दुःख मागू जरा उधार नवे
जीवनाशी करू करार नवे!
तोरणे गुंफण्यास मोत्यांची
दे तुझे पावसा तुषार नवे...
या पुढे लोक हो विरोधाला
मांडले मी पुन्हा विचार नवे!
कापरे शब्द का अजून तुझे
ना मला हे तुझे नकार नवे!
लागता ठेच - समजलो मीही...
ही नवी वाट, चढ-उतार नवे!
लक्ष नाही इथे कशात तुझे
प्रेम आहे तुला 'कुमार' नवे!
- कुमार जावडेकर, मुंबई