ह्यासोबत
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम)
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) २
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ३
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ४
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ५
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ६
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ७
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ८
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ९
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) १०
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि त्याचाच आवाज येत होता. घराचे छप्पर ही लाकडी असल्याने आवाज जास्त मोठा येत होता. खिडकीतून बाहेर उंच गवत दिसत असल्याने मला भीती वाटायला लागली. मी गिरीश ला फोन केला. आणि मग नंतर मला धीर आला. नंतर हळू हळू मला त्या वातावरणाची सवय झाली. गिरीश म्हणाला होता की आठवड्यातून २ दा मेड कामाला येते. भांडी घासून आणि घर झाडून पुसून जाते. तिच्याकडे १ किल्ली असतेच. पण त्या दिवशी घरी असल्याने मी आतून कडी लावून घेतली होती. दुपारी दाराचे लॅच वाजले. मी आतून दार उघडण्याच्या आधी विचारले. "who is this? " पलीकडून काहीच उत्तर आले नाही. ती मेड पण बहुदा आतून कोणाचा आवाज आला म्हणून घाबरली असावी. मग ती गेली असावी. नंतर मग मला सुनीता म्हणून कंपनीच्या लोकांचे घराचे प्रॉब्लेम्स बघणारी होती तिचा फोन आला. मला ती म्हणाली की तू मेड ला दार का नाही उघडलेस? मी म्हणाले की तिनी उत्तर च दिले नाही. म्हणून नाही दार उघडले. मग ती पुन्हा आली. तेव्हा मात्र मी दार उघडले. मग ती तिचे काम करून गेली. तिला फारसे इंग्रजी येत नसावे. मी बोललेले तिला क्वचित कळायचे. माझी भाषा न कळणाऱ्या कोणत्या माणसाशी बोलायची ही अशी वेळ माझ्यावर पहिल्यांदाच वेळ आली होती. पण तरीही आमच्यात तोडके मोडके संवाद व्हायचे.
तृप्ती संध्याकाळी पाच वाजताच घरी यायची. त्या दिवशी मी तृप्ती ची वाट बघत बसले होते. ती पण आल्या आल्या आधी माझ्या घरी आली आणि म्हणाली की एकटी घरी बसून कंटाळली असशील. चल माझ्या घरी. मग मी तिच्या घरी गेले. तेव्हा बोलक्या तृप्ती ची आणि माझी लगेचच मैत्री झाली. तिनी मला सांगितले की इकडे कणीक, गूळ, कढीपत्ता अशा गोष्टी मिळत नाहीत. मग तिनी स्वतः साठी भारतातून आणलेल्या सामानातून मला काही सामान दिले. गिरीश लग्नाच्या आधी तिकडे असताना सकाळी कॅन्टिन मध्ये जेवायचा. आणि मग फक्त रात्री च ४/५ जण घरी भात आणि रस्सा सारखी भाजी बनवून खायचे. त्यामुळे त्यालाही कधी ह्या गोष्टींची गरज भासली नव्हती. नाहीतर मीच भारतातून ह्या गोष्टी घेऊन आले असते. नंतर शनिवार, रविवार मार्केट मध्ये गेल्यावर मला तिकडे काय मिळते ह्याची कल्पना आली. आपल्या भाज्यांपैकी फ्लॉवर, बटाटे, कांदे, लसूण, भरल्या वांग्याच्या साइज ची वांगी, कोबी, (या सगळ्याचा साइज खूप मोठा होता. त्यामुळे गमतीने मी रानटी भाज्या असे म्हणायचे. ), टोमॅटो, कांद्याची पात मिळायचे. तांदळाची पिठी (मी फिरलेल्या सुरीनाम, जपान, मलेशिया, सिंगापूर ह्या सगळ्या देशांमध्ये चायनीज लोक असल्याने तांदळाची पिठी आणि तांदूळ ह्या गोष्टी सगळीकडे मिळतातच. ) असे मिळायचे. तृप्तीने मला तिकडे एक मैद्याच्या सारखा एक प्रकार दाखवला ज्याच्या पोळ्या त्यातल्या त्यात बऱ्या व्हायच्या. बाकी फ्रोजन मटार, फ्लॉवर पण मिळायचे. इकडून पोळपाट आणि लाटणे नेले होते. तसेच मी इकडून तूर डाळ नेल्याने भात, आमटी, त्या पिठाच्या पोळ्या, भाजी, क्वचित कोशिंबीर असे पदार्थ मी हळू हळू करायला लागले.
तिकडचे मॉल्स सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते संध्याकाळी ४ पर्यंतच चालू असायचे. आणि रविवारी बंदच असायचे. मग सगळी खरेदी शनिवारी सकाळीच आम्ही उरकत असू. चायनीज लोकांचे काही सुपरमार्केटस मात्र रात्री १० पर्यंत चालू असायची. त्यामुळे किराणामालासाठी रात्री गिरीश लवकर घरी आला तर जाता यायचे.
एक आठवडा घरी बसून झाल्यावर मात्र मला कंटाळा यायला लागला होता. कारण अख्ख्या बंगल्यात सकाळी ६ पासून संध्याकाळी ५ पर्यंत मी एकटीच घरी असायचे. मग तृप्ती प्लॅंट च्या IT डिपार्टमेंट मध्ये जायची तिकडे तिनी तिच्या बॉस ला सांगितले की माझी आणखी एक मैत्रीण आहे तिला IT त ल्या कामाचा अनुभव आहे. तर तिच्यासाठी काही काम आहे का इकडे? त्या बॉस नि लगेच त्याच दिवशी फोन वर माझा interview घेऊन मला सोमवारी बोलावले. गिरीशला, मला तर आनंद झालाच. पण तृप्तीलाही माझ्यासाठी खूप आनंद झाला....