ह्यासोबत
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम)
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) २
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ३
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ४
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ५
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ६
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ७
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ८
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ९
- गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) १०
आम्ही धावत पळतच आमच्या मुंबईच्या विमानाच्या गेट वर जाऊन पोचलो आणि त्या माणसानी आमची चौकशी करायला सुरुवात केली. तुम्ही सुरीनामला कशासाठी गेलात वगैरे प्रश्न होते त्यात. शेवटी त्याची खात्री पटली की आम्ही कसलीही तस्करी करत नाही आहोत. म्हणून मग आम्हाला त्याने विमानात बसायला परवानगी दिली. आम्हाला इतका उशिर झाला होता की स्कॅन झालेले सामान आम्ही पटकन उचलून घेतले. आमच्यासाठी (आणि आणखी दोन लोकांसाठी) विमानाचे दरवाजे उघडले. आम्ही आत गेलो आणि गिरीश आमचे सामान वरच्या कप्प्यात ठेवू लागला. माझ्या हातातील केबीन बॅग मी त्याला दिली. नंतर तो बसायला लागला. तर मी त्याला म्हणाले की तुझा लॅपटॉप पण ठेव ना. तो तर चक्रावलाच. मला म्हणाला की मी लॅपटॉप सगळ्यात आधीच ठेवलाय. मग मी माझ्या हातातील लॅपटॉप बॅग त्याला दाखवून म्हणाले की मग हा कोणाचा लेपटॉप आहे? तर तो म्हणाला की हा माझा नाहिये. तू कोणाचा उचलून आणलास? मी तर घाबरलेच. गिरीशला म्हणायला लागले की आधी जाऊन तू एअर होस्टेसला सांग. तो लगेच देऊन आला. आणि नंतर मला समजावू लागला की असे कोणाचे सामान उचलायचे नाही. प्रॉब्लेम झाला असता. माझ्या हातूनही चुकूनच ते सामान उचलले गेले होते. नशिब आणखी काही गोंधळ झाला नाही ते. (त्यातच आम्ही सुरीनामहून आलो होतो. आणि साउथ अमेरिका खंडात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.)
लगेचच काही मिनिटात विमान सुटले. आणि ते पोचलेही वेळेच्या थोडे आधिच. आम्ही मुंबई एअरपोर्ट वरून बाहेर आलो तर आम्हाला घ्यायला कोणीच आले नव्हते. कारण अजून सुमारे ३० मिनिटांनी विमान पोचणे अपेक्षित होते. आम्ही एस. टी.डी बूथ वरून फोन केला आणि विमान आल्याचे सांगितले. माझे आई बाबा सासरी गेले होते. अजून विमान यायला वेळ होता म्हणून ते पोचले नाहीत आमच्या आधी एअरपोर्टवर. पण मग माझा फोन झाल्यावर ते लगेचच निघाले. सासर गोरेगावचेच असल्याने घरून अक्षरशः २५ मिनिटातच मग लगेचच आई बाबा एअरपोर्टवर पोचले. त्यांनी गिरीशला बघितल्यावर त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मग आम्ही सगळे घरी गेलो. गोरेगावला सासू- सासऱ्यांना पण गिरीश आल्याचा सुखद धक्का बसला. सगळे जण एकदमच खूष होते. माझा दीर सोडून बाकिचे सगळे लोक एकमेकांना विचारत होते की तुम्हाला माहीत होते क गिरीश पण परतणारे ते? कारण ते सगळ्यांसाठीच सरप्राइज होते.
सौजन्या पण घरेलू वातावरण असल्याने छान रुळली. फक्त तिला हिंदी येत नसल्याने तिच्याशी सगळे इंग्रजी मध्ये बोलत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लगेचच सौजन्याला तिच्या हैदराबादच्या विमानासाठी सोडले आणि पुण्यात आलो.
कालांतरानी मग संदिपचे तिकडचे काम संपले. आम्ही भारतात गेल्यावर दुर्दैवाने तृप्ती आजारी पडली. त्यांच्या घरचा फोनही बंद पडला. तिला एक दिवस ऍडमिट करावे लागले. मग ती बरी झाली. अशक्तपणा आल्याने असे झाल्याचे डॉक्टरंनी निदान केले. त्याच्यातच मग त्यांचे पण निघायचे ठरले. तिला पॅकिंगच्या मदतिला पण कोणीच नव्हते. त्यांच्या बॅगचे वजन केले एअरपोर्ट वर ते नेमके जास्ती झाले. त्यांच्यानंतर काही महिन्यांनी वेंकट येणार म्हणून त्यांनी मग सामान (एक बॅगच)ड्राईव्हर बरोबर वेंकटकडे पाठवून दिले. पुढे सुरीनामचे त्यांचे विमान लेट झाल्याने त्यांचे मुंबईचे पुढचे विमान चुकले. असे बरेच गोंधळ झाले. पण शेवटी ते पुण्यात पोचले.
मग आम्ही एकदा पुण्यात भेटलो तेव्हा आम्ही सुरीनाम मध्ये व्यतित केलेल्या कालावधीबद्दल बोलत होतो. आणि पुढे कधी जर चान्स मिळालाच आणि जर (तृप्ती सारखी) सोबत मिळाली तर मुलांसह सुरीनामला जायचे स्वप्न उराशी बाळगून आम्ही निरोप घेतला.
(समाप्त)