अबोल नूर

कशास हा अबोल नूर?
पुन्हा पुन्हा विदीर्ण ऊर

सजा सुनावलीस थेट
कळेल का मला कसूर?

जरी तुझ्यामुळेच भग्न
तरी तुला हृदय फितूर

उरात शुष्क वाळवंट
निरुद्ध पापण्यात पूर

मिळेल स्वर्ग एक दीस
सबूर, माणसा, सबूर

पृथेस धाड, धाड इंद्र
मिलिंद, कर्ण दानशूर