण किंवा आकुंचन पावेल असे सिद्ध होते.हे गणिती मत अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हबल यांनी मौंट विल्सन अंतराळसंशोधन शाळेतील १०० इंच व्यासाच्या दुर्बिणीचा उपयोग करून दृढ केले व त्यानी निरीक्षणाने आकाशगंगा एकमेकापासून दूर जात आहेत हे दाखवून विश्व प्रसारित होत आहे असे सिद्ध केले. पण अजूनही ही क्रिया अनंत काळपर्यंत चालू रहाणार की एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जाऊन पुन्हा विश्वाच्या आकुंचन पावण्याची सुरवात होणार हा प्रश्नच आहे.अधिक सूक्ष्म अंतराळ निरीक्षणातूनच याचे उत्तर
मिळेल. "
      प्राध्यापकांचे भाषण चालू असतानाच एक अनपेक्षित गोष्ट घडली आणि ते उभे असलेल्या लॉबीचे एक टोक अगदी निमुळते होत त्यामध्ये आतील सामान अगदी दाबले गेल्यासारखे झाले तर दुसरी बाजू एकदम इतकी वाढत जाऊ लागली की सगळे विश्व त्यात सामावते की काय असे टॉमकिन्स यांना वाटू लागले.आणि त्यांच्या मनात अशी भीती उत्पन्न झाली की मिस मॉड पेंटिंग करण्यासाठी ज्या समुद्रकिनाऱ्यावर गेली तो भाग या प्रकारामुळे बाकीच्या विश्वापासून वेगळा होऊन आपली व तिची पुन्हा कधीच गाठ पडणार नाही ते दारापर्यंत घाईने जात असताना मागून प्राध्यापकमजकूर मोठ्याने ओरडत येत असलेले त्याना ऐकू आले," सांभाळ रे पुंज (क्वांटम) स्थिरांक (कॉन्स्टंट) ही विचित्र  बनू लागलेला दिसतो."
         टॉमकिन्स किनाऱ्यावर गेले तेव्हां प्रथम तेथे बरीच गर्दी आहे असे दिसले.हजारो मुली वाटेलतश्या वाटेल त्या दिशेने पळत असलेल्या त्याना दिसल्या." आता माझ्या मॉडला या गर्दीत मी कसा हुडकणार?" असा विचार त्यांच्या मनात आला पण नंतर त्याना असे आढळून आले की त्या सर्व तरुणी अगदी सारख्याच म्हणजे मॉडच्याच प्रतिकृती असल्यासारखे वाटत होते. व हा अनिश्चितता तत्वाचा विनोदी परिणाम आहे असे त्यांच्या मनात आले.पण पुंज (क्वांटम) स्थिरांकाच्या बदलाची अचानक आलेली लाट नाहीशी होऊन त्याना मिस मॉड एकटीच त्या किनाऱ्यावर  गोंधळल्यासारखी उभी आहे असे दिसले."हे तर तुम्हीच आहात " सुस्कार सोडत ती म्हणाली " मला वाटले मोठा घोळकाच  माझ्या दिशेने येत आहे.कदाचित माझ्या डोक्यावर पडणाऱ्या कडक उन्हाचाच हा परिणाम असावा.थोडावेळ थांबा मी माझी सनहॅट घेऊन येते"
" नको नको आता आपण एकमेकापासून दूर जायला नको."तिला थांबवत टॉमकिन्स म्हणाले," प्राकाशाचा वेगही बदलत आहे अशी शंका मला येतेय आणि तू हॅट घेऊन येईपर्यंत कदाचित मी म्हातारा झालेला असेन."   
 " काय वाट्टेल ते काय बोलता" ती म्हणाली पण तरीही टॉमकिन्सच्या हात तिने पकडला व हॉटेलकडे जाताना मध्येच अनपेक्षित बदलाची लाट आली व दोघे किनाऱ्यावर दूर फेकले गेले.जवळच्या टेकडीपासून अवकाशाचा एक मोठा भाग पसरू लागून त्यात जवळच्या टेकड्या व कोळ्यांची घरे अंतर्भूत हो ऊन त्यांना विचित्र आकार प्राप्त झाले. अतिशय प्रखर गुरुत्वबलामुळे सूर्यकिरणही क्षितिजापासून नाहीसे झाले व सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. जणु एक शतक लोटले आणि त्याला अतिशय आनंददायक आवाज त्याच्या कानावर पडल्यामुळे त्याना जाग आली."अहो" मॉड म्हणत होती." माझ्या डॅडच्या आपल्या विज्ञान विषयक भाषणाने तुम्हाला झोप लागलेली दिसते.पण आता माझ्याबरोबर पोहायला येणार का ?पाणी अतिशय मजेदार आहे आज "
        टॉमकिन्स आरामखुर्चीतून स्प्रिंगवरून उसळावे तशी उडी मारत उठले," अरेच्चा म्हणजे हे सगळे स्वप्नच होत असे दिसतेय "  समुद्रकिनाऱ्याकडे जाताना त्याना वाटले," की स्वप्नाची ही सुरवात आहे?"