आता पुरे हे मिटवून टाका
'संघर्ष मिटला'-कळवून टाका!
मी वेगळा की तुमच्यातला मी?
- हे एकदाचे ठरवून टाका!
इतिहास सारा विसरू नका, पण-
ही आग आता विझवून टाका...
द्या स्थान त्याला हृदयात तुमच्या
(हे दगड-धोंडे बुडवून टाका!)
कच्चेच धागे... शिवणी न पक्क्या...
जातो सदोदित उसवून टाका
या आसवांनो, लपता कशाला?
देणे जगाचे चुकवून टाका!
- कुमार जावडेकर