हे पाहिलेय मी कितिदा

हे पाहिलेय मी कितिदा
मन आपलीच मर्यादा
ओलांडण्या लागतसे।
मागून गूढ लाषेच्या
मागून गूढ आशेच्या
मन धावण्या लागतसे
।ध्रु।


मार्गांवर ... मार्गांवर
ह्या जीवनमार्गांवर
हसरे प्रसन्न फूल फूल उगवे ।
कुठले फूल खुडावे
अन् हृदयात जपावे? ।१।
हे पाहिलेय मी कितिदा ...


उकलेना ... उकलेना
कोडे हे उकलेना
शकते न सोडवू, शके न वारू
कोणाशी सख्य करू?
प्रीत कुणाची विसरू? ।२।
हे पाहिलेय मी कितिदा ...

टीपा :

१. येथे जीऽऽवन असा आलाप कठीण  वाटत असेल तर वाटांवर - वाटांवर - जगण्याऽऽच्या वाटांवर असा पर्याय वापरून पाहा.

२. प्रसन्न ऐवजी प्रफुल्ल कसे वाटेल?

३. वारणे = दूर करणे, सोडवणे. (उदा. वारी वारी जन्ममरणाते वारी) हे नको असेल तर पर्याय सुचवा. चाल - गागा - लगा - लगा - लगा - लगागा. आणि हो, शेवटच्या तीन ओळींचे यमक जुळले पाहिजे.  

४. पर्याय : मी हेहि पाहिले कितिदा

५. लाषा = इच्छा
पर्याय : मागून गूढ तृष्णेच्या

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा.