कालाय तस्मै नमः ।---- ९

प्रकरण ६
अंतराळ  संगीतिका
        त्या दिवशी  न्याहरीच्या वेळी सकाळी टॉमकिन्सने आपल्या  रात्रीच्या स्वप्नाविषयी प्राध्यापकांना सांगितल्यावर आपण एकादी अविश्वसनीय गोष्ट ऐकत असल्याचा भाव त्यांच्या मुद्रेवर होता. "अशा प्रकारे जगाचा विध्वंस ही अगदी नाट्यमय घटना ठरेल, "ते म्हणाले, "पण निरनिराळ्या आकाशगंगामधील सापेक्ष वेग इतके आहेत की  सध्याची प्रसरणशीलता अशा विध्वंसास कारणीभूत ठरेलसे वाटत नाही. आणि त्यामुळे विश्व  आकाशगंगांमधील अंतर वाढत विस्तारतच जाईल.जेव्हां  आकाशगंगांमधील तारे आण्विक इंधन संपल्यामुळे जळून जातील विश्व थंड व कृष्णवर्णीय अवकाशद्रव्याने अनंतापर्यंत भरून जाईल.    
     "अर्थातच असेही काही अवकाशवैज्ञानिक आहेत की त्याना असे वाटत नाही.त्यांच्या मते विश्व अपरिवर्तनीय आहे ते अनंत वर्षापासून निर्माण झालेल्या अवस्थेतच आहे व तसेच पुढेही अनंत वर्षे राहणार आहे.    पण ही  स्थिर विश्वाची कल्पना सत्य असेल यावर माझा विश्वास बसत नाही. या नव्या तत्त्वप्रणालीच्या उद्गात्यापैकी एक, तात्त्विक अवकाशविज्ञानाचा केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक असून त्या विषयावर त्याने एक संगीतिका लिहिली आहे. आणि पुढील आठवड्यात कोव्हेंट गार्डन मध्ये त्या संगीतिकेचा पहिला प्रयोग होणार आहे. मॉड आणि तू दोघेजण त्या प्रयोगास का जात नाही ? त्यामुळे  बरीच करमणूक होईल."
       काही  दिवसातच पावसाळ्यामुळे किनाऱ्यावरील वातावरण थंड झाले व पाऊसही सुरू झाला त्यामुळे प्राध्यापकांनी सुचवल्याप्रमाणे खरोखरच टॉमकिन्स व मॉड संगीतिका पाहण्यासाठी गेले.नाट्यगृहाच्या मऊ लाल मखमली खुर्च्यांवर आरामत बसून पडदा वर जाण्याची वाट पाहत बसले.संगीतिकेचा पूर्वभाग झाला आणि तेवढ्या काळात वाद्यवृंदाच्या प्रमुखास आपल्या पोषाखाची कॉलर दोनदा बदलावी लागली. आणि  अखेरीस पडदा वर गेला  आणि रंगमंचावरील प्रकाशयोजनेच्या झगझगाटाने डोळे दिपून प्रेक्षकांना आपल्या हाताने डोळ्यावर झाकून घ्यावे लागले. रंगमंचावरून निघणाऱ्या त्या प्रखर प्रकाशझोताने सर्व नाट्यगृहाचा वरचा व खालचा मजला ही व्यापून टाकला.व संपूर्ण नाट्यगृह म्हणजे एक प्रकाशाचा महासागरच बनून गेले् हळू हळू  प्रकाशाची तीव्रता कमी होत गेली व आपण अंधाऱ्या अवकाशात तरंगत आहोत व अनेक  रात्रीच्या उत्सवात फिरणाऱ्या प्रकाशमय चक्राप्रमाणे फिरणाऱ्या प्रकाशज्योतींनी आसमंत उजळून टाकला आहे असे टॉमकिन्सला          जाणवले.           
