सोपे नसते

सत्य बोलणे सोपे नसते...
सत्य ऐकणे सोपे नसते!

दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...

भेट आपली घडता कळले -
प्रेम जुळवणे सोपे नसते!

तेज, अन् झळा - दोन्ही मिळती
सूर्य भोगणे सोपे नसते

उमगले मला तू गेल्यावर
जीव लावणे सोपे नसते...

- कुमार जावडेकर, मुंबई

(श्री. चित्तरंजन भट यांनी 'सोपे नसते' ही रदीफ़ सुचवल्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!)