![]() |
परीक्षा तोंडावर आली होती आणि सुनीलला कोणत्याही परिस्थितीत निवांत वेळ आणि निवांत जागा हवी होती. गलबला, गजबजाटापासून दूर कुठेतरी जाऊन त्याला एकाग्रतेने अभ्यास करायचा होता. जास्त कशासाठी प्रसिद्ध वगैरे नसलेलं आणि वर्दळ नसलेलं जवळपासचं एखादं छोटेखानी तालुक्याचं गावही चालून गेलं असतं. पण त्याला अशी जागा शोधायला मित्रांचे सल्ले वगैरे नको होते. जो कोणी जी काही जागा सुचवेल तिथे त्याच्या ओळखीचं कोणी न कोणी असणारच. |