मराठी माणूस पैसा मिळवायला घाबरतो असे तुम्हाला वाटते का? आपण मोठे व्यवहार करू शकत नही का? आपण अब्जाधिश होऊ शकतो का?
आज तरी याचे उत्तर नाही असेच आहे! ( काही राजकारणी वगळता).
क्रिकेटमधे पैसा नव्हता तोपर्यंत भारतीय टीममधे मराठी खेळाडू होते, आता फक्त सचिन.
सैन्यात आता पगार चांगले आहेत तर आपली संख्या कमी.
कोल सेंटर मधे असे होते आणि तसे होते म्हणून आपली मुले जात नाहीत. घरी बसतात. ९ ते ५ काम हवे.
शेअर बाजारात उतरायचे तर नाव नको.
जिथे जिथे पैसा आहे तिथून आम्ही लांब पळतो. धोका नको. असे का?
आज एखाद्याच्या जागेची किंमत २५ - ३० लाख असेल पण त्याशिवाय काही नसते. आम्ही नक्की कशात कमी पडतो? आमच्या गरजा जास्त आहेत का?
साधी रहणी शुद्ध विचारसरणी हे विसरलो का? भ्रष्टाचार आम्ही करतो पण चिरीमिरी एव्हढाच. त्यातही मोठी उडी नाही. मध्यंतरी 'तहलका' ने सैन्यातला भ्रष्टाचार उघडकीला आणला. कोटी-कोटी मागितले गेले. पण मी पार निराश झालो. त्यात एकही मराठी नाव नाही. तेव्हढी छातीच नाही. १००-२०० रुपये मिळले की खुश. हजारात म्हणजे डोक्यावरुन पाणी. लगेच दारू प्यायला मोकळे. त्या अधिकार्याने सांगितले होते की मझ्याशी नुसते शेकहयाण्ड करायचे असेल तर किमान एक ब्ल्यू लेबल बाटली आणली पाहिजे. तो पंजाबी होता.
आम्ही काय करायला हवे? पैसा मिळवणे, सांभाळ्णे, वाढवणे कसे जमेल? आमची पुढची पिढी कोट्याधीश आणि त्यापुढची अब्जाधीश होईल का?