![]() |
बोरीबंदर यायला तीनच स्टेशनच राहिली, तसा, लिमयेचा आवाज कानावर येऊन खरंच आज झोप अगदी अनावर झालेली होती. मुंबईतील महानगरपालिकेतील चांगली नोकरी आणि भरभक्कम पगार केवळ या दोनच दोन जमेच्या बाबी वगळता सध्याचे बाकी सारे जीवन जीवघेण्या धकाधकीचे होते. चांगल्या नोकरीचा प्रश्न मुंबईने सोडवला होता तरी निवासाचा प्रश्न खर्डी सारख्या दूरवरच्या गांवात येऊन सुटला होता. प्रवासातच रोज किमान जाऊन येऊन तीन तास जात होते. |