         अदृश्य वाद्यवृंदातून ऑर्गनचे सूर निघू लागले. आणि रोमन कॅथॉलिक पाद्री वापरतात तसा काळा झगा व तशीच कॉलर परिधान केलेला माणूस आपल्या जवळ आलेला त्याला दिसला.संगीतिकेच्या  कार्यक्रमपत्रिकेनुसार तो विश्वाच्या प्रसरणशीलतेची व महास्फोटाची तत्त्वप्रणाली मांडणारा बेल्जियम एब जॉर्ज लेमैत्र होता.संगीतिकेतील पहिला भाग मि. टॉमकिन्सला अजूनही आठवतो. तो असा होता    
 हे पुरातन अणूबाबा ।
सर्वात्मका अणूबाबा ।
तू अनेक शकलांमध्ये मिसळलेला
आकाशगंगांचा निर्माता
आणि सर्वत्र मूळ शक्ती स्रोता
हे रेडिओ क्रियाशील अणूबाबा
सर्वात्मका अणूबाबा
हे विश्वात्मका अणूबाबा
तू परमात्म्याची निर्मिती
आणि खूपच दीर्घ क्रांती
मोठ्या आतषबाजीची प्रतिती
राखेत आणि ठिणग्यात संपे ती 
 आम्ही उभे निखाऱ्यावरती
विझणाऱ्या सूर्यापुढती
आठवण्याचा प्रयत्न करत
आरंभाची भव्यता
हे विश्वव्यापी अणूबाबा
आणि परमात्म्याची निर्मिती
फादर लामैत्र यानि आपले काव्य संपवल्यावर एक उंच व्यक्तिमत्व रंगमंचावर अवतरले कार्यक्रमपत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे  ते रशियन असून त्यांचे नाव जॉर्ज गॅमो   होते. ते गेले तीन दशके अमेरिकेतच वास्तव्य करून होते. त्यानी गायलेले गीत असे होते
अहो फादर आपली समजूत
आणि आमचीही बव्हंशी समान च
विश्व हे प्रसरण पावत आहे
अगदी पाळण्यात पडल्यापासून
विश्व हे प्रसरण पावत आहे
अगदी पाळण्यात पडल्यापासून
तुम्ही त्याचा वेग वाढतो म्हटले
दुःख आमचे की मतभेद येथ
हे कसे घडते या बाबतीत
दुःख आमचे की मतभेद येथ
हे कसे घडते या बाबतीत   
तुम्ही म्हणता न्यूट्रॉन द्रव
म्हणजे अणूचे मूळ स्वरूप
पण ते अनंत आदिपासून
ते अनंत जितके पुरातन
पण ते अनंत आदिपासून
ते अनंत जितके पुरातन
एका अमर्याद मैदानात
स्फोटातून वायूला रूप मिळे
अनेक वर्षापूर्वी (काही सहस्र कोटी वर्षापूर्वी)
आणि अतिघन स्वरूप प्राप्त होता
अनेक वर्षापूर्वी ( काही सहस्र कोटी वर्षापूर्वी)
आणि अतिघन स्वरूप प्राप्त होता
सर्व अवकाश झगमगीत होता
एक योग्य क्षण येता
 प्रकाशाचे होता द्रव्यात रूपांतर
जसे वृत्ताचे  होई गीतात
प्रकाश होता द्रव्यात रूपांतरित
जसे वृत्त होते गीतात
 मणभर उत्सर्जनातून
कणभर द्रव्य मिळे
 त्या पुरातन काळी अवचित
उत्कांतीने महा वृद्धी घडे 
त्या पुरातन काळी अवचित
उत्कांतीने महा वृद्धी घडे
 प्रकाश होऍ गुलाबी हळू हळू.
कोट्यावधी वर्षे सरती
आणि द्रव्याचा साठा
वाढे प्रकाशातून  महामूर
वाढताना ते होई द्रवीभूत
(जसे जीन्स चे गृहित)
विशाल वायू घन बनती
आकाशगंगांची प्रथमावृत्ती
त्यांचा स्फोट होऊन तुकडे
रात्री भिरकावले जाती
त्यातून होई ताऱ्यांची निर्मिती
आणि ते पसरता सर्वत्र
अवकाश भरे प्रकाशाने
आकाशगंगा भ्रमण करती
तेव्हांपासून आणि तारेही
जळतील शेवटच्या ठिणगीपर्यंत
जोवर हे विश्व आकुंचत आहे
ते निर्जीव, थंड  आणि अंधारे होईपर्यंत
जोवर हे विश्व आकुंचत आहे
ते निर्जीव, थंड  आणि अंधारे होईपर्यंत
     संगीतिकेचा  शेवटचा गीतभाग स्वतः कवीनेच म्हटल्याचे टॉमकिन्सला आठवते. तो चमकणाऱ्या आकाशगंगांच्या मधून धूमकेतूप्रमाणे अचानक अवतीर्ण झाला . आपल्या खिशातून एक नूतन आकाशगंगा बाहेर काढत तो गाऊ लागला.
