गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ३

नंतर च्या सोमवार पर्यंत मी बऱ्यापैकी रुळले होते. आणि मग मी उत्साहानी सोमवारी सकाळी लवकर उठून प्लॅंट वर जायची तयारी करायला लागले. तिथे पोचल्यावर सर्वात आधी मला कार्ड नसल्याने तेथिल फाईल मध्ये नाव लिहायला सांगितले. मग मला सेफटी ची CD बघायला सांगितली. एक हेल्मेट, एप्रन आणि १ गॉगल दिला. शुज पण देणार होते. पण माझ्या साईज चे शिल्लक नसल्याने शूज साठी मला थोड्या दिवसान्नी दिले. i-card नसल्याने मला आधी फोटो काढून घ्यावा लागला. आणि मग लगेचच त्या लोकान्नी मला i-card तयार करून दिले. ह्या सगळ्या प्रकरणात तृप्ती माझ्या बरोबर होतीच. त्यामुळे ह्या लोकांबरोबर बोलायचे मला काहीच दडपण आले नाही. कारण हे लोक इंग्रजी त बोलताना j ला y म्हणायचे. त्यामुळे मला काही गोष्टी कळायच्या नाहीत.

नंतर IT डिपार्टमेंट मध्ये सगळ्यान्शी ओळख झाली. रूडॉल्फ (आमचा बॉस), लिडिया(त्याची सेक्रेटरी)  वगैरे लोकान्शी ओळख झाली. आणि मग मी तिकडे काम करायला सुरुवात केली. तृप्ती ला आनंद झाला होता त्याचे एक कारण म्हणजे माझी आणि तिची गट्टी जमली होती हे तर होतेच पण बाकी सगळे लोक non-veg खायचे आणि ती एकटीच veg. त्यामुळे ती एकटीच डबा खायची. आता तिला  डबा खायला आणि काम करायला सोबत मी होते म्हणून ती खूष झाली होती. संध्याकाळी आम्ही ४ ला बस नि निघालो आणि ५ च्या सुमारास आमच्या स्टॉप वर उतरलो सुद्धा.
ऑफिस मधले सगळे लोक आम्हाला भारताबद्दल विचारायचे. रुडॉल्फ आणि लिडिया ह्या दोघान्न्नाही भारताबद्दल खूप च रस वाटायचा. मग मी एकदा लिडिया ला माझ्या लग्नाची CD दाखवली होती. मला नऊवारी साडी मध्ये बघून ती खूप च खूष झाली होती. भारतातल्या जीवनपद्धती  बद्दल ती चौकशी करायची. तृप्ती सिंदूर, टिकली लावायची. मोठे मंगळसुत्र घालायची. तेव्हा ती मला म्हणायची की तू का नाही असे करत? मग मी म्हणायचे की मी छोटे मंगळसुत्र घालते. तिकडच्या लोकान्ना नेकलेस च वाटायचा.   आणि म्हणायचे की मी टिकली आमच्या ट्रॅडिशनल ड्रेस वर लावते.
फारशी ओळख नसताना केवळ थोड्या दिवसांच्या ओळखीवर लग्न झाले म्हणून तिथल्या लोकान्ना खूप च आश्चर्य वाटायचे. कारण तिकडे "living together" अशी संकल्पना असल्याने असेल. रुडॉल्फ तर खूप च आश्चर्यचकित झाला होता. म्हणे असे कसे तुला वाटले नाही की तुझा चॉईस चुकला तर? म्हणायचा की आधी एक/दोन वर्षे एकत्र राहून बघायचे की किती मॅच होतोय आपण एकमेकान्ना आणि मग लग्न करायचे. त्याला तर मुले झाल्यावर त्यानी लग्न केले होते. पण मग मी त्याला उलटा प्रश्न विचारायचे की शेवटी तू लग्न केलेस च ना? तुला का गरज वाटली मग लग्न करायची?
तिकडे बाहेर खायला जायचे म्हणजे माझ्या जिवावर यायचे. कारण इंडियन रेस्टॉरंटस तशी कमी होती. आणि तिथे मिळणारी रोटी म्हणजे stuffed roti  असायची. म्हणजे साधी रोटी मागितली की आपल्या पुरणपोळी सारखी पण गोड नसलेली अशी दालभरी रोटी आम्हाला मिळायची. त्यातल्या त्यात एका माणसानी घरीच एक रेस्टॉरंट सुरू केले होते. तिथे फक्त मैद्याची रोटी मिळायची (डाळ नसलेली). नाहीतर बाकी ठिकाणी त्यान्ना आलू पराठे वगैरे माहीत असायचे. तिकडे एका रेस्टॉरंट मध्ये गोड म्हणजे अगदी खोबऱ्याचा लाडू, जिलेबी, बर्फी असेही प्रकार मिळायचे.
मी veg असल्याने आम्ही फक्त pizza hut मध्येच जाऊ शकायचो. तिथेही बरेच सांगून फक्त भाज्या असलेला पिझ्झा मिळवायला लागायचा.   पोचल्यावर काही दिवस मी तिकडचे दूध मात्र प्यायचे नाही. कारण ते पॅक्ड दूध असायचे. पण मग नंतर सवय झाली. मी खीर वगैरे ही करायला लागले. पाव भाजी मसाला नेल्यामुळे आम्ही एकदा पाव भाजी पण केली होती. आणि तसे ग्रुप मध्ये राहत असल्याने मधून मधून पार्टी करायचो.