गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ५

आम्ही तिकडच्या लोकान्नाही एकदा  पार्टी दिली होती. ह्या सगळ्या ग्रुप चे बॉस एकत्र अशी. त्यासाठी आमचे घर च एकदम सोयिस्कर होते. कारण एकतर मी आणि तृप्ती अशा दोघी सगळी तयारी करणार होतो. तसे ग्रुप मधली मुले चिकन बनवणार होती. पण बाकी सगळे आम्ही बनवणार असल्याने बरे पडले. सौजन्याला आमच्या घरी यावे लागले इतकेच. पण आम्ही केलेले सलाड, छोले, पराठे (हे पराठे आम्ही बाहेरून आणले होते. ), जीरा राईस आणि दाल फ्राय. गोड म्हणून गुलाब जाम केले होते आणि बुंदी रायता. सर्व पदार्थ चांगले झाले होते. पण लोक कमी आल्यामुळे पदार्थ उरले. आलेल्या लोकान्नी मात्र खूप एंजॉय केले. आम्ही तिघी तेव्हा साडी नेसलो होतो. त्यामुळे त्या लोकान्नाही आपला पारंपारीक पोषाख कळला.

तसेच मी आणि तृप्तीनी सुद्धा एकदा आमच्या डिपार्टमेंट मधल्या लोकान्साठी आलू पराठे करून नेले होते. सगळ्यान्ना खूप च आवडले होते. सगळ्यान्नी त्याचा चट्टा मट्टा उडवला होता. असे लोकान्ना आपले भारतिय पदार्थ आवडिने खाताना बघून खूप बरे वाटायचे. नाहीतर बरेचदा ह्या लोकांचे खाणे म्हणजे सकाळी बर्गर, दुपारी पण बर्गर च. त्यामुळे त्या लोकान्ना आपले खाद्यपदार्थ बघून विविधता वाटायची. (आम्ही जरी कधी त्या लोकान्बरोबर डबा नाही खाल्ला तरीही आम्ही आमचे डवे गरम करण्यासाठी आम्ही जायचो तेव्हा रुडॉल्फ बरेचदा आम्हाला विचारायचा की डब्यात काय आहे वगैरे. आणि खाऊन ही बघायचा!)

रोज गिरीश उशिरा तर यायचाच पण कधी कधी त्याला रात्री पण प्लॅंट वर जावे लागे. अशा वेळेस मी त्याला म्हणायचे की मी पण येणार तुझ्याबरोबर. तेव्हा तो म्हणायचा की अग तिकडे सगळे वर्कर लोक असतात. कसे असतात काय माहीत नाही. आणि मी तर माझ्या सिस्टीम च्या इकडे असणार. तिथे तुला येता येणार नाही. तू तिकडे येऊन करणार तरी काय? तर मी पटकन जाऊन येतो(जायला आणि यायलाच जवळ जवळ २ तास लागायचे. तरी मला धीर देण्यासाठी तो असे म्हणायचा). तू झोप. तुला भीती वाटत असेल तर मी वाटल्यास शेजारी संदीप आणि तृप्तीला सांगून जातो. पण मग मीच समजुतीच्या सुरात म्हणायचे की मला भीती वाटलीच तर मग मी त्यान्ना फोन करेन. आत्ताच नको त्यांची झोपमोड करायला. मग मी झोपायचे. आणि अधून मधून उठून गिरीश ला फोन करायचे.  शनिवारी पण त्याला कधी कधी जावे लागे. मग मात्र तेव्हा मी हट्ट करून त्याच्याबरोबर जायचे. निदान आम्हाला जाताना आणि येताना तरी कार मध्ये गप्पा मारता यायच्या. आणि शिवाय आमच्या कडे नक्षत्रांचे देणे आणि आणखीही काही हिंदी गाण्यांच्या कॅसेटस पण होत्याच. आणि तिथे प्लॅंट मध्ये मग मी मेल्स चेक करायचे किन्वा मग घरच्यांबरोबर चॅटिंग. पण मजा यायची. आणि माझ्याकडे ही प्लॅंट चे i-card असल्याने प्लॅंट मध्ये प्रवेश करण्यास काहीच अडचण यायची नाही. असेच घरी येताना आम्ही एकदा सुरीनाम नदीच्या काठावर जाऊन बसलो होतो. मस्त गार वारे होते. आणि एकदा पाम ट्री च्या गार्डन मध्ये गेलो होतो. बाकी प्रेक्षणिय अशी स्थळे पारामरिबो मध्ये फारशी नाहीत बीच सोडून. आणि आम्हाला तर तसे बीच वर जायला वेळ नसायचा. तरीही आम्ही सगळाच ग्रुप एकदा खूप लांब अशा एका बीच वर गेलो होतो. तिकडे शहाळी मस्त मिळायची त्यामुळे मजा यायची. तसे माझ्या लग्नाच्या आधी हे सगळे लोक एकदा गलिबी नावाच्या ठिकाणी जाऊन आले होते. जिथे बीच वर कासवे असायची.
<img src="दुवा क्र. १" alt="'Royal palms in Palmentuin Park, near Presidential Palace" width="277" height ="208">

आमच्या लग्नानंतर एका महिन्याने म्हणजेच ४ फेब्रुवारी ला मला गिरीश ला काहीतरी सरप्राइज द्यायचे डोक्यात होते. आणि एक अशी बेकरी पण मला माहीत होती जिकडे केक्स खूप छान मिळायचे. पण एकतर ती बेकरी आमच्या बस च्या मार्गावर नव्हती. आणि त्यात पुन्हा संदिप आणि गिरीश एकत्र तरी यायचे नाहीतर मग संदिपला त्याच्या टीम मधले कोणीतरी घरी सोडायचे. आणि मग कार गिरीश नंतर घेऊन यायचा. त्यामुळे केक आणायची जबाबदारी संदिप घेऊ शकत नव्हता. मग मी हि जबाबदारी नरेशवर सोपवली. आणि त्याने मला आदल्या दिवशी छान केक आणून दिला. अशा रितीने गिरीश ला खरोखर च सरप्राइज मिळाले. त्यालाही कळले नाही की मी केक कुठून आणला. खरेतर मला त्याला एखादा छान टी-शर्ट पण द्यायचा होता आणि म्हणून मी आणि तृप्ती एकदा बसने २/३ अलिकडच्या स्टॉप वर  उतरायचा प्रयत्न केलाही होता. पण त्या दिवशी नेमका त्या स्टॉप वर उतरणारा माणूस आला नाही म्हणून ड्राइव्हरने त्या स्टॉप वर बस थांबवलीच नाही. त्यालाही इंग्रजी न कळल्याने आम्ही पुढच्या स्टॉप वर उतरलो. आणि मग ते कपड्यांचे दुकान ही मागे गेल्याने आम्ही अशाच दोघी चालत घरी गेलो. तिकडे  टॅक्सी पण ऑन कॉल असल्याने आमचा काहीच पर्याय नव्हता. आणि मग मिळालेल्या संधीचा फायदा घेत आम्ही घरी  जाताना फुलांचे फोटो काढत चाललो होतो. तितक्यात एक दारुडा माणुस काहीतरी डच मध्ये बोलायला लागल्याने आम्हाला भीती वाटून आम्ही तिकडून असाच पळ काढला. त्यामुळे आम्ही नंतर दोघीजणी फार कधी चालत कुठे गेलोच नाही. आणि तसेही अंतर ही जास्ती असल्याने कारनेच जावे लागायचे. तशा मी आणि तृप्ती एकदा सौजन्या कडे चालत गेलो होतो तेवढेच. म्हणजे सेफ होते पण तरी नंतर अशी कधी वेळ ही नाही आली. शेवटी मी शनिवारी गिरीश बरोबर जाऊन टी शर्ट घेऊन आले.

अशीच गम्मत म्हणजे एकदा आमच्या घराबाहेरचा लॉन मध्ये ठेवलेल्या डस्टबीन मधिल कचरा न्यावा म्हणून त्या केर नेणाऱ्या गाडीवाल्याशी इंग्रजी तून बोलत होते. तर त्याने त्याच्यात वाकून बघून काहीतरी डच मधून ओरडून सांगितले. मग आम्ही बाहेर जाऊन बघतो तर खूप दिवस त्यान्नी कचरा न नेल्याने त्याच्यात त्या केराच्या पिशव्यांच्या मध्ये पाऊस पडल्याने टोड्स (बेडकाची छोटी पिल्ले) झाली होती. आणि तो माणूस तेच ओरडत असावा. मग नंतर संदिपने एक दिवस ती डस्टबीन साफ केली.

(क्रमशः)