 स्वर्गाचा हवाला देऊन सांगतो  की नव्हते
पूर्वी केव्हातरी तयार झाले
पण ते असेच होते आहे आणि राहणार
अगदी अंतापर्यंत म्हणती बाँडी, गोल्डवीन आणि मीही
विश्वा  रहा असाच असाच राहा तू असाच
आम्हा अविचल जग सैद्धांतिकाच्या
आकाशगंगा जुन्या होता पसरती
जळती आणि अंतर्धान पावती
पण तरी सुद्धा विश्व असेच कायम
होते, आहे आणि राहील सदैव
विश्वा  रहा असाच असाच राहा तू असाच
आम्हा स्थिर विश्व सिंद्धांतीच्या  मतानुसार
आणि अजून नव्या आकाशगंगा वितळतात
अचानक कोठूनतरी नसत्याच्या होतात
यापूर्वीही जशा उत्पन्न झाल्या
(गॅमो आणि लेमैत्र नका मनाला लावून घेऊ !)
असेच होते आणि राहणार पुढेही
असाच राहा विश्वा तू असाच राहा
आम्ही स्थिर विश्व सिद्धांती म्हणतो तसे
पण इतक्या स्फूर्तिदायक संगीतिकेच्या शब्दाचा परिणाम न होता सभोवतालच्या अवकाशातील आकाशगंगा हळू हळू अंधुक व्हायला लागल्या शेवटी मखमली पडदा खाली खाली आला आणि आणि मोठ्या संगीतिका कक्षातील मेणबत्त्यांच्या समूहाने त्यांच्या प्रकाशाची  जागा घेतली.
"सिरिल ए सिरिल, "मॉडने मारलेल्या हाका त्याच्या कानावर पडल्या.मला माहीत आहे  कुठेही आणि कोणत्याही वेळी झोप घेणे तुझ्या हातचा  मळ आहे पण निदान कॉव्हेंट गार्डन सारख्या नाट्यगृहात तरी तू झोपणार नाहीस असं वाटलं होतं  पण अगदी पूर्ण  संगीतिकेचा  कार्यक्रम  चालू असताना तू झोपेतच होतास म्हणजे अगदी कमाल झाली"
     टॉमकिन्सने मॉडला तिच्या घरी सोडले तेव्हां प्राध्यापक महाशय एका आरामखुर्चीत बसून नुकत्याच आलेल्या नोटिसा पाहत होते, "काय कसा काय होता कार्यक्रम? "
 "फारच छान ! " टॉमकिन्स उत्तरला. त्यातल्या त्यात विश्वाच्या स्थिरतेचा सिद्धान्त मांडणारा संगीतिकेचा भाग मला अधिक आवडला. अगदी विश्वसनीय वाटला."
"कोठल्याही सिद्धांताविषयी काळजीपूर्वक विचार करणे बरे असते. "प्राध्यापक म्हणाले, "चकाकते ते सगळे सोनेच नसते ही म्हण माहीत आहे ना तुला? " मी केंब्रिजमधील मार्टीन राइल यांचा लेख वाचत आहे.त्यानी एक प्रचंड रेडिओ दुर्बीण बनवली आहे. त्या दुर्बिणीतून माउंट पामरच्या २०० इंची दुर्बिणीपेक्षा अधिक अंतरावरील वेध घेता येतात त्यातून असे निरीक्षण करण्यात आले आहे की  अतिदूर अंतरावरील आकाशगंगा आपल्या जवळील आकाशगंगांच्या तुलनेत एकमेकांच्या बऱ्याच अधिक जवळ आहेत.
