गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ४

सुरीनाम मधे सुरीनाम डॉलर अशी करन्सी वापरली जाते. १ सुरीनाम डॉलर म्हणजे तेव्हा अंदाजे १५/१७ रुपये होते.

गिरीश ला ऑफिस कडून अमेरिकन डॉलर मध्ये पैसे मिळायचे. पण ते कन्व्हर्ट करून घेण्यासाठी आम्हाला कधिच बॅंकेत जायची वेळ आली नाही. ते पैसे आम्ही कॅंबिओ मधून एक्स्चेंज करायचो. हा प्रकार एकदम सोप्पा होता. हे म्हणजे ATM सारखे होते. जाऊन अमेरिकन डॉलर्स टाकायचे आणि त्याच्यातून सुरीनाम डॉलर्स बाहेर यायचे. काही काही तर Drive through होते. म्हणजे कार मध्ये बसून च अमेरिकन डॉलर्स द्यायचे आणि तो माणूस आपल्याला सुरीनाम डॉलर्स देणार. त्यामुळे तिकडच्या लोकान्ना मी जर कधी म्हणाले की हे एकदमच छान आहे की ते म्हणायचे की मग तुमच्या इथे तुम्ही कसे कन्व्हर्ट करता? मी म्हणायचे की बॅंकेत जाऊन.

प्लॅंटला जायच्या रस्त्यावर तिकडे खूप झाडी होती. त्यामुळे खूप छान वाटायचे. पाऊस पडलेला असेल तर मग आणखीच छान वाटायचे. सगळी कडे मस्त हिरवाई. सगळे लोक ही ट्रॅफीक चे नियम पाळत असल्याने बरे होते. मी तिकडच्या ३ महिन्यांच्या वास्तव्यात फक्त २/३ दाच हॉर्न ऐकला असेल.

सुरीनामी लोकांकडे पार्टी साठी जायची अशी वेळ माझ्यावर दोनदा आली. एक म्हणजे गिरीश चा प्लॅंट मधला त्याच्या युनिट चा बॉस टॉम कडे. त्याची बायको इंडियन आहे असे मला कळले होते. म्हणजे तिच्या काही पिढ्या आधीचे लोक भारतीय होते. आणि टॉमने तिला संगितले होते की मी इंडियन आहे. त्यामुळे तिच्याकडे नक्कीच काहीतरी veg खाणे केले असेल अशी आशा मला होती. पण आम्ही गेलो आणि तिनी छोले सारखा काहीतरी पदार्थ फक्त veg आणि बाकी सगळेच non-veg केले होते. म्हणून मी फक्त छोले खात होते अधून मधून. पण मग तिलाच खूप वाईट वाटले की मी बाकी चिकन पण खात नाही हे ऐकून. मी सारखी तिला सांगत होते कि It's ok. This is sufficient for me. कारण मी आधीच घरून थोडे खाऊन आले होते. पण तिला मात्र ते पटत नव्हते. मग कशी बशी मी तिची समजूत काढली.

आणखी एका पार्टीला मी डेनिस नावाच्या गिरीश च्या बॉस कडे गेले होते. तिकडे त्याची बर्थडे पार्टी होती. त्यामुळे बाकी पण लोक होतेच. तिकडे चिली च्या दोन लोकान्शी ओळख करून देत असताना त्यान्नी मला आलिंगन दिले . मी एक मिनिटभर चपापले. आणि मग माझ्या लक्षात आले की हीच पद्धत आहे हया लोकांची ओळख करून देतानाची. तिथे  तृप्ती आणि सौजन्या ही होत्याच. त्यान्नाही असेच केल्यावर मला माझेच हसू आले. मग आम्ही तिघी मस्त गप्पा मारत बसलो. तर गिरीश चा एक मेक्सिकन बॉस कार्लॉस तिकडे आला आणि मला म्हणाला "Girish is a very sincere and hard working guy. Take good care of him" मला थोड्या वेळानी अशाच आशयाचे वाक्य डेनिस कडून ही ऐकायला मिळाले. त्यामुळे गिरीश चा खूप च अभिमान वाटला. आणि मग वाटू लागले की मी उगाचच त्याच्या रोज उशिरा येण्यामुळे चिडचिड करत असते. पण त्याला ते वर्कर लोक कधीही अपरात्री ही फोन करायचे की इमर्जन्सी आहे. आणि मग गिरीश ला एवढे अंतर गेल्यावर काहीतरी फ़ालतू प्रॉब्लेम आहे असे कळायचे. पण त्याची सिस्टिम ही अशीच असल्याने काही इलाज च नव्हता.

आणखी एका पार्टी मध्ये आम्हाला असेच अचानक च जावे लागले. गिरीश ला कार्लॉस ला काहीतरी डॉक्युमेंट द्यायचे होते आणि ते द्यायला आम्ही त्याच्याकडे गेलो तर तो घरी नव्हता. मग फोन वर तो म्हणाला की मी डेनिस कडे आहे तिकडे ये. तिकडे सगळ्या बॉसची पार्टी चालू होती. म्हणून गिरीश आत जाऊन CD देउन लगेच परत येणार असे ठरल्याने मी कार मध्येच बसून राहिले. पण डेनिस नि आग्रह करून मलाही बोलवून डिनर साठी थांबवून च घेतले. आणि मग त्याच्या बायकोला माझ्यासाठी veg खाणे बनवायला लागले. अशा प्रसंगी मला सारखे वाटायचे की मी निदान चिकन तरी खात असते तरी लोकान्ना तरी त्रास नसता झाला. कारण ह्या पार्टी मध्ये तर मी आगंतुक पाहुणी होते. पण असे तिकडच्या लोकान्नी मला मुळिच भासू दिले नाही.

(क्रमशः)