नायक : |
घेउन मी - हे वेडे मन दारोदार - करतो वणवण२ |
नायिका : |
घेउन मी - हे वेडे मन दारोदार - करते वणवण |
नायक : |
कधी जराशी - कुठे कडेशी ये भेटू अंधारी प्रकाऽऽशी ।ध्रु।
|
नायिका : |
तू बिदी१त ज्या मी बिदीत त्या पण ही असहायता - इथे! |
नायक : |
तू इथे जरी मी इथे जरी का आहे दूरता - इथे! |
नायिका : |
वाहवा! ...जग हे! ... जगताची ह्या शोभा फार खाऽऽशी ।१। घेउन मी - हे वेडे मन ...
|
नायक : |
अस कुठे जरी वाटते परी हृदया संलग्नता - इथे! |
नायिका : |
क्षेम हो तुला तुजविना मला येई मनखिन्नता - इथे! |
नायक : |
ये ना! ... ये ना ... ये ना, मजला धर ना तू उराऽऽशी ।२। घेउन मी - हे वेडे मन ...
|
टीपा :
२. पर्याय
फिरत असे - सारे त्रिभुवन
किंवा
फिरत असे - अंगण अंगण
१. बिदी = गल्ली ह्या अर्थी मराठीत लगा ह्या वजनाचा हा शब्द सापडला. ह्या पानावर बिदी शब्द शोधा किंवा त्याच पानावरचे हे चित्र पहा
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले
) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल
)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे
शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका
काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... आऽऽशी शी जमवा बरका!