"म्हणजे आपल्या आसमंतातील आकश गंगांपेक्षा या आकाशगंगांची  संख्या अधिक आहे आणि त्यांची संख्या जितके अधिक अंतरावर जाल तशी वाढत जाते असे म्हणायचे का? " टॉमकिन्स म्हणाला
 "मुळीच नाही, " प्राध्यापक म्हणाले, "प्रकाशाच्या निश्चित वेगामुळे जेव्हां तुम्ही अतिदूर अंतरावरील वेध घेता तुम्ही काळाच्या फार  पूर्वीच्या भागाचा वेध घेता़ उदाहरणार्थ सूर्यावरून प्रकाशकिरण पृथ्वीवर यायला ८ मिनिटे लागत असल्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागावरील एकाद्या अग्नीज्वालेचा उद्रेक पृथ्वीवरील निरीक्षकास आठ मिनिटे उशीरा दिसणार  आपल्या अवकाशातील सर्वात जवळ असणाऱ्या आणि तुला अंतराळविज्ञानाच्या पुस्तकात माहीत असलेल्या  अंड्रोमेडा अवकाशमालिकेतील स्पायरल आकाशगंगेच्या छायाचित्रावरून ती दशलक्ष वर्षापूर्वी कशी दिसत असेल याची कल्पना येते. त्यानुसार राइल यास त्याच्या दुर्बिणीतून दिसेल किंवा असे म्हणावे लागेल -त्याच्या रेडिओ दुर्बिणीतून ऐकू येईल ते त्या स्थानी अनेक अब्ज वर्षापूर्वी असलेल्या परिस्थितीचे चित्र असेल. विश्व जर स्थिर असेल तर ते चित्र कधीच बदलणार नाही.
अतिशय दूर अंतरावरील आकाशगंगा अवकाशात ज्या अधिक दाट प्रमाणात वितरित झालेल्या दिसतात त्या तश्या दिसायला नको आहेत, कारण स्थिर विश्वाच्या कल्पनेनुसार त्यांच्या वितरणाची घनता कमी जास्त व्हायला नको . म्हणजेच राइलच्या निरीक्षणावरून पूर्वी आकाशगंगा अधिक दाट प्रमाणात पसरलेल्या होत्या म्हणजेच आता विश्व प्रसरण पावत आहे. अर्थातच असा  निष्कर्ष काढण्यासाठीही  राइलच्या निरीक्षणास  पुष्टी  देणाऱ्या आणखी एकाद्या निकालाची वाट पाहणे योग्य."
        " बर ते जाऊदे, " आपले बोलणे चालू ठेवत आपल्या खिशातून घडी केलेला एक कागद काढत प्राध्यापक म्हणाले, "म्झाया सहकाऱ्यांपैकी एक जरा कवी मनाचा आहे त्याने या विषयावर हे काव्य केले आहे. "आणी त्यनी वाचायला सुरवात केली.
"कष्टाची वर्षे तुमच्या
राइल म्हणे हॉयेलना
 वायाच जणू गेली
विश्वसा माझ्या वचनी
 स्थिर विश्व हा सिद्धांत
कालबाह्य होउन गेला
जर फसवत नसती माझे
 नेत्र दुर्बिणीखाली
नष्टविती आशा तुमची
तत्त्वे तुमची न खरी ठरती
स्पष्टपणे सांगता विश्व
प्रतिदिन वाढता होई विरळ
हॉयेल म्हणे तुम्ही वदला
मज दिसे परी लेमैत्र
नि गॅमो पण विसरा ते
ती चुकार तज्ञांची टोळी
देती महास्फोटाची हाळी
का साह्य वा तया माना
हे पाहा माझ्या मित्रा
अंत नसे या सगळ्याला
आणि त्याला नव्हता आरंभ
जसे बोंडी, गोल्ड आणि मी
आमचे केस गळेपर्यंत मानू
"तसे नाही"ओरडे राइल
बेंबीच्या देठापासून
पित्त उकळेपर्यंत
अतोदूरवरील आकाशगंगा
असती अधिक दाट जसे दिसून येते
माझे पित्त खवळते
ओरडे हॉयेल
आपले विधान नीट जुळवत
नव द्रव्य जन्मा येते
दररात्री आणि सकाळी
आणि चित्र बदलत नाही ,
 छोड दे यार हॉयेल
 तुज खोटे ठरवायाचे ध्येय
माझे (थट्टा तर नव्हे ही? )
वदे पुढे राइल
तुज भानावरती आणीन
      "वा वा " टॉमकिन्स म्हणाला, "या वादातून काय निष्कर्ष निघतो हे पाहणे मनोरंजक ठरेल"आणी मॉडच्या गालाचा एक हलकासा मुका घेत दोघांना "शुभ रजनी " म्हणत त्यांचा त्याने निरोप घेतला.